Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

सुटकेसाठी लढा सुरूच राहणार ; परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही; कुलभूषण जाधव अटक प्रकरण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था  पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत दिली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची सुटका करावी, अशी मागणी करतानाच जाधव यांच्यासाठी सरकारचा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. संपूर्ण देश हा कुलभूषण जाधव …

Read More »

’चांद्रयान-2’चे सोमवारी प्रक्षेपण; ’इस्रो’ची माहिती

श्रीहरिकोटा : वृत्तसंस्था तांत्रिक कारणामुळे ऐनवेळी उड्डाण स्थगित करण्यात आलेल्या चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाचा दिवस आणि वेळ अखेर निश्चित करण्यात आली आहे. येत्या सोमवारी 22 जुलैला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2चे प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती ’इस्रो’ने ट्विटरद्वारे दिली. चंद्रावर उतरणार्‍या पहिल्या भारतीय यानाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद श्रीहरिकोटाच्या सतीश …

Read More »

संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संगीत, नाट्य आणि नृत्य क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणार्‍या फेलोशिप आणि विविध पुरस्कारांची घोषणा सोमवारी (दि. 15) करण्यात आली. प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन, नृत्यांगना सोनल मानसिंग, जतीन गोस्वामी आणि कल्याण सुंदरम पिल्लई यांना फेलोशिप तर प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक, अभिनेत्री …

Read More »

राज्याचे मुख्यमंत्रीपद दूरच, 50चा आकडा तरी पार करून दाखवा ; गिरीश महाजन यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान

नाशिक : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने 288पैकी 50चा आकडा पार करून दाखवावा, असे आव्हान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी  दिले आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना आमच्या शुभेच्छा, पण मुख्यमंत्री आघाडीचा होणे हा फार दूरचा विषय, …

Read More »

मराठा आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मराठा आरक्षणावरील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देता येत नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजासह राज्य सरकारला दिलासा दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावर दोन आठवड्यांनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाबाबतचा राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवल्यानंतर या निर्णयाला आरक्षण विरोधकांनी सुप्रीम कोर्टात आव्हान …

Read More »

बा विठ्ठला… जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेेक्षा पूर्ण होऊ दे! मुख्यमंत्र्यांचे साकडे

पंढरपूर : प्रतिनिधी राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, तसेच बळीराजाचे कल्याण व्हावे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्जन्यमान चांगले व्हावे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी  (दि. 12) विठ्ठलचरणी घातले. परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा केली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी अहमदपूरच्या वारकरी …

Read More »

मेट्रो भेदणार वाहतूक कोंडी

पुणे ः मेट्रोच्या कामामुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याची टीका लक्षात घेऊन महामेट्रो कंपनीने ती सोडवण्यासाठी वाहतूक शाखेच्या साह्याने स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. तातडीचे प्रतिसाद पथक म्हणून एक पथक स्थापन केले आहे. पुण्यात वाहतूक शाखेत काम केलेल्या सुमारे 15 अधिकार्‍यांची एक स्वतंत्र टीमच यासाठी तयार करण्यात आली …

Read More »

शिकार्याच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू

अकोट ः प्रतिनिधी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सातपुड्याच्या जंगलात बिबट्याची शिकार करण्यासाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला आहे. फासकीतून सुटका करून घेण्यासाठी धडपडत असताना बिबट्याने जीव गमावला. सातपुड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात बिबट्या, वाघ आणि इतर वन्यप्राणी आहेत. विविध कारणांमुळे बिबट्या, वाघ हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नदी, नाले आणि …

Read More »

प्रवाशांसाठी खूशखबर!

रेल्वेचे तिकीट आरक्षण सोपे; एचओजी प्रणालीचा वापर नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आगामी काळात रेल्वेचे तिकीट आरक्षण अधिक सुलभ होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून रेल्वेत आरक्षित जागेसाठी चार लाखांपेक्षा जास्त बर्थ सीट वाढणार आहेत. त्यासाठी रेल्वेकडून एक भन्नाट आयडिया लढविण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे डब्यातील लाइट आणि एअर कंडिशनरसाठी स्वतंत्रपणे जनरेटर डबा …

Read More »

उर्मिलाने काँग्रेस नेत्यांवर फोडले पराभवाचे खापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत स्थानिक काँग्रेस नेत्यांमुळेच आपला पराभव झाला, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने म्हटले आहे. यासंदर्भात उर्मिलाने मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्रदेखील लिहिले. नेत्यांची अकार्यक्षमता, ढिसाळ नियोजन, कार्यकर्त्यांशी तुटलेला संपर्क आणि पैशाची मागणी या मुद्द्यांचा उर्मिला पत्रात उल्लेख केल्याचे वृत्त आहे. उर्मिला मातोंडकरने …

Read More »