सहा आरोपींना 24 तासांत अटक आठ लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त पनवेल ः वार्ताहर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भाताण बोगद्याच्या अगोदर सहा जणांच्या अज्ञात टोळीने एका व्यक्तीस लाखो रुपयाला लुटल्याची घटना घडली. या प्रकारानंतर गाडी तेथेच सोडून ती टोळी पसार झाली. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच, पोलिसांनी या …
Read More »Monthly Archives: February 2023
डिलेव्हरी बॉयकडूनच कंपनीमध्ये चोरी
सात लाख 62 हजारांचा घातला गंडा पनवेल ः वार्ताहर ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंची डिलिव्हरी करणार्या डिलिव्हरी बॉयनेच 22 महागड्या मोबाईलची चोरी करून कंपनीला तब्बल सात लाख 62 हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कलिमखान बाबुखान पठाण (34) असे डिलिव्हरीबॉयचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे, तसेच त्याच्या …
Read More »महाडजवळ केमिकल टँकर उलटला
मुंबई गोवा महामार्ग तीन तास ठप्प महाड ः प्रतिनिधी महाड एमआयडीसीत केमिकल घेऊन येणारा टँकर शुक्रवारी (दि. 3) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव हद्दीत उलटला. त्यामुळे महामार्ग तीन तास ठप्प झाला होता. महामार्ग वाहतूक पोलीस आणि महाड शहर पोलीस यांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. तारापूर एमआयडीसीतील लुपिन लिमिटेडमधून महाड …
Read More »कर्मवीरांच्या शिक्षण प्रणालीत समाज घडविण्याची ताकद – लोकनेते रामशेठ ठाकूर
महात्मा फुले महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्त शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समाजाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या शिक्षण प्रणालीत समाज घडविण्याची ताकद आहे. त्याचाच वारसा घेऊन आपण पुढे वाटचाल केली तर लवकरच आपला देश महाशक्ती म्हणून उदयास येऊ शकतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल …
Read More »मुंबई-पुणे वंदे भारत ट्रेनची चाचणी
कर्जतमध्ये प्रवाशांनी व्यक्त केला आनंद कर्जत ः प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडताना मुंबई-पुणेदरम्यान वंदे भारत रेल्वेगाडी चालविण्यात येईल, अशी घोषणा केली होती. पूर्ण वातानुकूलित आणि हायस्पीड ट्रेनसारखा लूक असलेल्या वंदे भारत गाडीची लगोलग पुणे-मुंबईदरम्यान चाचणी घेण्यात आली. मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि पुणे मार्गावरील प्रवाशांना सुखद …
Read More »महाड पालिकेच्या कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला आग
सुमारे 25 लाखांचे नुकसान महाड ः प्रतिनिधी महाड नगर परिषदेच्या लाडवली येथे असणार्या कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला शुक्रवारी (दि. 3) पहाटे वणव्यामुळे आग लागली. या आगीत केंद्रातील कचर्यासह त्यावर करायवच्या प्रक्रियेच्या यंत्रसामग्रीचे सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महाड शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असणार्या लाडवली गावामध्ये पालिकेचे ओला …
Read More »उंबरखिंड विजय दिन उत्साहात
खोपोली ः प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने उंबरखिंडची लढाई सरनौबत नेताजी पालकर यांनी 2 फेब्रुवारी 1661 रोजी जिंकली. त्याचा 362वा विजय दिन गुरुवारी ग्रुप ग्रामपंचायत चौक व तुपगाव तसेच नेताजी पालकर ग्रुपच्या वतीने साजरा करण्यात आला. उत्तर कोकण जिंकण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्ते खानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्याविरोधात लढण्यासाठी पाठविले. …
Read More »उरण द्रोणागिरी नोडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत उरण ः वार्ताहर उरणचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून द्रोणागिरी नोड येथील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष …
Read More »118 कामगारांना कमी केल्याच्या निषेधार्थ तळोजातील केमस्पेस केमिकल कंपनीसमोर गेट बंद आंदोलन
आमदार प्रशांत ठाकूर यांचा व्यवस्थापनाला इशारा तळोजा ः रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमस्पेस केमिकल कंपनीने 118 कामगारांना कामावरून काढले आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. 2) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन करण्यात आले. या वेळी त्यांनी येत्या आठवड्यामध्ये कंपनी व्यवस्थापनाला तुम्हाला कामावर घ्यायला तरी लावणार …
Read More »ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा पनवेल भाजपकडून जल्लोष
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल ः महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयाजवळ बँड व फटाके वाजवून, पेढे वाटून, नाचून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निवडणुकीसाठी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे या वेळी सर्वांनी अभिनंदन केले. या जल्लोषात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper