नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयएनएक्स भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने पी. चिदंबरम यांना अटक केली आहे. या अटकेमागे मोदी सरकार असल्याचा आरोप काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन केला होता. काँग्रेसच्या आरोपांवर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चिदंबरम यांच्यावरील कारवाई कायद्याप्रमाणे होत आहे. त्यात केंद्र सरकार आणि भाजपची कोणतीही भूमिका नाही, असे …
Read More »पाण्याखाली गेलेल्या गावांचे पुनर्वसन -चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : प्रतिनिधी पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 21) येथे केली. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावांची पाहणी करून त्यांनी लोकांना दिलासा दिला. निलेवाडी येथे पूरग्रस्त गावकर्यांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या …
Read More »सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार; चार जखमी
जळगाव : प्रतिनिधी सुरक्षा रक्षकाच्या हातातील बंदुकीतून अचानक गोळी सुटून चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी अडीच वाजता भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत घडली. बंदुकीचा लॉक काढताना सुरक्षा रक्षकाच्या हातून नजरचुकीने हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सेंट्रल बँकेच्या वरणगाव शाखेत सुरक्षा रक्षक म्हणून …
Read More »अभिनंदन यांचा छळ करणार्या कमांडोचा खात्मा
नवी दिल्ली : भारतीय मिग-21 लढाऊ विमानासह पीओकेत कोसळलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडणार्या आणि टॉर्चर करणार्या पाकिस्तानी कमांडोचा तीन दिवसांपूर्वी एलओसीवर लष्करासोबत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान पीओकेत कोसळले होते. त्यानंतर या विमानाचा …
Read More »ग्राहकांना लुटणार्या बँकांना आरबीआयचा झटका
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आरबीआयने बँकांना फटकारले असून एटीएम ट्रांझेक्शन लिमिटच्या नावाखाली ग्राहकांना लुटण्याच्या प्रकारावर चाप लावला आहे. बँकांकडून महिन्याला केवळ पाच ट्रान्झेक्शन मोफत दिली जात होती. यानंतर प्रत्येक ट्रान्झेक्शनला 20 ते 25 रुपयांचे शुल्क आकारले जात होते. बर्याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झेक्शन फेल …
Read More »पाकपासून स्वतंत्र होण्यास मदत करा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन देशातच नव्हे, तर पाकिस्तानातील बलुचिस्तानातही अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणार्या कार्यकर्त्यांनी सर्व भारतीय बंधू-भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बलुचिस्तान पाकचा भाग नाही. त्यामुळे आम्हाला पाकपासून स्वतंत्र होण्यासाठी भारताने मदत करावी, असे आवाहन बलुचिस्तानातील कार्यकर्त्यांनी केले. बलुचिस्तान हा पाकमधील …
Read More »पुरावेळी राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय?
सदाभाऊ खोत यांचा संतप्त सवाल वर्धा : प्रतिनिधी ’पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? पुराच्या वेळी आले असते, पाण्यात उतरले असते तर स्वागत केले असते,’ अशी बोचरी टीका राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे. राष्ट्रवादीला पूरग्रस्तांशी देणं-घेणं नसून ते केवळ कोरडी सहानुभूती दाखवत आहेत, …
Read More »विद्यार्थ्याला कारने चिरडले
औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजावंदन सोहळ्यासाठी शाळेत जात असताना नऊ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव कारने चिरडले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. झाल्टा फाटा येथे गुरुवारी सकाळी ही घटना घडली. संभाजी शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेतील ध्वजावंदन सोहळ्यासाठी संभाजी निघाला होता. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका …
Read More »पाणीदार जिल्ह्यासाठी जलसत्याग्रह चळवळ
सर्वांना सहकार्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन चंद्रपूर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न पाहिले असून त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार असून याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे …
Read More »सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील दुदंडी गावात पूरग्रस्तांना मंगळवारी चादर, सफरचंद, बिस्किटे आदी साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी पनवेल मनपाचे नगरसेवक विजय चिपळेकर, प्रदीप भगत, संतोष भगत, मा. जि. प. सदस्य शिवाजी मगर पाटील, अनिल चव्हाण, पं. स. सदस्य रामभाऊ वरोडे, मा. सरपंच माणिक ठोंबरे आदी उपस्थित होते.
Read More »