Breaking News

Yearly Archives: 2024

पनवेलच्या आकुर्लीत घंटागाडीचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आकुर्ली ग्रामपंचायतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा परिषद शेष फंडातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या घंटागाडीचे लोकार्पण भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 27) झाले. या वेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले. पनवेल विधानसभा मतदारसंघातील आकुर्ली ग्रामपंचायतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा …

Read More »

बीसीटी लॉ कॉलेजला ‘नॅक’चे मानांकन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद (नॅक) बंगळुरूकडून बी+ श्रेणी आणि 2.69 सीजीपीएसह मानांकन प्राप्त करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

‘रयत’चा रायगड विभाग अव्वल राहिला पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचा रायगड विभाग अव्वल राहिला पाहिजे, असे प्रतिपादन संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे बोलताना व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा नवी मुंबईतील वाशी येथील मॉर्डन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली …

Read More »

सिडकोच्या अभय योजनेस 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा आला कामी पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको वसाहत विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ’अभय’ योजनेस शासनाने 15 ऑगस्ट 2024पर्यंत मुदतवाढ दिली असून माजी मंत्री आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी शासनाकडे केलेली मागणी व …

Read More »

सीकेटी विद्यालयाच्या पराग सावंतची ‘एअर इंडिया’त केबिन क्रू मेंबर म्हणून निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पराग रामविजय सावंत या विद्यार्थ्याची एअर इंडिया (मुंबई) येथे केबिन क्रू मेंबर म्हणून निवड झाली आहे. पराग सावंत या विद्यार्थ्यांने व्यावसायिक क्षेत्रात मिळविलेल्या या विशेष प्राविण्याबद्दल …

Read More »

महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांना आणखी दोन संघटनांचा पाठिंबा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांना विविध संघटनांकडून पाठिंबा लाभत आहे. यात आणखी दोन संघटनांची भर पडली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जि.प., न.पा., मनपा) संघटना आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने आपले …

Read More »

‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

रिक्षा, टॅक्सी चालक मालक आणि परिवाराने घेतला लाभ पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल शहर व तालुका आणि वंदे मातरम जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रिक्षा व टॅक्सी चालक मालक आणि त्यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य शिबिर रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात …

Read More »

उरण मोठी जुई येथील शेकाप, ठाकरे गट, काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये

उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील मोठी जुई येथील शेतकरी कामगार पक्ष, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन रविवारी (दि. 23) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. मोठी जुई येथे झालेल्या या …

Read More »

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान (डॅनी डेन्झोप्पा) हे खौपनाक लुटारु या दरोड्यात बँकेतील नोटा, दागिने बॅगेत भरतात आणि आता ते त्यांची साथीदार कामिनी (सोनिया साहनी) हिच्या गाडीत बसून पुणे शहराकडे पळणार तोच शस्त्रधारी पोलीस येतात. त्यांच्यात व या तीन दरोडेखोर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना विशेष सन्माननीय सदस्यत्व देण्यात आले. या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले …

Read More »