आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन मोहोपाडा : प्रतिनिधी जल जीवन मिशन अंतर्गत सावळे येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवारी (दि.11) उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सावळे गावचे सरपंच सतिश म्हस्कर, उपसरपंच प्रगती जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी, रश्मी गाताडे, कांता कांबळे, कविता माळी, तसेच …
Read More »Yearly Archives: 2023
रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 10) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक दिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी …
Read More »खारघरमध्ये भाजपच्या बदनामीचा घाट
पदाधिकारी आक्रमक खारघर : रामप्रहर वृत्त खारघरच्या माजी नगरसेवकांवर हफ्तेखोरीचा आरोप करणारी बातमी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात शनिवारी (दि. 11) प्रसिद्ध झाली होती. असे कृत्य जाणीवपूर्वक भाजपला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वनियोजित कटानुसार केले आहे, असा आरोप भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे यांनी केला आहे. सचिन …
Read More »जेएनपीटी प्रकल्पबाधित 1630 मच्छीमार लाभार्थ्यांना मिळणार नुकसानभरपाई!
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पाठपुरावा; तहसील कार्यालयामार्फत शिबिर पनवेल : रामप्रहर वृत्त जेएनपीटी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या 1630 मच्छीमार लाभार्थ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नुकसानभरपाई मिळणार आहे. या लाभार्थ्यांची कागदपत्रे आणि बँक खात्याचा तपशील घेण्याकरिता शुक्रवारी (दि. 10) उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये …
Read More »सांगुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच पद्माकर कातकरी यांचा भाजपमध्ये प्रवेश
उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सांगुर्ली ग्रुप ग्रामपंचायतीचे शेकापचे विद्यमान सरपंच पद्माकर कातकरी यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप नेते मंगेश वाकडीकर, विद्याधर जोशी, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य शरद वांगीलकर, संतोष पारधी, सुवर्णा जगदीश …
Read More »‘व्हॅलेंटाईन डे’ची खास भेट अवयवदानातूून वाचविले प्राण
पनवेल : वार्ताहर प्रेमाचा सण म्हणजेच व्हॅलेंटाईन डे या दिवशी प्रत्येजण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेम व्यक्त करतात. खारघर येथील मेडीकव्हर रूग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. प्रेमदिनी ही एक अनोखी बाब असून आपल्या प्रिय व्यक्तीला नवं आयुष्य मिळवून देण्यासाठी त्यांच्या प्रियजनांकडून अवयव दान करण्याचे उचललेले धाडसी पाऊल आहे. दात्यांनी …
Read More »शासकीय सवलतींसाठी दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र आढल्यास निलंबन
खारघर : प्रतिनिधी दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र देणार्या जवळपास 78 शिक्षकांचे बीड जिल्ह्यात निलंबन करण्यात आले आहे. बदली करण्यासाठी अनेक शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचे उघड या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बदलीसाठिचा हा प्रकार धक्कादायक आहे.पनवेल तालुक्यात देखील तब्बल 850 शासकीय शिक्षक कार्यरत आहेत.तालुक्यात असा प्रकार उघडकीस आलेला …
Read More »मालमत्ता मूल्यांकनाबाबत नवी मुंबईकरांना सूचना
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील अनुसूची प्रकरण 8, कराधान नियम 13 नुसार अधिनियमाच्या अनुसूचीतील प्रकरण 8 कराधान नियम, नियम खंड (अ),(ब),(क) आणि (ड) अन्वये आवश्यक असलेल्या नोंदी सन 2023-24 या वर्षाच्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या मालमत्तांच्या करनिर्धारण पुस्तकात व्यवहार्य असेल तितपत पूर्ण करुन ती पुस्तके पहाण्यासाठी …
Read More »आगीच्या ज्वालांनी होरपळले पक्षुपक्षी
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील डोंगराळ परिसरात आगी लागल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा आगीच्या आगडोंबात पक्षुपक्षी होरपळून मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे वन विभागाकडून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक करीत आहेत. या वनक्षेत्रातील झाडे – झूडपे आणि गवताच्या आधारावर संचार करणारे पक्षुपक्षी, वन प्राणी यांचे संरक्षण व जतन …
Read More »पुढील आठवड्यापासून सुरू होणार माथेरान ट्वीन ट्यूब बोगद्याचे काम
माथेरान ः रामप्रहर वृत्त भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अर्थात एनएचएआयने 10 हजार 560 कोटी रुपये माथेरान ट्वीन ट्यूब बोगद्यासह आठ लेनच्या मुंबई- वडोदरा एक्स्प्रेस वेची कामे प्रस्तावित केली आहेत. पुढील आठवड्यापासून या मार्गाचे काम सुरू होणार आहे. या एक्स्प्रेस वेमुळे जवाहरलाल नेहरु पोर्ट अथॉरिटी आणि वडोदरा विरारमार्गे प्रवासाचा वेळ तीन …
Read More »