Breaking News

Yearly Archives: 2023

फूडलँन्ड कंपनीजवळील उड्डाणपूलाच्या काँक्रीटीकरण कामाबद्दल सिडकोचे आभार

पनवेल : वार्ताहर सिडको तर्फे कळंबोली ते तळोजा एमआयडीसी यांना जोडणार्‍या फूडलँन्ड कंपनीजवळील उड्डाणपूलाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तळोजा एमआयडीसीमधील उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या पुलाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू केल्याबद्दल तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने सिडकोचे आभार मानले आहे. कळंबोली ते तळोजा एमआयडीसी यांना जोडणार्‍या फूडलँन्ड कंपनीजवळील उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणात …

Read More »

शिवजयंतीनिमित्त पनवेलमध्ये निघणार भव्य दिव्य मिरवणूक

सहभागी होण्याचे महापालिकेच्या नियोजन बैठकीमध्ये आवाहन पनवेल : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने लोकसहभागातून महानगरपालिकेच्यावतीने आयोजित करण्यात येणार्‍या पनवेल शहरामधील मिरवणूकीची नियोजन बैठक सोमवारी (दि. 13) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आली. यावर्षी महापालिकेच्या माध्यमातून लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. …

Read More »

व्हेल माशाची 18 कोटींची उलटी जप्त

सांगली : प्रतिनिधी व्हेल माशाची उलटीची (अंब्ररग्रिस) तस्करी करणार्‍या मुख्य सूत्रधाराला सांगली पोलिसांनी अटक करून, 18 कोटी 60 हजार मूल्याची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. मुख्य संशयितास पुढील तपासासाठी सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने मंजूर केला आहे. याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चार दिवसांपूर्वी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांनी साधला शेतकर्‍यांशी संवाद

कामोठे येथील कृषी महोत्सवाला दिली सदीच्छा भेट पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथे 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान, रायगड जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 12) भेट देत शेतकर्‍यांशी संवाद साधला. यासोबतच रायगड जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड मेहनत …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून विचुंबेत रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून व विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या प्रयत्नांतून 25,15 इतर ग्रामविकास कार्यक्रम सन 2022-23 लेखाशिर्ष अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण हे काम मंजूर झाले आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर माऊली सोसायटी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ करण्यात …

Read More »

हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी मागणार्‍या महिलेस अटक

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात जमीन विकत घ्यायची आहे, असे सांगून ओळख वाढवून एका महिलेने तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. त्यानंतर त्याच्याकडून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेस तिच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने हनीट्रॅपमध्ये अडकवून आणखी काही तरुणांकडून पैसे घेतले असल्याचे बोलले जात आहे. सुरुवातील फोनवरून बोलून ओळख …

Read More »

पनवेलच्या जडणघडणीत सिंधुदुर्गवासियांचा मोलाचा वाटा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त सिंधुदुर्गवासियांच्या स्वभावातच हापूस आंब्याचा गोडवा पूर्णपणे भरलेला असून ते आपल्या अथक परिश्रमाने कोकणची समृद्धी वाढवत आहेत, तसेच पनवेलच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा हातभार लागत आहे, असे गौरवोद्गार भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाच्या स्नेहसंमेलनामधे प्रमुख …

Read More »

पोलीस मदतीसाठी 112 क्रमांकाची मदत होणार

अलर्ट नवी मुंबईकर उपक्रमाचे उद्घाटन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गुन्हा किंवा अपघात घडल्यावर त्वरित प्रतिसाद (गोल्डन हवर) अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी 112 क्रमांक महत्वाची भूमिका बजावू शकतो. असे प्रतिपादन पोलीस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी केले. आज अलर्ट नवी मुंबईकर उपक्रमाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पोलीस मदतीसाठी 112 …

Read More »

अतिवेगाने धावणार्‍या वाहनांवर कारवाई

स्पीड गनद्वारे 37 लाखांहून अधिकचा दंड वसूल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील पामबीच मार्ग, सायन-पनवेल मार्ग, ठाणे-बेलापूर या महामार्गावरील अतिवेगाने धावणार्‍या वाहनांवर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यानुसार गेल्या दीड वर्षात स्पीड गनच्या माध्यमातून जवळपास 11 हजार 237 वाहनांवर कारवाई केली असून 37 लाखांहून …

Read More »

सुदृढ आरोग्यासाठी खेळाचे महत्त्व अधिक -परेश ठाकूर

पनवेल युवा चषकाचा व्यापारी संघ मानकरी पनवेल : रामप्रहर वृत्त आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. व्यायामाचे महत्त्व अधिक आहे आणि म्हणूनच आपण मैदानी खेळ खेळून शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे. आयुष्यात खेळाचे महत्त्व अधिक असल्याचे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. जागृती फाउंडेशन आणि श्री …

Read More »