Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

पोलिसांना निमलष्करी दलाप्रमाणे प्रशिक्षण ; पोलीस महासंचालकांची माहिती

पुणे ः प्रतिनिधी – पोलीस दलात भरती झाल्यानंतर मधल्या काळात अनेक सामाजिक, आर्थिक बदल मोठ्या प्रमाणावर होत असतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी निमलष्करी दलाप्रमाणे राज्यातील पोलिसांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्यादृष्टीने प्रशिक्षण केंद्रामध्ये कोर्स सुरू करण्यात येत असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी सांगितले़. पाषाण येथील पोलीस संशोधन …

Read More »

लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट होणार बंधनकारक?

पणजी ः वृत्तसंस्था – गोव्याच्या नागरिकांना भविष्यामध्ये लग्न करण्याआधी एचआयव्ही टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. तसा कायदाच पास करण्याचा विचार राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे करीत असून त्यासाठी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. देशामध्ये एचआयव्ही-एड्सच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्न करत असते. या बाबतीत लोकांना जागरूक केले जाते, पण …

Read More »

विजेची सबसिडी थेट बँक खात्यात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – केंद्र सरकारने विजेसंदर्भात नवे धोरण तयार केले आहे. या धोरणातील नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच ज्या कंपन्या वारंवार वीजपुरवठा खंडित करतात, त्यांनाही केंद्र सरकार दंड ठोठावणार आहे. केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयाने हे धोरण तयार केले आहे. या …

Read More »

व्हॉट्सअॅ=पपासून सावध राहा!

लष्कराचा जवानांना इशारा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – सोशल मीडियामुळे माहितीची गोपनीयता आता जवळपास नष्टच झाली आहे. एखादी अतिमहत्त्वाची माहितीही आता सोशल मीडियातून नकळत सार्वजनिक होऊन जाते. याचा सर्वाधिक धोका आणि काळजी संरक्षणविषयक माहितीबाबत घेतली जाते. त्यामुळे आता भारतीय लष्करानेही आपल्या जवानांना आणि अधिकार्‍यांना व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करताना सावधानता बाळगण्याचा सल्ला …

Read More »

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू, कुलसचिवांसह पाच जणांविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

पुणे : प्रतिनिधी  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसिटी) चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. करमळकर, प्रफुल्ल पवार यांच्यासह सिनेट सदस्य संजय चाकणे, सुरक्षा संचालक …

Read More »

पितांबरीला ‘इंडिया एसएमई 100’ पुरस्कार

ठाणे : प्रतिनिधी  – लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ‘इंडिया एसएमई 100’ पुरस्कार पितांबरी प्रॉडक्ट्स प्रयव्हेट लि. कंपनीला मिळाला. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात येतो. जागतिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी …

Read More »

भारताचं ‘नाग’ अस्त्र लवकरच लष्करी सेवेत

पोखरण : वृत्तसंस्था  – नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश होईल. रविवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पोखरण फायरींग रेंजवर नाग क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या. रविवारी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा नाग क्षेपणास्त्र डागून चाचणी घेण्यात आली. तिन्ही चाचण्या यशस्वी ठरल्याचे डीआरडीओच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. नाग …

Read More »

एव्हरेस्टवरील कचर्याचं पुढे काय होतं?

काठामांडू : वृत्तसंस्था  – जगातील जवळपास प्रत्येक गिर्यारोहकासाठी एक लक्ष्य असणार्‍या माऊंट एव्हरेस्ट या पर्वतासाठी नेपाळ या राष्ट्राकडून एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. या पर्वतावर साठलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून नेपाळतर्फे एक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. ज्याअंतर्गत आतापर्यंत या महाकाय पर्वतावरून 10 हजार किलो कचरा उचलण्यात आला आहे. …

Read More »

जोरदार पावसाने नाशिकमध्ये पूर

नाशिक ः प्रतिनिधी नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडल्याने गोदावरी नदीला पूर येऊन अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. नाशकात तीन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले असून, मागील 24 तासांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरींनी …

Read More »

सरकार वाचविण्यासाठी कुमारस्वामींची भागम्भाग

बंगळुरू : काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा देत मुंबईकडे कूच केल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. आमदारांच्या राजीनामा नाट्यामुळे काँग्रेस-जेडीएसचे आघाडी सरकार संकटात आले असून, सरकार टिकवण्यासाठी एच. डी. कुमारस्वामी यांनी धावाधाव सुरू केली आहे. परिस्थिती सांभाळण्यासाठी कुमारस्वामी अमेरिकेहून भारतात परतले आहेत, तसेच काँग्रेसकडूनही आपल्या असंतुष्ट आमदारांची समजूत …

Read More »