Breaking News

Monthly Archives: July 2023

लोकांचे सहकार्य हवे

भारतात रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण इतके प्रचंड का आहे, या प्रश्नाचे अर्धेअधिक उत्तर देशातील अलीकडच्या तीन मोठ्या रस्तेअपघातांच्या तपशीलांत मिळून जाते. काहीही घडले की सरकारकडे बोट दाखवायचे हा विरोधीपक्षांच्या दैनंदिन कामकाजाचा भाग आहे, परंतु एकीकडे देशातील महामार्गांचे जाळे कैकपटींनी विस्तारत असताना अपघातांचे प्रमाण आटोक्यात येत नसेल तर या अपघातांच्या तपशीलांत जाऊन …

Read More »

नेरळमध्ये एकाच रात्रीत तीन दुकाने फोडली

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री नेरळ बाजार पेठेतील एक मोबाईल शॉप, किराणा दुकान व चप्पलचे दुकान फोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नेरळमध्ये या आधीही एकाच रात्री झालेल्या तीन घरफोड्या झाल्या होत्या. …

Read More »

घरोघरी केंद्र सरकारच्या योजना पोहचवा भाजप नेते वैकुंठ पाटील यांचे आवाहन

पेण तालुक्यात मोदी @  9 अभियान पेण : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यात मोदी ऽ 9 अभियानांतर्गत घर घर चलो मोहीम हमरापूर विभागातील उर्नोली येथून सुरू करण्यात आली. अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन भाजप नेते वैकुंठ पाटील यांनी सोनखार येथे बोलताना केले. मोदी 9 घर घर चलो अभियानाला …

Read More »

रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट

अलिबाग : प्रतिनिधी हवामान विभागाकडून 6 जुलै रोजी रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील दरडग्रस्त, पूरप्रवण, खाडीलगत सखल भागात राहणार्‍या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. …

Read More »

खारघरमध्ये अवघ्या दहा मिनिटांमध्ये सोनसाखळी चोरांची दोन ठिकाणी चोरी

अवघ्या दहा मिनिटांमध्ये सोनसाखळी चोरांची दोन ठिकाणी चोरी पनवेल : वार्ताहर चैन स्नॅचींग करणार्‍या लुटारूंनी खारघरमध्ये अवघ्या दहा मिनिटांमध्ये दोघांच्या अंगावरील सुमारे 92 हजार रुपये किंमतीचे दागिने लुटून पलायन केल्याची घटना घडली आहे. खारघर पोलिसांनी या लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. खारघर सेक्टर 7 मध्ये राहणार्‍या विमल झरेकर …

Read More »

शेतकर्‍यांची ई-केवायसी करण्यात कोकणात रायगड जिल्हा अव्वल

अलिबाग : प्रतिनीधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) अंतर्गत शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या अनुदानासाठी रायगड जिल्ह्यातील 93 टक्के शेतकर्‍यांचे ई-केवायसी करण्यात आले आहे. या योजनेसाठी शेतकर्‍यांची ई-केवायसी करण्यात कोकणात रायगड जिल्हा अव्वल क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019पासून पीएम किसान योजना सुरू केली. सातबारा असलेल्या पात्र शेतकर्‍यांना वार्षिक सहा …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिवनेरी बसला अपघात; सात जण जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटातील खोपोली बायपासजवळ ढेकू गावाच्या हद्दीत शिवनेरी बसने ट्रकला मागून धडक दिल्याने चालक व सहा प्रवासी असे सात जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (दि. 4) रात्री 11.30च्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार शिवनेरी बस (एमएच 12-व्हीएफ 3924)वरील चालक विकास लाड (वय 40, …

Read More »

लाच स्वीकारताना महिला तलाठीला रंगेहाथ पकडले

अलिबाग : प्रतिनिधी वडीलोपार्जित मिळकतीच्या सातबारा उतार्‍यावर वडिलांच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारस म्हणून नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अलिबाग तालुक्यातील बामणोलीच्या महिला तलाठीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पल्लवी यशवंत भोईर (वय 39) लाचखोर तलाठीचे नाव आहे. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पल्लवी यशवंत भोईर यांची खंडाळा …

Read More »

वर्षपूर्तीनिमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका पहिले वर्ष सुराज्याचे आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य या मासिकाचे प्रकाशन मंगळवारी (दि. 4) करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी …

Read More »

कळंबोलीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शिक्षकांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त वरिष्ठांचे मार्गदर्शन, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि आई-वडिलांचे पाठबळ कायम राखत मोठी झेप घ्या, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे केले. ते विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सत्कार समारंभात बोलत होते. नवरत्न युवा संघटनेच्या वतीने दहावी आणि बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा …

Read More »