कायमस्वरूपी कारवाई करण्याबाबत नागरिकांची मागणी पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे मार्गावर कळंबोली मॅकडोनाल्ड जवळ सध्या बेकायदा टपर्या दिवसेंदिवस थाटल्या जात आहेत. या बेकायदा पद्धतीत सुरू असलेल्या धंद्याला कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने ते राजरोसपणे या मार्गावरील फुटपाथवर चायनीज, अंडापाव, वडापाव, भजी, समोसे, थंडपेय, सिगारेट, गुटखा आदी पदार्थांची विक्री करत आहेत. या टपर्यांमुळे …
Read More »Monthly Archives: April 2023
व्हॉट्सअॅपद्वारे ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून सेक्सरॅकेट चालवणार्या दोघांना खारघरमधून अटक
पनवेल : वार्ताहर वेश्यागमनासाठी व्हॉट्सअॅपद्वारे ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून सेक्सरकेट चालवणार्या महिला दलालासह दोघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने खारघरमधून सापळा लावून अटक केली आहे. तसेच त्यांच्या तावडीतून दोन मुलींची सुटका केली आहे. खारघर परिसरातील दलाल समीर (फिरोज खान) तसेच त्याच्या दोन महिला सहकारी हे तिघेही ग्राहकांना व्हॉट्सअॅपद्वारे वेश्यागमनासाठी मुलींचे …
Read More »स्वच्छता मॅानिटर प्रकल्पांतर्गत श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयाची सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये निवड
उरण : वार्ताहर मिशन स्वच्छ भारत या योजनेंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी ’स्वच्छता मॉनिटर’ जबाबदारी स्वीकारून इतरांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम दि. 2 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात आला होता. या उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणार्या उरण तालुक्यातील जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या …
Read More »रोह्यात प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्याचा शुभारंभ
रोहे : प्रतिनिधी सरकारने कृषी विभागासाठी अर्थसंकल्पामध्ये चांगली तरतूद केली आहे. त्यामुळे निधीची कमतरता नाही. आंब्याचे मोठे नुकसान यावर्षी झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंबासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल. कोकणातील शेतकर्यांसाठी सुपारी संशोधन केंद्राला व काजू प्रक्रिया यासाठी निधी देण्यात येईल. यांसह काढणी पश्चात तंत्रज्ञान या विद्यालयात पीएचडीला तत्वतः मान्यता देत …
Read More »डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी पुण्यातून तरुणाला अटक
अलिबाग : प्रतिनिधी ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी शुभम काळे या तरुणाला रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. शुभम काळे याला सोमवारी (दि. 24) अलिबाग न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. खारघर येथील महाराष्ट्र …
Read More »मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर एका तासात तीन अपघात; एकाचा मृत्यू
काही काळ वाहतूक ठप्प खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी (दि. 24) पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात घडले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून या अपघातांमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पहिला अपघात 5 वाजता पुणे लेनवर झाला. मुंबई लेनवर बोरघाट अमृतांजन ब्रिजच्या दरम्यान हनुमान मंदिराजवळ खासगी …
Read More »प्रियकराच्या सहाय्याने केली पतीची हत्या
आरोपी पत्नीसह प्रियकराला अटक पनवेल : वार्ताहर प्रेमात अडसर ठरणार्या पतीला पत्नीने प्रियकराच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर गपचूप पळून जाणार्या पत्नी आणि प्रियकराला मानपाडा पोलिसानी अवघ्या तीन तासांच्या आत अटक केली. मारुती लक्ष्मण हांडे (वय 55, रा. कर्जत) यांचे संध्या सिंग नावाचे …
Read More »नेरळमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
कर्जत ः प्रतिनिधी नेरळ शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नेरळसाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्चाची नवी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबवली जात आहे. या योजनेचे भूमिपूजन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रविवारी (दि. 23) करण्यात आले. नेरळ मोहचीवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ झालेल्या या …
Read More »सांगलीत विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती
सांगली ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील विसापूर राजमित्र रामचंद्र शामराव माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान (कृषी) ज्युनिअर या ठिकाणी विद्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन व मुख्याध्यापक एस. एम. मुलाणी यांचा सेवानिवृत्ती सत्कार असा संयुक्त समारंभ शनिवारी (दि. 22) झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, तर प्रमुख …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गव्हाण येथे स्वच्छता अभियान
भाजप नेते अरुणशेठ भगत, परेश ठाकूर यांनी केली पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्त कष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक दिवंगत जनार्दन आत्माराम भगत यांची 35वी पुण्यतिथी येत्या 7 मे रोजी आहे. यानिमित्ताने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 30 एप्रिल आणि 1 व 2 मे रोजी पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत …
Read More »