Breaking News

Yearly Archives: 2022

ग्रामस्थांची सरसकट सर्वच घरे नियमित करा

आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली 250 मी. पर्यंतची घरे नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला व याबाबत शासन निर्णय आणला, परंतु नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे ‘आहे त्या स्थितीत’ सरसकट नियमित करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे …

Read More »

शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर आकर्षित  होऊन शिवसेना उत्तर भारतीय सेल खारघर अध्यक्ष शैलेंद्र त्रिपाठी यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह रविवारी (दि. 27) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. खारघर येथील रामशेठ ठाकूर …

Read More »

पंतप्रधान मोदींनी विकासकामांच्या माध्यमातून जनतेची मने जिंकली

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक पुणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांच्या माध्यमातून जनतेची मने जिंकली आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान मोदींच्या विकासवादी धोरणाचे पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर कौतुक केले. पंतप्रधान मोदी …

Read More »

‘अभाविप’चा राज्य सरकारविरोधात घंटानाद

विद्यापीठ कायद्यातील बदल मागे घेण्याची जोरदार मागणी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने लोकशाही पायदळी तुडवून गोंधळाच्या वातावरणात शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारे बदल करून विद्यापीठ कायदा असंवैधानिक पद्धतीने पारित केला आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने सोमवारी (दि.28) मुंबई विद्यापीठात घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्य मंत्रिमडळाच्या …

Read More »

अखेर मिवआ सरकार झुकले

खासदार संभाजीराजे यांचे उपोषण मागे मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या दबावापुढे अखेर महाविकास आघाडी सरकार झुकले आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. 28) तीन दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले. राज्य सरकार आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्या …

Read More »

पनवेलमध्ये रॅम्प वॉकद्वारे ज्वेलरीचे प्रदर्शन

बी. बी. बांठिया ज्वेलर्सचा अनोखा उपक्रम पनवेल : वार्ताहर पनवेलमध्ये प्रथमच सप्तपदी वेडींग ज्वेलरी कलेक्शनच्या माध्यमातून नामांकित अशा तरुण व तरुणी वर्ग रॅम्प वॉक केले असून शहरातील सुप्रसिद्ध बी. बी. बांठिया ज्वेलर्स यांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. रायगड जिल्ह्यात प्रथमच ज्वेलरी फॅशन शोचे आयोजन आले होते. त्यामुळे …

Read More »

सीकेटी विद्यालयात शुभचिंतन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता सोमवारी (दि. 28) शुभेच्छा चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजनाने झाली. यानंतर स्व. जनार्दन भगत आणि पिताश्री चांगू काना ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात …

Read More »

खारघरमध्ये नगरसेविका चषक क्रिकेट स्पर्धा रंगली; मुरबी स्पोर्ट्स संघाला विजेतेपद

खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या खारघरमधील नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशनजवळच्या मैदानावर टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुरबी स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकाविले. गोल्डन ईगल अ संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला …

Read More »

केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्या -अमर पाटील

कळंबोली : वार्ताहर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ई-श्रम सेवा सुरू केले आहे. या लाभदायक योजनेचा फायदा घेऊन आपण आपल्या पायावर उभे राहून स्वावलंबी बना, असे आवाहन नगरसेवक अमर पाटील यांनी केले. मोदी सरकारच्या लाभदायक योजना जनतपर्यंत पोहचाव्या म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व गटनेते परेश …

Read More »

विविध उपक्रमांद्वारे मराठीचा जागर

खारघर : रामप्रहर वृत्त कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यांचे औचित्य साधून जनार्दन …

Read More »