नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सदस्यांना मंगळवारी (दि. 9) सभागृहात निरोप देण्यात आला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. जुलै 2007मध्ये गुजरातचे पर्यटक जम्मू काश्मिरमध्ये गेले असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आझाद यांच्याबद्दलचा अनुभव …
Read More »पिकांना एमएसपी कायम राहणार; पंतप्रधान मोदींची ग्वाही; शेतकरी नेत्यांना चर्चेचे निमंत्रण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पिकांना एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत कायम राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 8) संसदेत बोलताना दिली. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी कोरोनापासून ते केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांबद्दल अनेक गोष्टींवर भाष्य केले. सुधारित कृषी कायद्यांवरून …
Read More »नंदुरबारमध्ये राज्यातील सर्वांत मोठे ‘कलिंग’; बर्ड फ्लूमुळे तब्बल नऊ लाख कोंबड्या मारल्या जाणार
नंदुरबार : प्रतिनिधी राज्यातील सर्वात मोठे कलिंग नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये होणार आहे. नवापूरमध्ये तब्बल नऊ लाख कोंबड्या मारल्या जाणार आहेत. येथे बर्ड फ्लूचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर कोंबड्या मारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला या ठिकाणी एक लाखपेक्षा अधिक पक्षी मारले जाणार आहेत. यासाठी पशुसंवर्धन विभागाने 100 पथके तैनात केली …
Read More »उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून जलप्रलय; 150 जण वाहून गेले
धरमशाला : वृत्तसंस्था उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी येथे असलेल्या जोशी मठाजवळ रविवारी (दि. 7) सकाळी हिमकडा कोसळला. त्यामुळे धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत अचानक प्रचंड वाढ होऊन नदीकाठावरील घरांना तडाखे बसले. पाण्याच्या प्रवाहात सुमारे 100 ते 150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. हिमकडा कोसळल्यानंतर हिमस्खलन होऊन धौलीगंगा नदीच्या प्रवाहात वाढ …
Read More »सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घणाघाती टीका, नारायण राणेंच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी जनादेशाचा आदर न करता आम्ही वचन तोडले, असे खोटेनाटे सांगून आम्हाला बदनाम केले आणि दगाबाजी केली. आम्ही जनादेशाचा अनादर केलेला नसून त्यांनीच जनादेशाचा अनादर केला आणि सत्तेसाठी लाचारी पत्करली, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (दि. 7) शिवसेनेवर हल्लाबोल केला. खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग …
Read More »कोरोना नियंत्रणाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक
वॉशिंग्टन : वृत्तसंस्थाभारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) भारताचे कौतुक केले आहे. भारताने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यात चांगली कामगिरी केल्याचे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. ट्रेडोस ए. घेब्रेयसिस यांनी म्हटले आहे.या संदर्भात बोलताना ट्रेडोस म्हणाले, भारताने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. …
Read More »देशातील 21.5 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला
राष्ट्रीय सीरो सर्व्हेचा अहवाल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आपला तिसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे पूर्ण केला असून, त्यामध्ये देशातील 21.5 टक्के लोकसंख्येला कोरोना होऊन गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.आयसीएमआरने आपला तिसरा सीरो सर्व्हे 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर रोजी केला होता. त्यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर …
Read More »मोदी सरकार गाव, गरीब आणि शेतकर्यांच्या हितासाठी बांधिल : कृषिमंत्री
नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत प्रगती करीत आहे. मोदी सरकार गाव, गरिब आणि शेतकर्यांच्या हितासाठी बांधिल आहे, असे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे. ते राज्यसभेत बोलत होते.कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले की, 70 हजार कोटी रुपये गावांच्या विकासासाठी देण्यात आले आहेत. येत्या पाच वर्षांत ग्रामीण भागावर …
Read More »विल्यम्सनकडून टीम इंडियाचे कौतुक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत मिळविलेल्या यशाचे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने कौतुक केले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतील स्थान न्यूझीलंडने पक्के केले असून त्या पार्श्वभूमीवर अंतिम फेरीत कोणत्या संघाविरुद्ध खेळायला आवडेल असे विचारले असता विल्यम्सन म्हणाला की, भारत, इंग्लंड हे दोघेही एकमेकांच्या तोडीस तोड असून, ऑस्ट्रेलियाचा संघही …
Read More »दिल्ली हिंसाचार प्रकरणात मध्यस्थी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत प्रवेश करीत शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी करणार्या याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कायदा आपले काम करीत असून, या संबंधी काही निवेदन द्यायचे असेल तर ते केंद्र सरकारला देण्यात यावे, असे निर्देशही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper