आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार (आरटीई) दुर्बल व वंचित घटकांकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता मुदतवाढ देण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे. ही …
Read More »Yearly Archives: 2023
आसुडगावातून 13 बांगलादेशींना अटक
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाची कारवाई पनवेल : वार्ताहर आसुडगाव सेक्टर-4 भागात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या 13 बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने छापा मारुन अटक केली. या कारवाईत पकडण्यात आलेल्यामध्ये आठ पुरुष व पाच महिलांचा समावेश असून हे सर्व बांगलादेशी नागरिक बांधकाम साईटवर मजुरी करून तसेच घरकाम करुन रहात …
Read More »भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचे पनवेलमध्ये स्वागत
पनवेल ः वार्ताहर भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी संघटनात्मक दौर्यानिमित्त गुरुवारी (दि. 11) पनवेलमध्ये आले होते. त्यांचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह ओबीसी मोर्च्याच्या पदाधिकार्यांनी स्वागत केले. या वेळी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ, महिला जिल्हाध्यक्ष सीता पाटील, ओबीसी मोर्चा पनवेल मंडळ अध्यक्ष अॅड. …
Read More »युवा वॉरियर्स फुटबॉल चषक स्पर्धा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खेलो युवा अंतर्गत भाजप युवा मोर्चा पनवेल मंडळाच्या वतीने 20 व 21 मे रोजी युवा वॉरियर्स फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खांदा कॉलनी येथील चांगू …
Read More »उद्धव ठाकरेंचा राजीनामा ठरला कळीचा मुद्दा
मुख्यमंत्री व समर्थक आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी (दि. 11) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांना दिलासा दिला आहे. या वेळी न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यावर बोट ठेवत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले. शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी ज्योत्स्ना ठाकूर; मान्यवरांकडून अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी रायगड विभागातून संस्थेच्या येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील उपक्रमशील शिक्षिका ज्योत्स्ना ठाकूर यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर यांनी या निवडीचे श्रेय त्यांचे खंबीर मार्गदर्शक आणि रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग …
Read More »नितीन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे गॅस लाईनच्या कामाला सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग 18 मध्ये कार्यकुशल असे लोकप्रतिनधी असलेले नितीन जयराम पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अष्टविनायक कॉलनी व परदेशी आळी, न्यायाधीश निवास परिसरात महानगर गॅस लाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे. प्रभाग 18 मधील अष्टविनायक कॉलनी व परदेशी आळी, न्यायाधीश निवास परिसरात महानगर गॅस लाईनच्या जोडण्या अद्याप …
Read More »कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेजचे सुयश
शिक्षण संस्थेमार्फत बहुमानाचे पारितोषिक प्रदान; सर्वोत्त्कृष्ट कामगिरीचा मान्यवरांकडून गौरव कामोठे : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या सर्व इंग्रजी माध्यमांच्या विद्यालयातून सन 2022-23चे कर्मवीर पारितोषिक हे बहुमानाचे पारितोषिक कामोठे येथील लोकनेते रामशेठ इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (एलआरटीइएमएस) या विद्यालयाला शिक्षण संस्थेमार्फत जाहीर झाले. त्यानुसार रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर …
Read More »ऑनलाईन खुर्च्या, टेबल मागवणे पडले महागात
कामोठ्यातील महिलेची लाखो रुपयांची फसवणूक पनवेल : वार्ताहर ऑनलाईन खुर्च्या व टेबल मागवणाच्या प्रयत्नात असलेल्या कामोठे भागातील एका महिलेला सायबर चोरट्यांनी पच्या माध्यमातून बँक खात्यातून एक लाख 16 हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू …
Read More »उ. रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे क्रीडा स्पर्धा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. युवा नेते परेश ठाकूर यांना क्रीडा क्षेत्राची आवड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper