Breaking News

Monthly Archives: June 2022

सुकी मासळी खातेय ‘भाव’; दरात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ

सुधागड : प्रतिनिधी वरुणराजाचे आगमन झाले असून तो सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अगोटीची खरेदी अंतिम जोरात आहे. यामध्ये सुक्या मासळीचीही बेगमी केली जात आहे. मागणी अधिक व आवक कमी असल्याने मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सुक्या मासळीचे भाव तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी वधारले आहेत. …

Read More »

पनवेलमध्ये भाजप अनुसूचित जाती मोर्चाचा मेळावा उत्साहात

पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त होणार्‍या सेवा, सुशासन व गरीब कल्याणपर्व कार्यक्रम अंतर्गत पनवेल शहर भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी (दि. 9) मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांनी मार्गदर्शन …

Read More »

आनंदवार्ता! मान्सून कोकणात दाखल

हवामान विभागाकडून महाराष्ट्र प्रवेश जाहीर मुंबई : प्रतिनिधी प्रतिकूल वातावरणामुळे आगेकूच करू न शकलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने अखेर दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी (10 जून) त्याचा प्रवेश जाहीर केला. यासोबतच कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. मोसमी …

Read More »

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या तीन हजार पार

मुंबई : राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय. चिंताजनक बाब म्हणजे राज्यात शुक्रवारी (दि. 10) कोरोना रुग्णसंख्या तीन हजार पार गेली आहे, तर एकट्या मुंबईतील कोविड रुग्णांचा आकडा दोन हजारच्या नजीक येऊन ठेपला आहे. त्याचबरोबर सक्रीय रुग्णांचाही संख्या वाढली आहे. राज्यात शुक्रवारी तीन हजार 81 …

Read More »

मोरा बंदरातील गाळाची सफाई

भाऊचा धक्कापर्यंतचा जलप्रवास होणार सुरळीत उरण : रामप्रहर वृत्त मोरा बंदरातील चार कोटी रुपये खर्च करून एक लाख 18 हजार 927 क्युबिक मीटर साचलेला गाळ काढण्यात आला आहे. यामुळे भाऊचा धक्कापर्यंतचा जलप्रवास सुरळीत होणार आहे. समुद्राच्या ओहोटीमुळे बंद ठेवण्यात येणारी समस्या दूर झाली असल्याची माहिती मुंबई बंदर विभागाच्या कार्यालयातून देण्यात …

Read More »

कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांना अभिवादन

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज  कृष्णाजी  भुजबळ यांच्या नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 17 मधील जनसंपर्क कार्यालयात रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, पनवेल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, भाऊ भुजबळ, महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी शैलेश …

Read More »

नाका कामगारवर्गात चिंतेचे वातावरण

दररोजचे काम मिळत नसल्याने मंदीचे सावट पनवेल : वार्ताहर पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यांसह परराज्यातून अनेक कुटुंबे शहरांकडे येतात. दररोज सकाळी शहरातील नाक्यांवर उभे राहून मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात सकाळी नाक्यांवर एक प्रकारे मजुरांचा बाजाराच भरलेला असतो, परंतु नाक्यावर सर्वांना दररोज काम मिळत नसल्याने कामगार वर्गात चिंतेचे वातावरण …

Read More »

विवेकानंद संकुलामध्ये वृक्षारोपण

नवी मुंबई : बातमीदार पर्यावरण सप्ताहनिमित्त विवेकानंद संकुल येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण प्रेमी प्रदीप मेहता प्रमोद जोशी व आबा रणवरे त्याचप्रमाणे शाळेच्या सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका तसेच शालेय समिती सदस्य मोहन ढवळीकर उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये चिंच कडुलिंब बेल जांभूळ चंदन अशा प्रकारच्या …

Read More »

नेरूळमध्ये वृक्षारोपण आणि संवर्धन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या सौजन्याने आणि युगांतर मित्र मंडळाच्या वतीने नेरूळ येथील श्री झोटिंगदेव बामणदेव मैदान परिसरात जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करण्यात आले, आतापर्यंत मंडळाच्या वतीने 500 हुन अधिक झाड लावून त्यांचे संवर्धन करत असल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली. पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी आणि हवेतील प्राणवायुचे …

Read More »

तळोजा एमआयडीसीत अमलीसाठा नष्ट

मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी परिसरात जप्तीच्या पदार्थांची विल्हेवाट पनवेल : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आजादी का अमृत महोत्सवा निमित्त केलेल्या आयकॉनिक विकच्या पार्श्वभूमीवर  भारतीय कस्टमने तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनी परिसरात जप्त केलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट बुधवारी (दि. 8) लावली. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ नष्ट …

Read More »