मुरूड, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात जंजिरा नवाबांची सत्ता होती. या भागाला जंजिरा संस्थान म्हणून संबोधले जायचेे. 31 जानेवारी 1948 रोजी जंजिर्याच्या नवाबाने भारताच्या सामिलनाम्यावर सही केल्याने हे जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले होते. तेव्हापासून हा दिवस हा जंजिरा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यासाठी रायगड प्रेस क्लब व मुरूड …
Read More »रस्ते बांधण्यासाठी प्लास्टिकचा पर्याय
रस्ते बांधण्यासाठी डांबर वापरले जात होते. आजही डांबरीच रस्ते आहेत, परंतु आता राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामासाठी सिमेंट वापरले जाते. कोकणात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे रस्ते टिकत नाहीत. त्यासाठी पर्याय शोधला जात आहे. नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने प्लास्टिकचा वापार करून रस्ते बांधता येतात आणि हे रस्ते टिकतातदेखील हे सिद्ध केले आहे. त्यामुळे …
Read More »आरे वनाचा चंद्र!
न्यायालयाच्या आदेशानुसारच ही कारवाई करण्यात आली. प्रस्तावित कारडेपोचा भूखंड हा जंगलाचा भाग नाही हे न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे. तरी देखील पर्यावरणप्रेमी आदित्य ठाकरे यांच्या हट्टाखातर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामास स्थगिती देऊन एका आदर्श विकासकामात खोडा मात्र घातला. या स्थगितीपायी सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण पडत असून दररोज पाच …
Read More »विस्तवाशी खेळ
शाहीन बागप्रमाणे देशातील अनेक शहरांमध्ये अशी तुरळक आंदोलने होत असून ते लोण आता मुंबईत देखील पोहोचले आहे. आपल्या भडकावू भाषणांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या एआयएमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांनी देखील मुंबईतील आंदोलनाला हजेरी लावली यात सारे काही आले! विशेष म्हणजे ज्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी तिहेरी तलाकसारखा कायदा आणला त्या मुस्लिम महिलांचा समावेश या …
Read More »पोलादपूरचा बुरूड व्यवसाय लोप पावतोय!
पोलादपूर तालुक्यामध्ये गेल्या चार दशकांपासून तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई लावणारा व्यवसाय अस्तंगत झाल्यानंतर आता बांबूपासून विविध वस्तू बनविणारा बुरूड व्यवसायदेखील लोप होण्याच्या मार्गावर आहे. कोकणात बांबूचे पीक मुबलक आहे, मात्र बांबूच्या वस्तू बनविणारे पारंपरिक बुरूड व्यावसायिक आणि खरेदीसाठी ग्राहक नसल्याने याबाबत आता उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, भातकापणीनंतर बांबूच्या …
Read More »घबराट नको, दक्षता हवी!
करोना हा विषाणू प्रामुख्याने श्वसनयंत्रणेवर हल्ला करतो. त्यामुळे ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास, तसेच फुप्फुसामध्ये संसर्ग अशी लक्षणे आढळून येतात. सौम्य लागण झाली असल्यास फ्लु किंवा सर्दीसारखीच लक्षणे दिसू शकतात. विषाणूची लागण झाल्यानंतर लक्षणे दिसण्यास दोनएक आठवड्यांचा काळही लागू शकतो. अशा वेगाने पसरणार्या विषाणूच्या संदर्भात घबराटीऐवजी जागरूकता व दक्षता बाळगल्यास …
Read More »थोडीसी तो लिफ्ट करादे
गेली अनेक वर्षे अदनान सामी मुंबई व दिल्ली येथेच राहतात. त्यांचे वडील पाकिस्तानी असले तरी त्यांची आई काश्मिरी आहे. एकंदर अदनान सामी हे अंतर्बाह्य भारतीय आहेत. एरव्ही सर्वधर्मसमभावाची जपमाळ ओढणार्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अचानक भारतीयत्वाचा पुळका का आला असावा? जगविख्यात कलाकार अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल केंद्रातील …
Read More »हिंदवी स्वराज्याचा ‘सिंह’ नरवीर तानाजी मालुसरे
सतराव्या शतकातील तो काळ… त्या वेळी दख्खनमध्ये विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरचा निजामशहा, गोवळकोंड्याचा कुतूबशहा, तर उत्तरेत मुघल बादशहा औरंगजेब राज्य करीत असे. महाराष्ट्रासह भारतासाठी हा शब्दश: ‘काळ’ ठरत होता; कारण नैसर्गिक साधनसंपत्ती, विपूल सुबत्ता असूनही केवळ मुजोर पातशाहांच्या उपद्रवामुळे लोकांना जगणे मुश्कील झाले होते. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. …
Read More »आधी जय श्रीराम, आता जय साईराम!
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय॥ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू गजानन महाराज की जय॥ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू सच्चिदानंद श्री अक्कलकोट स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय॥ श्री साईनाथ, श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ हे …
Read More »‘भगव्या’ची पळवापळवी
वर्षभरापूर्वी ‘चलो अयोध्या’ असा नारा देणारी शिवसेना आज राष्ट्रवादीच्या तालावर नाचताना पाहून अनेक जुन्या-जाणत्या शिवसैनिकांना देखील दु:ख होत असेल. आमचे रंग आणि अंतरंग अजूनही भगवेच असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी वचनपूर्ती सोहळ्याच्या मंचावरून केला, तो किती पोकळ आहे हे तेथील गर्दीला देखील उमगले असेल. उक्ती आणि कृतीमध्ये विसंगती दिसली तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper