‘आरटीपीएस’मध्ये स्थापना दिन उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या (आरटीपीएस) माध्यमातून मिळत असलेल्या दर्जेदार शिक्षणामुळे येथील विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे येणार्या काळातही स्कूल प्रगतीच्या दिशेने काम करीत राहिल, असा विश्वास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त …
Read More »Monthly Archives: August 2022
राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार
मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (दि. 9) होणार आहे. सकाळी 11 वाजता राजभवनमध्ये शपथविधी सोहळा होईल. याबाबत जनसंपर्क कार्यालयाने पत्रक जारी केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींशी चर्चा केली आहे. त्यानुसार काही मंत्री पहिल्या टप्प्यात शपथ घेतील. यात भाजपमधून चंद्रकांत …
Read More »असंवेदनशीलतेचे आव्हान
गोंदिया बलात्कार प्रकरणाने वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर हेडलाइनची जागा पटकावली असली तरी अशा घटना या अलीकडे समाजाकडून मात्र एक प्रकारच्या निर्विकारपणेच स्वीकारल्या जाताना दिसतात. अमानुष लैंगिक अत्याचाराची अशी एखादी घटना कुठे आणि कुणाच्या संदर्भात घडली आहे यावरून जनसामान्यांची प्रतिक्रिया किती तीव्र असेल ते ठरते. अन्यथा काही राजकीय पक्षांकडून निव्वळ राजकारणात भांडवल …
Read More »रायगड जिल्ह्यातही इलेक्ट्रॉनिक वाहनाला पसंती
962 ई-वाहनांची नोंदणी; अलिबाग तालुक्यात सर्वाधिक मागणी नागोठणे : राज वैशंपायन रायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणी वाढली असून, गेल्या वर्षभरात तब्बल 962 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. तर शेकडो ई-वाहने प्रतीक्षा यादीमध्ये असल्याचे शोरूम मालक सांगतात. इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळावी यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. …
Read More »जिल्हास्तरीय वृक्षारोपण मोहिमेचा तिघर येथे शुभारंभ
कर्जत : प्रतिनिधी देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना वृक्षारोपण व संवर्धन मोहीम महत्वाची आहे. या मोहिमेत पर्यावरण राखण्यासाठी आपण या परिसरात सुमारे सहा हजार देशी झाडे लावत आहोत, असे प्रतिपादन कोंकण विभागाचे महसूल उपायुक्त मनोज रानडे यांनी तिघर धनगरवाडा येथे केले.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंकण विभाग विभागीय आयुक्त कार्यालय रोहयो …
Read More »द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात
ट्रकचालक जागीच ठार, सात जण जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. 8) सकाळी चार वाहनांचा अपघात झाला. त्यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य वाहनांतील सात प्रवासी जखमी झाले. ट्रकमधील दोघाजणांनी प्रसंगावधान राखत उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला आहे. द्रुतगती मार्गावरून …
Read More »रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी (दि. 8) दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. किनारपट्टीवरील भागात पावसाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, पुढील काही दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी किनार्यावरील तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा …
Read More »माणगावमध्ये स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी दौड
माणगाव : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. 8) अमृत महोत्सवी दौड व प्रभात फेरी काढण्यात आली होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम देशभर राबविण्यात येणार असून हे अभियान माणगावात 13ते 15ऑगस्ट …
Read More »स्वातंत्र्याची दिंडी उपक्रमाचा रायगडात शुभारंभ
अलिबाग : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त रायगड जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात स्वातंत्र्याची दिंडी उपक्रम राबविण्यात येत असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा प्रारंभ सोमवारी (दि. 8) वरसोली येथे रॅली काढून करण्यात आला. रायगड …
Read More »श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे उपक्रम कौतुकास्पद -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी येथे केले. पनवेल शहरातील श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पनवेल महापालिका हद्दीतील 10 शाळांतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप पनवेल येथील श्री साईबाबा मंदिर येथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper