Breaking News

संपादकीय

उल्हास नदी संवर्धनाचा प्रयत्न

बारमाही वाहणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली की त्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यात केवळ पिण्याचे पाणी प्रदूषित होत नाही, तर नद्यांमधील जीवांचे आयुष्यदेखील प्रदूषित पाण्यात असल्याने कमी होत जाते, मात्र कर्जतच्या कातळदरा जंगलात उगम पावलेल्या उल्हास नदीचा काही किलोमीटरनंतरचा प्रवास बारमाही नदीमध्ये होतो आणि ही नदी अनेक …

Read More »

पारा घसरला

ऋतुचक्र बदलत असते, परंतु निसर्गाची परिक्रमा ही ठरलेलीच असते. अलीकडच्या काळात मात्र त्यात प्रचंड बदल झालेला आहे. हल्ली कधीही पाऊस पडतो. यंदा तर वरुणराजाने धो धो बरसून सर्वांना अक्षरश: झोडपले. तरीही अधेमधे ढगाळ वातावरण निर्माण होऊन उकाडा जाणवत होता. अखेर थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. तीदेखील हुडहुडी भरविणारी. तशी थंडीची …

Read More »

बाहुला-बाहुलीचे लग्न

भारती फुलमाळे यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. घरात गोड-धोड आणि सोबतीला मटण शिजवणे सुरू होते. नातेवाईक मंडळी नटून-थटून जमत एकमेकांना शुभेच्छा देत होते. निमित्त होते भारती यांचा चार महिन्यांचा मुलगा राजकुमार यांच्या विवाहाचे. नवरी मुलगी म्हणून शेजारच्या झोपडीतल्या दोन महिन्यांच्या राणी शामसुंदरला नटवले होते. हे सर्व पाहून काही वर्षांपूर्वी (आता …

Read More »

भारताला ’अच्छे दिन’ येताहेत!

नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आणि त्यांनी ’अच्छे दिन’ ’सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना मांडल्यापासून त्यांच्या, पर्यायाने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधकांनी भारत खतरेमें, संविधान खतरेमें अशी बांग द्यायला सुरुवात केली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 543 …

Read More »

2019 सरताना अन् 2020मध्ये पाऊल टाकताना…

बघता बघता वर्ष सरायला आले. 2019 कधी संपत आले हे कळलेदेखील नाही. दिवस कसे भुरर्कन उडून गेले. मंगळवारी रात्री ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष केल्यानंतर आपण सर्व जण नव्या वर्षात पर्दापण करणार आहोत. तसे पाहिले तर येणारा प्रत्येक क्षण हा जाण्यासाठीच असतो. आताचा वर्तमान उद्या भूतकाळ होऊन जातो, पण म्हणून काही कुणी …

Read More »

जागरूकतेवर भर हवा

बाल लैंगिक शोषणासंदर्भातील आकडेवारी पाहिली, तर 35 टक्के प्रकरणांत शोषण करणारी व्यक्ती ही शेजारी राहणारी होती. मित्र मंडळी, कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक, सावत्र पालक, काळजी घेणार्‍या व्यक्ती यांपैकी कुणीतरी म्हणजेच ओळखीतील व्यक्तिकडून लैंगिक शोषण झाल्याच्या तक्रारींचे प्रमाण 73 टक्के दिसते. या टक्केवारीत आश्चर्य वाटण्यासारखे अथवा नवे असे काहीही नाही. लहान मुलांना …

Read More »

पारध, झोंबी अन् बैलदिवाळीचा थरार

पोलादपूर तालुक्यातील पारंपरिक सण व मर्दानी खेळ विविध कायद्यांच्या कचाटयात अडकू नये आणि परंपरादेखील जपल्या जाव्यात यासाठीचे प्रयत्न ग्रामीण भागात सुरू असून पारध,झोंबी अन् बैलदिवाळीचा थरार अनुभवण्यासाठी पोलादपूरच्या ग्रामीण जनतेचे गुपचूप कोकण पर्यटन सुरू आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तालुक्यातील शेतकरीवर्ग गोठयात बांधलेल्या बैलांची अकड म्हणजे सुस्तावस्था कमी करून त्याच्यामध्ये चुणचुणीतपणा आणण्यासाठी …

Read More »

शिरजोर राजकारण

एनआरसी ही प्रक्रिया असून ती आसाम वगळता देशात कोठेही राबवण्यात येणार नाही किंबहुना अशा प्रकारची एखादी प्रक्रिया अंमलात आणण्याचे केंद्र सरकारच्या अजेंड्यावरच नाही. भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यात एनआरसीचा उल्लेख जरुर आहे, परंतु तो काही सरकारी कार्यक्रम नव्हे. त्यामुळे विरोधकांची आदळआपट ही ‘आभाळ पडले, आभाळ पडले’ असे ओरडणार्‍या सशासारखी आहे. …

Read More »

हे शोषण थांबायलाच हवे

समाजाच्या खालच्या स्तरातून आलेले, कुठलेही प्रशिक्षण नसलेले कामगार सफाईचे हे काम करतात. त्यांना हे काम करताना कुठल्याही स्वरुपाची सुरक्षितता पुरविली जात नाही. तसेच या कामामुळे होणार्‍या आरोग्य समस्यांसाठीही कुठल्याही स्वरुपाच्या सुविधा पुरवल्या जात नाहीत. सरकारी वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणांकडून या संदर्भात कठोर कारवाई झाल्याखेरीज या गैरप्रकारांना आळा बसणार नाही …

Read More »

नाताळ : ख्रिस्त जन्मोत्सव

दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिस्तीजन ख्रिसमस म्हणजेच मराठीत ’नाताळ’ हा सण मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. ख्रिस्ती धर्मश्रद्धेनुसार या दिवशी ख्रिस्त राजा म्हणजेच येशू हा जगाला तारणारा जन्मास आला हे सत्य मानतात. देवाने खुद्द येशूच्या रूपात देह धारण करून मानव धर्म स्वीकारला. केवळ सर्व जगाचे तारण व्हावे, येशूच्या शिकवणीनुसार सर्व लोकांना …

Read More »