अलिबाग : रामप्रहर वृत्त दाखलपूर्व आणि प्रलबिंत खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने रायगड जिल्ह्यात शनिवारी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात वादपूर्व व दाखल अशी एकूण 37 हजार 763 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली. …
Read More »Yearly Archives: 2023
मातीच्या चुली, मडक्यांना मागणी वाढली
माणगाव ः प्रतिनिधी मातीपासून बनविल्या जाणार्या वस्तूंना हिवाळ्याच्या दिवसात चांगली मागणी असून मातीच्या चुली व मडक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागात लग्नसराई, इतर कार्यात जेवण बनविण्यासाठी मातीपासून बनवलेल्या चुली आजही वापरण्यात येतात, तसेच उन्हाळी दिवसात पिण्याच्या पाण्याचा थंडावा मिळण्यासाठी मातीची मडकी घरोघरी वापरण्यात येतात. हिवाळ्यात होणार्या पोपटी पार्टीसाठी …
Read More »पैठणच्या सरपंचांसह सदस्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश
पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील पैठण ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये रविवारी (दि. 12) प्रवेश केला. पैठणच्या सरपंच शीतल येरूणकर, उपसरपंच, सदस्य शारदा मोरे, सुनीता सावंत, अरूण दरेकर, अंकिता मोरे यांच्यासह इतर सदस्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेत …
Read More »खोपोलीमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
खोपोली ः प्रतिनिधी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष रस्ता अनुदान व वैशिष्ट्यपूर्ण योजना निधीतून पूर्णत्वास आलेल्या खोपोलीतील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन रविवारी (दि. 12) करण्यात आले.यात नगरपालिका क्षेत्रातील हाळ येथील रस्त्याचे डांबरीकरण, शेडवली येथे सामाजिक सभागृह, चिंचवली येथील गार्डन विकसित करणे व सभागृह निर्मिती, सुभाष नगर येथील गार्डनमध्ये विकास, …
Read More »राजिपची जागरूक पालक सुदृढ बालक मोहीम
बालकांची आरोग्य तपासणी सुरू अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या समन्वयाने जागरूक पालक सुदृढ बालक मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत 18 वर्षांपर्यंतच्या सुमारे चार लाख 61 हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …
Read More »रोहा भुवनेश्वरच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कालव्यात सोडले जातेय सांडपाणी; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी रोहे ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील भुवनेश्वर हद्दीतून जाणार्या कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी इमारतीतून सांडपाणी सोडतात. या सांडपाण्याला दुर्गंधी येत असून मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत …
Read More »राष्ट्रीय अॅबेकस स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या विद्यार्थिनीचे सुयश
पनवेल ः रामप्रहर वृत्त पुणे येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अॅबेकस स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अन्वी प्रियेश खोडाडे हिने द्वितीय पारतोषिक पटकाविले. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले. राष्ट्रीय अॅबेकस स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अन्वी प्रियेश …
Read More »माणगावमध्ये सह्याद्री मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
लक्ष्मण दरवाडा, गायत्री पाटील अव्वल ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षेची खास उपस्थिती माणगाव ः प्रतिनिधी टीडब्लूजे (ट्रेड विथ जाझ) आणि सह्याद्री स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) सह्याद्री मॅरेथॉन 2023चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला यंदाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेता शिवराज राक्षे याची उपस्थिती खास …
Read More »एसएसआरटी विद्यालयात विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर (एसएसआरटी) विद्यालयात एसएससी मार्च 2023च्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा शुक्रवारी (दि. 10) आयोजित करण्यात आला होता. रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रयतचे सचिव डॉ. गणेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी एसएससीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना …
Read More »कामोठे येथे मराठा महामेळावा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई महानगर क्षेत्रातील मराठा उद्योजकांच्या व्यवसायांची ब्रॅन्डींग आणि समाजाशी बॉन्डींग करण्यासाठी मराठा महामेळावा कामोठे येथे आयोजित करण्यात आला आहे. अस्तित्वाची जाण आणि आत्मभान देणारा हा महामेळावा 10 ते 19 फेब्रुवारी यादरम्यान कामोठे येथील पोलीस स्टेशन ग्राऊंडवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …
Read More »