मुंबई : राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (दि. 16) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे. या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. …
Read More »Monthly Archives: April 2023
खंडाळा घाटातील अपघातात 12 जणांचा मृत्यू
28 जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून तातडीने अपघातस्थळी पाहणी खोपोली : प्रतिनिधी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात शनिवारी (दि. 15) पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 28 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जण गोरेगाव, मुंबई …
Read More »महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी नियोजन; पनवेल मनपा हद्दीतील शाळांना आज सुटी
कळंबोली : बातमीदार ज्येष्ठ निरूपणकार श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने रविवारी (दि. 16) खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून शुक्रवारपासूनच श्री सदस्य पनवेलमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे शनिवारी पनवेल महापालिका क्षेत्रातील खासगी व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना गर्दीचा किंवा वाहतूक कोंडीचा सामना करावा …
Read More »जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांनी नामवंत व्हावे
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन; केबीपी कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण नवी मुंबई : बातमीदार विद्यार्थी जीवनात यश, अपयश येत असते, परंतु अपयशाने खचून न जाता आपले करिअर घडवयाचे असते. जीवनात खेळाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. मन प्रसन्न करण्यासाठी खेळ आवश्यक असतो. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात प्रगती करून स्वतःचे व कॉलेजचे नाव …
Read More »महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
पनवेल, उरणमध्ये परिसरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती शुक्रवारी पनवेल तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंत्तीनिमीत्त सुकापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती 2023, पालदेवद ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने तक्षशिला बुद्धविहार येथे …
Read More »सर्वांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी-आमदार प्रशांत ठाकूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीत सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केलेले कार्य, दलित, बहुजन समाजासाठीचे त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे. ज्या समर्पित वृत्तीने त्यांनी काम केले ते न भूतो न भविष्यती असे आहे. त्यामुळे सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड …
Read More »आनंदाचा शिधा उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी आनंदाचा शिधा उपक्रम सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद देणारा ठरेल. हे काम खरेतर खूप मोठे असून हा उपक्रम राबवताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद …
Read More »महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पूर्वतयारी वेगात -पालकमंत्री उदय सामंत
कार्यक्रमस्थळी चोख आरोग्य व्यवस्था नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या वतीने दिला जाणार्या महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी नवी मुंबईतील खारघर कॉर्पोरेट पार्क येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून उपस्थित राहणार्या जनसमुदायाच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात यावी. त्यासाठी शासकीय यंत्रणा आणि श्रीसदस्य यांनी परस्परांमध्ये समन्वय साधून कार्यक्रमस्थळी वैद्यकीय सेवेचे सुयोग्य …
Read More »ऐतिहासिक चरी स्मारकाकडे लक्ष देण्याची गरज
अलिबाग तालुक्यातील ऐतिहासिक चरी स्मारकाकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत. चरी स्मारक का उभारण्यात आले व त्याला ऐतिहासिक महत्त्व का आहे, याची सविस्तर माहिती या सदरामधून देण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील शेतकर्यांनी 1933 ते 1939 असा सहा वर्षे ऐतिहासिक संप केला होता. त्याची दखल आंतरराष्ट्रीय …
Read More »मिट्टी में मिला दिया
उत्तर प्रदेशातील माफिया इतकी वर्षे कोणी जोपासला? असंख्य गुन्हे नावावर असतानाही गुंडांना पक्षाची उमेदवारी देण्याचे धाडस कोण दाखवत होते? काही स्वार्थांध राजकारण्यांच्या कृपाछत्रामुळेच उत्तर प्रदेशात संघटित गुन्हेगारी फोफावली. माफिया डॉन कितीही मोठा असला तरी त्याची पर्वा न करता त्यांना मातीत घातले जाईल… हम उन्हें मिट्टी में मिला देंगे असे उद्गार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper