कोकणात पावसाचे प्रमाण देखील मोठे, जलसिंचनासाठी प्रकल्प देखील भरपूर, पण कोकणातील हे पाणी देखील वाया आणि शेतकर्याची मेहनत देखील वाया. हे चित्र कुठेतरी बदलणे आवश्यक आहे. या हेतूने परदेशातील नोकरी सोडून आलेल्या अमजद काझी या तरुणाची गेली वर्षभर धडपड सुरु आहे. महाड तालुक्यातील शेतकर्यांनी दुग्धव्यवसाय सुरु करून विकास साधला पाहिजे …
Read More »अपयशी झुंज
देशातील नवे सहस्त्रक उजाडून दोन दशके उलटली तरीही आपल्या समाजात अशा मध्ययुगीन काळातील भासणार्या घटना घडतात ही बाब अत्यंत दु:खद आणि चिंता वाढवणारी आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून कर्तृत्वाची शिखरे पादाक्रांत करणार्या भारतातील महिला आजही पुरुषप्रधान विकृत कल्पनांचा बळी ठरतात ही आपल्या समाजातील एक प्रमुख विसंगती आहे. दारोडा या हिंगणघाट …
Read More »सावित्रीच्या लेकी असुरक्षित!
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या एकापाठोपाठ घटना समोर आल्या आहेत. क्षुल्लक कारणावरून मुली-महिलांच्या जीवाशी खेळण्याच्या या प्रकारांनी अवघा महाराष्ट्र हादरला आहे. याबाबत सर्व स्तरातून संवेदना आणि संताप व्यक्त होतोय. अशा घटनांना आळा घालण्यासाठी विकृतीला वेळीच ठेचले गेले पाहिजे. त्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका …
Read More »नैराश्याचे ओझे!
सध्याची जीवनशैली बघता लहान-थोर सर्वानाच खरंतर नैराश्याने ग्रासले आहे. बालवाडीच्या प्रवेशापासून ते अगदी म्हातारपणात-आजारपणात कोण बघणार, अशा अनेकविध प्रश्नांनी येणारी निराशा माणसाच्या मनात घर करून राहते. त्या निराशेच्या मागे असणारी इतर कारणे, त्याची लक्षणे व उपचार पद्धतीविषयी सविस्तर माहिती करून घेणे गरजेचे आहे. शरीराएवढाच मनाचाही व्यापार फार मोठा असतो आणि …
Read More »आधुनिक भारताचे संत बाबा आमटे
आपले जीवन कुष्ठरुग्णांसाठी वेचणारे निःस्वार्थी समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे यांची आज पुण्यतिथी. कुष्ठरुग्णांंच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर (महाराष्ट्र) येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. ते कुष्ठरुग्णांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. …
Read More »विरोधकांना आरसा
निव्वळ मोदीविरोध आणि गृहमंत्री अमित शहा यांचा द्वेष या दोन कलमी कार्यक्रमावर काँग्रेस व डाव्या पक्षांचा विरोध आखलेला असतो हे एव्हाना स्पष्टपणे दिसून आले आहे. मोदी-शहा यांचा विरोध करता करता आपण शत्रूराष्ट्राच्या शेजारी जाऊन उभे राहिलो आहोत आणि त्यांचीच भाषा बोलू लागलो आहोत याचे भान काँग्रेस नेत्यांना उरले नाही. त्याचेच …
Read More »रायगड जिल्हा केव्हा होणार टँकरमुक्त?
रायगड जिल्ह्यात तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. पावसाचे पाणी नदी व आढ्यांतून समुद्रात जाऊन मिळते. हे पाणी वाया जाते. रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनातर्फे दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या घोषणा केल्या जातात. परंतु त्यासाठी …
Read More »महाराष्ट्रातील लोकपर्यटन
देवस्थानांना भेटी हा पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग. पाहूया आपल्या मातीतील देवस्थळे. महाराष्ट्रात प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते. जशी भाषा बदलते त्याच पद्धतीने त्या भाषेचा लहेजा बदलतो. प्रदेशपरत्वे महाराष्ट्राचे मुख्य पाच विभाग आपल्याला बघावयास मिळतात. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्र म्हणजेच मराठवाडा होय. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणारचे …
Read More »हवा बदलते आहे…
देशातील हवा हळूहळू बदलू लागली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी याच्या विरोधात देशभर रान उठवण्यात आले होते. सुधारित नागरिकत्व कायदा कोणाचे नागरिकत्व काढून घेणारा नाही तर नागरिकत्व देणारा आहे असे वारंवार सांगून देखील मतांच्या धु्रवीकरणासाठी विरोधाचे एक षडयंत्र रचले गेले. त्याची परिणती देशव्यापी आंदोलनांमध्ये झाल्याचे आभासी चित्र दिसत होेते. …
Read More »क्षुल्लकीकरणाचे वारे
गेल्या काही वर्षांत राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. परंतु या घसरलेल्या पातळीचा संबंध भारतीय जनता पक्षाशी लावण्याचा ‘उद्योग’ काही लोक करू लागले आहेत. वास्तविक राजकारणाचे क्षुल्लकीकरण प्रामुख्याने कुणी केले असेल तर ते सत्ता गमावून बसलेल्या काँग्रेसनेच. पंतप्रधान मोदी यांच्या उदयाने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसच्या पुढार्यांनी गेली काही वर्षे इतक्या खालच्या पातळीवरील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper