Breaking News

Monthly Archives: August 2022

हर घर तिरंगा अभियानांतर्गत पेणमध्ये जनजागृती रॅली

पेण : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या ’हर घर तिरंगा’अभियानाविषयी  जनजागृती करण्यासाठी पेणमध्ये रॅली काढण्यात आली होत. या जनजागृती रॅलीमध्ये पेणमधील प्रायव्हेट हायस्कूल, सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज, नगर परिषद उर्दू शाळा, पेण एज्युकेशन प्राथमिक शाळा यांच्यासह विविध कॉलेज व शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होेते. पेण शहरातील महावीर मार्ग, गांधी मंदिर रस्ता, पेण …

Read More »

नागोठण्यात धर्म फेरी; शेकडो तरुण-तरुणी सहभागी

नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे नगरीत हिंदू जनजागृती मंचच्या वतीने रविवारी (दि. 7)  नागोठणे शहरात धर्म फेरी काढण्यात आली होती. या धर्म फेरीत शेकडो तरुण-तरुणी सहभागी झाले होते.  नागोठणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामदैवत जोगेश्वरी मातेचे पूजन करून प्रेरणा मंत्राने रविवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास धर्म फेरीची सुरुवात करण्यात आली. …

Read More »

खालापूर-खोपोली मार्गावरील झाडे ऐन पावसाळ्यात सुकली; ठेकेदाराचा बनाव उघड

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली ते खालापूर  या आठ किमी अंतराच्या टप्प्यात ठेकेदाराने लावलेली झाडे ऐन पावसाळ्यात सुकली असून, त्यांना टेकू देण्यासाठी वापरलेल्या फक्त काठ्या शिल्लक राहिल्या असल्याचे चित्र आहे. खोपोली ते खालापूर या रस्त्याचे तीन वर्षापुर्वी रुंदीकरण आणि दुरुस्ती करण्यात आली. रस्ता रुंदीकरण करताना तोडलेल्या एका झाडाच्या मोबदल्यात पाच …

Read More »

सीकेटी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश

पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदुस्थान टाईम्सतर्फे राष्ट्रीय स्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धा (नॅशनल क्विझ कॉम्पीटीशन) आयोजित करण्यात आली होती. ही प्रश्नमंजुषा प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या स्तरावर आयोजित केली होती. या स्पर्धेत सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमातील इयत्ता चौथीतील दोन विद्यार्थी आराध्य गुरूनाथ शेळके व रचना एस. वाघमारे यांनी जिल्हास्तरावर तसेच इयत्ता आठवीच्या पूजा मिंलीद …

Read More »

पनवेल तहसीलमध्ये ध्वज विक्री केंद्र

पनवेल : वार्ताहर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमात घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत नागरिकांना नाममात्र दरात तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात ध्वज विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार घरोघरी तिरंगा मोहिमे अंतर्गत नागरिकांसाठी ध्वज विक्री केंद्र पनवेल तहसील कार्यालयात सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सीकेटी विद्यालयाची हर घर तिरंगा रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 8) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भरत दुबे (सी.आय.) यांच्या हस्ते …

Read More »

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने जिंकले सुवर्णपदक

बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तिने कॅनडाच्या मिशेल ली हिला पराभूतकेले. सिंधूच्या या विजयाने भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 19 झाली आहे. सिंधूला 2014 व 2018मध्ये महिला एकेरीच्या सुवर्णपदकाने सिंधूला हुलकावणी दिली होती, पण 2022मध्ये तिने अखेर पहिले सुवर्णपदक …

Read More »

पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : प्रतिनिधी पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने (सक्तवसुली संचालनालय) राऊत यांना अटक केली आहे. दरम्यान, आता राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. अटकेनंतर संजय राऊत मागील काही दिवसांपासून ईडी कोठडीत होते. त्यांना सोमवारी …

Read More »

पनवेलमध्ये भव्य तायक्वांडो आमदार चषक 2022 स्पर्धा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमधील जाणीव एक सामाजिक संस्था व रायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने तायक्वांडो आमदार चषक 2022 स्पर्धा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. 7) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

गणेशोत्सवात यंदाही कोकण रेल्वेमार्गावर धावणार मोदी एक्स्प्रेस

मुंबई ः प्रतिनिधी गणेशोत्सव जवळ आल्याने मुंबईत राहणार्‍या कोकणवासियांना गावाकडचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍यांची संख्या जास्त असल्यामुळे एक्स्प्रेसचे तिकीट मिळणे अनेकांसाठी अवघड होते. तिकीट मिळत नसल्याने अनेकजण अतिरिक्त पैसे मोजून बसने जाणे पसंत करतात. यामुळेच गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी यावर्षीही मोदी एक्स्प्रेस घावणार आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ही …

Read More »