Breaking News

संपादकीय

लढवय्ये सूर्याजी मालुसरेंची समाधी उपेक्षित

हिंदवी स्वराज्यातील तहामध्ये गमावलेले किल्ले परत भगव्याखाली आणण्याच्या मोहिमेची सुरुवात कोंढाणा किल्ला ताब्यात घेऊन कामगिरी फत्ते करून करण्यात आली. याकामी तान्हाजी मालुसरे धारातिर्थी पडले तर मावळ्यांमध्ये वीरश्री संचारण्यासाठी त्यांचे बंधू नरवीर सूर्याजी मालुसरे यांनी दिलेली ’बाप धारातिर्थी पडला म्हणून पळून का रे जाता? गडाचा दोर कापला आहे…लढून मरा नाहीतर उड्या …

Read More »

फुप्फुसांचा कर्करोग : छुपा सैतान

कर्करोगामुळे होणार्‍या मृत्यूंपैकी 27% मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात आणि स्तनांचा कर्करोग, कोलोरेक्टल (मोठ्या आतडे) कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोग या तीन प्रामुख्याने आढळणार्‍या कर्करोगांमुळे होणार्‍या मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात. पूर्वी हा रोग केवळ वृद्ध व्यक्तींना होत असे पण आता कमी वयातही या रोगाचे प्रमाण वाढलेले आढळून येत आहे. पुरुषांमध्ये …

Read More »

भारत संचार निगमची अनियमित ‘सेवा’कायमच

भारतातील एक विश्वसनीय सेवा म्हणून पाहिल्या गेलेल्या भारत संचार निगम लिमिटेडच्या दूरध्वनी आणि इंटरनेट सेवेचे महाडमध्ये तीनतेरा वाजले आहेत. ही सेवा महाडकरांना कधीतरी मिळत असुन आमावस्या पौर्णिमेला मिळणार्‍या या सेवेमुळे महाडकर कमालीचे संतप्त झाले आहेत. याचा परिणाम सर्व शासकीय कार्यालये, बँका आणि घरगुती, व्यावसाईक दूरध्वनी ग्राहकांवर जाणवू लागला आहे. एकीकडे …

Read More »

विकृतीला रोखणार कसे?

‘ढोर, गंवार, शुद्र, पशु और नारी, सकल है ताडन के अधिकारी’ हा शतकानुशतके चालत आलेला दृष्टिकोन समाजामध्ये इतका खोलवर मुरलेला आहे की विशेषत: स्त्रियांबाबतचा हा विकृत दृष्टिकोन विषवल्लीसारखा उपटून फेकून देणे हे कठीण काम होऊन बसले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्रियांचे समाजातील …

Read More »

‘ती’च्या पोषणावर भर

लिंगाधारित भेदभावांमुळे मुलींचे पोषण नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे. विशेषत: किशोर वयापासून मुलींचे उत्तम पोषण होणे हे निव्वळ तिच्याच नव्हे तर भविष्यातील तिच्या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. परंतु आपल्याकडील विशेषत: ग्रामीण भागातील एकंदर समाजरचनेत ही बाब पूर्णत: दुर्लक्षित राहते. आता सरकारी पातळीवरील पुढाकारामुळे संबंधित दृष्टिकोनात बदल घडून होण्यास चालना मिळेल …

Read More »

भिडस्त

साध्या गरीब माणसांवर सगळे अन्याय करीत असतात असे आपण म्हणतो. काही माणसांचा स्वभाव भिडस्त असतो. त्याचा गैरफायदा अनेक जण घेत असतात. पण ही माणसे त्याला कसे बोलायचे म्हणून गप्प बसतात. हे पाहून कधी कधी वाटते यांना असेच पाहिजे. अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो असे म्हणतात ते काही …

Read More »

माथेरान एमटीडीसीमध्ये पारंपरिक जेवणाची लज्जत

माथेरान हे ब्रिटिशांनी शोधून काढलेले माथ्यावरील रान म्हणजे माथेरान हे आज वाहनांना बंदी असलेले जगातील एकमेव असे पर्यटनस्थळ आहे. या थंड हवेच्या ठिकाणी पावसाळ्यात धुक्याची दुलई अनुभवण्यासाठी पर्यटक चारही महिने गर्दी करतात, तर हिवाळ्यात येथील गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. दुसरीकडे उन्हाळा सुरू झाला की सर्वांना थंड हवेच्या ठिकाणाची …

Read More »

‘एल्फिन्स्टन’चे नामांतर काळाची गरज!

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाविद्यालयाला द्यावे! भारतावर इंग्रजांनी सुमारे दीडशे वर्षे राज्य केले आणि हजारो वर्षांच्या आपल्या प्रथा, परंपरा, संकेत यांचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न करून आपल्या अर्थातच ब्रिटिशांच्या पाऊलखुणा उमटविल्या. त्या इतक्या घट्ट बसल्या आहेत की त्या खरवडून खरवडूनसुद्धा जाता जात नाहीत. ब्रिटिशांनी आपल्याला बर्‍याच देणग्या देऊन ठेवल्या आहेत …

Read More »

जीवन गाणे गातच राहावे…

नवीन वर्ष सुरू होऊन पहिला महिना सरलासुद्धा. नववर्षासाठी केलेले अनेकांचे संकल्प कधी विरून गेले ते त्यांनाही कळले नसेल. गमतीचा भाग सोडा, पण मानवी जीवन इतके वेगवान आणि व्यस्त झाले आहे की दैनंदिन धावपळीत स्वत:सह इतरांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. याच धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कळत-नकळत माणूसपण कुठेतरी हरवत चालले आहे. आजच्या …

Read More »

हरवलेला आठवडा

मुंबईतील रस्ते म्हणजे खड्डेच खड्डे आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे या समस्येवर शाश्वत तोडगा काढण्याची बुद्धी ना प्रशासनाने कधी दाखवली, ना या शहराच्या राज्यकर्त्यांनी. गेली जवळपास चार दशके मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. तरी देखील या पक्षाला आपल्या महानगरातील रस्ते सुधारावेत असे कधी वाटले नाही. …

Read More »