Breaking News

Yearly Archives: 2022

मुरूडमध्ये ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा

मुरूड : प्रतिनिधी मराठी आपल्या संस्कारांची भाषा आहे. ग्लोबल युगात मराठी भाषेचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी मराठी माणसाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांनी येथे केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण बोलत होते. मराठी आपल्या …

Read More »

कर्जतमध्ये साखळी पुस्तक योजना

कर्जत ़: बातमीदार मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथसंग्रहालय आणि विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंड यांच्या संयुक्त प्रयत्नाने रविवारी तालुक्यातील 16 आदिवासी पाड्यांवर हुतात्मा नाग्यादादा कातकरी साखळी पुस्तक योजना सुरू करण्यात आली असून पुस्तकांच्या एका संचाचे वाचन झाल्यानंतर दुसरा संच आयोजक देणार आहेत. वाडी-वस्तीत राहणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये …

Read More »

मराठी भाषेचा आदर करा -सचिन मयेकर

कर्जत : प्रतिनिधी सध्याच्या काळात इंग्रजीची गरज आहे, मात्र आपल्या मायबोलीला दुर्लक्षित करून चालणार नाही. आपल्या मराठी भाषेचा आपण कायम आदर ठेवला पाहिजे. आपली मुले इंग्रजी शाळेत शिकत असली तरी घरी शक्यतो मराठी भाषेचा वापर करा, असे आवाहन राज्य परिवहन महांडळाचे रायगड विभागीय भांडार अधिकारी सचिन मयेकर यांनी कर्जत येथे …

Read More »

महाड पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले!

विकासाचा विचार घेऊन महाड नगरपालिकेतील मतदारांनी वेळोवेळी मतदान केले आहे. शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा एक अपवाद वगळता महाड नगरपालिकेत महाडचे शिल्पकार कै. अण्णासाहेब सावंत व त्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार कै. माणिकराव जगताप यांचीच एकहाती सत्ता राहिली आहे. सध्या महाड नगरपालिकेची मुदत संपली असून प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. बहुदा येत्या एप्रिलमध्ये महाड …

Read More »

पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण कामाला वेग; नवीन मार्गिकेचे काम 2024मध्ये करण्याचे उद्दिष्ट

कर्जत : बातमीदार पनवेल-कर्जत या 29 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर दुसरी मार्गिका टाकण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरु आहे. हे दुहेरीकरणाचे काम 2024मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 2024पासून या रेल्वे मार्गावर उपनगरीय प्रवासी सेवा सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत-पनवेल या रेल्वे प्रकल्पाची सुरुवात कोकण रेल्वे बरोबरच …

Read More »

पेण अर्बन बँकेची मालमत्ता शिशिर धारकरांची प्रॉपर्टी नाही! ; संघर्ष समिती कार्याध्यक्ष नरेन जाधव यांचा हल्लाबोल

पेण : प्रतिनिधी बँकेची मालमत्ता विकून ठेवीदारांना येत्या दोन वर्षात पैसे परत देण्याची वल्गना शिशिर धारकर करीत आहेत, मात्र पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची मालमत्ता ही त्यांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही, असा हल्लाबोल संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंन जाधव यांनी पेणमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. संघर्ष समितीने सलग 11 वर्ष उपोषणे, आंदोलने, निदर्शने …

Read More »

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार

महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभारामुळे मराठा समाजाचे आरक्षणासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांना वाचा फोडण्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. राज्य सरकारने आपला शब्द न पाळल्याने मुंबईतील आझाद मैदानात ते आमरण उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रातील तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील समस्या वाढत चालल्या …

Read More »

भाजप युवा मोर्चाच्या शिलेदारांनी अनुभवला ‘पावनखिंड’चा थरार

पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या कठीण काळातून सर्वजण सावरत असताना नव्या जोमाने संघटना बांधणी करून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर होण्याच्या दृष्टीने भाजप युवा मोर्चा पनवेल शहर मंडलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सध्या चर्चेत असलेला ‘पावनखिंड’ हा सिनेमा एकत्र पाहिला. यातून या युवकांना एक वेगळीच ऊर्जा मिळाली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी …

Read More »

मराठी राजभाषा दिन साजरा

पनवेल ः कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण …

Read More »

यूपीत मतदान केंद्राजवळ बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, एक जण जखमी

प्रयागराज ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान रविवारी (दि. 27) भीषण घटना घडली. प्रयागराजमधील करेली येथे एका मतदान केंद्रापासून अवघ्या 10 मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाला असून यात एक तरुण जागीच ठार, तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. प्रयागराज जिल्ह्याचे विशेष पोलीस अधीक्षक अजयकुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, …

Read More »