पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका आणि शहर महिला कमिटीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने आपल्या भागातील थोर व्यक्ती की, ज्यांनी देशसेवा केली आहे अशा व्यक्तींचा त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करावा, असा आमदार प्रशांत ठाकूर यांचा मानस असून त्याप्रमाणे पनवेल शहर आणि तालुका महिला मोर्चातर्फे शहरातील …
Read More »Monthly Archives: August 2022
मुरूडजवळच्या समुद्रात अडकून पडलेल्या मच्छीमारांची सुटका
मुरूड : प्रतिनिधी मुरूड येथील पद्मदुर्ग किल्ल्याजवळ बोटीवर अडकून पडलेल्या गुजरातमधील मच्छीमारांची तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांना बोटीतून बाहेर काढण्यात आले. गुजरातच्या वेरावळ बंदरातील बोट मंगळवारी सायंकाळी मासळी पकडत पंखा तुटल्याने पद्मदुर्ग परिसरात अडकून पडली होती. बोटीच्या तांडेलने नांगर टाकून ती एका जागी थांबवून ठेवली होती, …
Read More »आयआयटीएमएस प्रणाली होणार अद्ययावत
एनएमएमटीच्या प्रवाशांना मिळणार सुविधा नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या दैनंदिन परिचलनामध्ये अत्याधुनिक आयआयटीएमएस प्रणालीचा वापर करण्यात येत असून या अत्याधुनिक प्रणालीच्या प्रभावी वापराबद्दल नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. या प्रणालीद्वारे सुरू असलेल्या कार्यवाहीचा प्रत्यक्ष आढावा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी …
Read More »भाजप खारघर कार्यालयात क्रांती दिन साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त आजादीच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 9 ऑगस्ट 2022 रोजी सेक्टर 13 भाजप कार्यालय येथे खारघर तळोजा महिला मोर्चाच्या माध्यमातून क्रांती दिन साजरा करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवर तटस्थ उभे राहून देशाचे संरक्षण करणारे आर्मीचे ऑफिसर्स यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात …
Read More »‘अंनिस’चा वर्धापन दिन उत्साहात
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 33वा वर्धापन दिन मंगळवारी (दि. 9) नवी मुंबईत उत्साहात पार पडला. या निमित्ताने वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात जादूटोणा विरोधी कायद्यावर व्याख्यान व अतिद्रिंय शक्तीचे प्रयोग हे कार्यक्रम पार पडले. अॅड. तृप्ती पाटील यांनी जादूटोणाविरोधी कायदा हा कोणाच्याही शोषणमुक्त धार्मिक आचरणाला बाधा …
Read More »दिव्यांगांचे सिडको भवनसमोर आंदोलन
हक्काच्या स्टॉलची मागणी नवी मुंबई : बातमीदार दिव्यांग नागरिकांना स्टॉलसाठी 200 चौरस फुटांची जागा देण्यासह प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व अपंग सेना ऑफ नवी मुंबई यांनी सिडको भवन समोर आंदोलन सुरू केले आहे. वारंवार मागणी व चर्चा करुनही सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सकाळपासून धरणे आंदोलन सुरू केले …
Read More »मोरबे धरणातील पाणीसाठा असमाधानकारक
1800 मिमी पावसाची आवश्यकता नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण आतापर्यंत 72.65 टक्के भरले आहे. उपलब्ध पाणीसाठा नवी मुंबईकरांची तहान 7 एप्रिलपर्यंत पुरेल इतकाच असून धरण भरण्यासाठी 1800 मिमी पावसाची आवश्यकता आहे. पुढील काळात पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस न झाल्यास शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे. …
Read More »आदिवासी दिनानिमित्त चिरनेरमध्ये रॅली; हुतात्म्यांना अभिवादन
उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी आदिवासी दिनाचे औचित्य साधून उरण, पनवेल, पेण, अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधवांनी चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मांना अभिवादन केले. या वेळी चिरनेर आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच आदिवासी बांधवांनी हुतात्मा स्मृतीस्तंभ ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत रॅली काढून उत्साहाले सहभाग घेतला. या रॅलीत भारत माता की जय, कोण म्हणतो …
Read More »घरोघरी तिरंगा अभियानाबाबत महिला दक्षता समितीला सूचना
पनवेल : वार्ताहर तिरंगा म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिक आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) या देशव्यापी अभियानात पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या महिला दक्षता समितीनेसुद्धा सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी (दि. 9) झालेल्या बैठकीत करण्यात …
Read More »गव्हाण विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी (दि. 8) विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम कुंदन राम मोकल, द्वितीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper