Breaking News

Monthly Archives: July 2023

पेणमध्ये भाजपच्या संपर्क अभियानाला वाढता प्रतिसाद

पेण ः रामप्रहर वृत्तसंस्था मोदी सरकारच्या काळातील यशस्वी योजनांची जनतेसमोर मांडणी मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याने भाजपतर्फे मोदी सरकारने जनतेसाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मोदी ऽ 9 या कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला पेणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पेण तालुक्यातील रावे, दादर, जोहे, …

Read More »

रायगडात भटक्या श्वानांची दहशत कायम

वर्षभरात सहा हजार 427 अधिक  लोकांवर हल्ले अलिबाग ः प्रतिनिधी  रायगड जिल्ह्यात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात भटक्या श्वानांनी वर्षभरात सहा हजार 427 अधिक लोकांवर हल्ले केले आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी 82 जणांना श्वानदंश होत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. कुत्र्यांमुळे होणार्‍या अपघातांचे …

Read More »

स्वस्तिका घोषने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकाविले रौप्यपदक

पनवेल : रामप्रहर वृत्त नार्कोटिक बोर्ड ऑफ रिपब्लिक ऑफ इंडोनेशियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 तसेच इंडोशियन क्लब लीग सेशन या दोन्ही स्पर्धांमध्ये पनवेलच्या स्वस्तिका घोष हिने महिला एकेरी खुल्या गटात रौप्यपदक पटकावित भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन …

Read More »

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही!

मुंबई : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगातर्फे 5 जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे चे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे …

Read More »

रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

मुंबई : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा करीत असून अनेक आंदोलने, उपोषणे करून या अन्यायग्रस्त शेतकर्‍यांचा लढा सुरू आहे. या संदर्भात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने गुरुवारी (दि. 6) रायगडचे पालकमंत्री उदय सांमत यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी …

Read More »

रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक जिल्हा वार्षिक योजना निधीतून मोर्बे ते कोंडले, मोर्बे तलाव ते करंबेली तर्फे तळोजा रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) झाले. पनवेल विधानसभा मतदार …

Read More »

झोपडपट्टीधारकांचे होणार पुनर्वसन

पनवेल महापालिका बांधणार अडीज हजार घरे पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने दोन हजार 600 घरे बांधण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला याठिकाणी इमारती बांधण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने झोपड्या रिकाम्या करण्यासाठी झोपडीधारकांना नोटीसा देण्यात आल्या, मात्र पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला …

Read More »

पनवेल देवद येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त जल जीवन मिशन योजनेतंर्गत पनवेल तालुक्यातील देवद येथे नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी अणि नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 90 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून साकारण्यात येणार्‍या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 6) आमदार …

Read More »

पनवेल बसस्थानकाच्या पुनर्विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक

ठेकेदाराला 15 दिवसांचा अल्टीमेटम; प्रधान सचिव पराग जैन यांचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल बसस्थानक पुनर्विकासाच्या कामासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक झाल्याने येत्या 15 दिवसांत बसस्थानकाच्या कामाला सुरुवात न झाल्यास ठेका रद्द करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी इडयुस पार्क इंटरनॅशनल कंपनीला दिले आहेत. परिवहन विभागाचे …

Read More »

वीज समस्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार शनिवारी खांदा कॉलनीत बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विद्युत पुरवठ्यासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार तसेच त्यांच्या आणि विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 8) दुपारी 3 वाजता खांदा कॉलनीतील श्रीकृपा हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. वीजपुरवठा व त्या अनुषंगाने …

Read More »