Breaking News

Monthly Archives: June 2023

गावठी आंब्यांना खवय्यांची पसंती

पाली : प्रतिनिधी खराब हवामान व अवकाळी पावसामुळे यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. आवक कमी झाल्याने हापूस आंब्याचे दर हंगाम सरत चालला असला तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे हापूस आंबे खाणे सर्वसामान्यांसाठी अवघड होऊन बसले असून बाजारात गावठी आंबे दाखल झाल्याने खवय्ये त्यांची खरेदी करीत आहेत. …

Read More »

‘महावितरण’चा नागरिकांच्या जिवाशी खेळ!

स्पार्किंग होत असलेल्या विद्युत पोलकडे डोळेझाक; नागरिकांचा संताप पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील उरण रोड येथील कोळीवाड्याकडे जाणार्‍या मुख्य मार्गावरील विद्युत पोलवर स्पार्किंग होत असून त्याकडे महावितरण कंपनीकडून चक्क दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीचा बेफिकीर कारभार पनवेलमध्ये पहावयास मिळत आहे. आधीच …

Read More »

केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्रच!

पावसाची चाहूल लागली की बेडकांची डराव डराव ऐकू येऊ लागते. काही बेडक्या अकारण फुगतात. त्याचे प्रत्यंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज दिसतेच आहे. जनमताचा धडधडीत अपमान करून उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कट्टर विरोधक राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दावणीला बांधली. केवळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी जनमत लाथाडण्याचे पाप …

Read More »

रायगड पोलीस भरतीमधील बोगसगिरी उघडकीस

चार उमेदवारांना ठोकल्या बेड्या अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलात झालेल्या भरतीमधील बरेगसगिरी उघड झाली आहे. भरती प्रक्रियेत चार उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चारही उमेदवारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. …

Read More »

पनवेल एसटी स्थानक होतेय चकाचक

एसटी स्थानक म्हटले म्हणजे अस्वच्छता , बसायला मोडकी बाके, आजूबाजूला मारलेल्या पिचकार्‍या आणि अस्वच्छ शौचालय हे चित्र डोळ्यासमोर येते, पण पनवेल एसटी स्थानकावर गेल्यावर सध्या वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. स्वच्छ फलाट तेथे ठेवलेल्या कुंड्या लक्ष वेधून घेतात. आजूबाजूचा परिसर ही स्वच्छ दिसतो आहे. त्यामुळे आपल्याला पनवेल स्थानकाचे रूप बदलेले …

Read More »

रोह्यात पावसाला जोरदार सुरुवात

रोहे ः प्रतिनिधी गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहत असतानाच अखेर सोमवारी (दि. 12) सायंकाळी रोह्यात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला आहे, परंतु सोसाट्याचा वारा सुटला असल्याने गेले तीन दिवस विजेचा लंपाडाव सुरू होता. बिपरजॉय वादळामुळे यावर्षी पाऊस कोकणात उशिराने दाखल झाला. असे असजे …

Read More »

विकासकामांसाठी पुढाकार महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 2 कोटी 80 लाखांच्या निधीतून रस्त्यांचा विकास पनवेल : रामप्रहर वृत्त विकासाच्या कामांसाठी पुढाकार महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 13) केले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दोन कोटी 80 लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास …

Read More »

रायगडाच्या पायथ्याशी दरड कोसळून दुकान, वाहनांचे नुकसान

सुदैवाने पर्यटक बचावले महाड : प्रतिनिधी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाजामध्ये मंगळवारी (दि. 13) दुपारी तीनच्या सुमारास दरड कोसळून किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकांच्या तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे येथे व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकाच्या दुकानाचेदेखील नुकसान झाले. वाहनांमधील पर्यटक किल्ल्यावर गेले असल्याने सुदैवाने ते बचावले. पावसानंतर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाजामध्ये दरड …

Read More »

ऑईल टँकर पेटून तीन जणांचा होरपळून मृत्यू, तिघे जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दुर्घटना खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात एका ऑइल वाहतूक करणाार्‍या टँकरचा मंगळवारी (दि. 13) अपघात होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर खंड्याळ्यातील खासगी रुग्णालयात व पवना येथील ट्रामा केअर येथे उपचार सुरू आहेत. …

Read More »

कोर्लई ग्रामपंचायतीमधून महत्त्वाची कागदपत्रे गहाळ; चौकशीचे आदेश

अलिबाग : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या मालकीच्या 19 बंगले प्रकरणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. कोर्लई ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मुरूड पंचायत समितीच्या गटविकास …

Read More »