Breaking News

Monthly Archives: January 2023

सफाई कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील स्थिती वेतन न दिल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ माणगांव : प्रतिनिधी माणगांव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून माणगांव शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. हे रुग्णालय शंभर खाटांचे असून दक्षिण रायगडमधील हजारो नागरिक या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात सफाई, धुलाई, आहार अशा अनेक सेवा ठेकेदारामार्फत पुरविल्या जातात. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत

विविध विकासकामांचे होणार उद्घाटन आणि भूमिपूजन मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि नव्या प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. 19) मुंबईत येत आहेत. या दौर्‍यात वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधानांना हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान …

Read More »

स्वच्छता अभियानात नागरिकांचा खारीचा वाटाफ

नेरूळमध्ये रहिवाश्यांनी केली परिसराची साफसफाई नवी मुंबई : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रत्येकाचा खारीचा  वाटा असेल तरच आपल्या प्रभागासह शहराचेदेखील नाव उंचावले जाते. हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नेरूळ सेक्टर 2 मधील इंद्रधनुष्य अपार्टमेंटसह स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात असूनदेखील …

Read More »

ट्रकच्या चाकाखाली येऊन 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर ठाणे येथून कळंबोली येथील रेल्वे यार्डमध्ये जाणार्‍या 12 चाकी बल्कर ट्रकच्या पाठीमागील चाकामध्ये आल्याने एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंब्रा-पनवेल मार्गावर फुडलँड कंपनीजवळ घडली. कळंबोली पोलिसांनी या अपघातातील ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून राजपत्रात त्याला ताब्यात घेतले आहे. नालासोपारा येथे राहणारा ट्रकचालक राजेश यादव हा रविवारी …

Read More »

उत्तरप्रदेशात खून करून फरार झालेल्या चौघांना खारघरमध्ये बेड्या

पनवेल : वार्ताहर उत्तरप्रदेश राज्यातील देल्हूपूर पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीचा खून करून चार आरोपी फरार झाले होते. त्या आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने खारघर येथून शिताफीने अटक करून त्यांना गुन्हयाच्या पुढील तपासकामी देल्हूपूर पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात दिले आहे. उत्तरप्रदेश राज्यातील जिल्हा प्रतापगढ मधील देल्हूपूर पोलीस ठाणे हद्दीत …

Read More »

राज्यस्तरीय तायक्वांदो पुमसे स्पर्धेत रायगडला सांघिक अजिंक्यपद

मोहोपाडा : प्रतिनिधी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने अहमदनगर येथे आयोजित राज्यस्तरीय पुमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने एकूण 21 पदके मिळवून 1931 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध वयोगटांमधील सुमारे 240 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सब-ज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर व सीनिअर अशा वयोगटांत वैयक्तिक पुरुष व महिला, मिश्र …

Read More »

युद्ध आमुचे सुरू

महाराष्ट्रातील सत्तापालट होऊन जवळपास निम्मे वर्ष उलटले तरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही. अर्थात, या प्रश्नाचे उत्तर कायद्याच्या चौकटीत राहूनच शोधायचे आहे. जनतेच्या मनातदेखील हे उत्तर स्वच्छपणे प्रतिबिंबित झालेले दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हीच खरी शिवसेना आहे असा दावा शिंदे-समर्थक आत्मविश्वासाने करत …

Read More »

उरणच्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना पागोटेत अभिवादन

आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त सन 1984मध्ये उरण तालुक्यात झालेल्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना मंगळवारी (दि. 17) भाजपचे रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी पागोटे येथे अभिवादन केले. या वेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली तसेच हुतात्मा …

Read More »

अलिबाग पात्रूदेवी मंदिरात चोरी करणारा 24 तासांत गजाआड

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड येथील पात्रुदेवीची मूर्ती चोरून नेणार्‍या चोरट्याला अलिबाग पोलिसांनी 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. अहमदनगर येथे जाऊन त्याला अटक करण्यात आली. एका चोरट्याने 11 ते 12 जानेवारीदरम्यान रात्रीच्या वेळेस पेण-अलिबाग मार्गावरील कार्लेखिंड येथील मंदिराचे कुलूप तोडून पात्रूदेवीची मूर्ती व इतर सात हजार 800 रुपये किमतीचे …

Read More »

वाढत्या नागरीकरणासाठी तिसरी मुंबई आवश्यक

नवी मुंबईचे वाढते औद्योगीकरण, नैना प्रोजेक्ट यामुळे वाढणारे नागरीकरण यामुळे मुंबईसह नवी मुंबईवर पडणारा ताण कमी करण्यासाठी पनवेल महापालिका 2016 मध्ये अस्तित्वात आली. या तिन्ही महापालिकांवर वाढत्या नागरिकरणामुळे पायाभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणे जिकरीचे झाले आहे. लवकरच सुरू होणार्‍या विमानतळामुळे त्यात भरच पडणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने जानेवारी …

Read More »