Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

गुजरातमधील मनपा निवडणुकीत भाजपचा विजयी षटकार

अहमदाबाद : वृत्तसंस्थागुजरातमध्ये झालेल्या सहा मोठ्या शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने विजयाचा षटकार मारला आहे. भाजपने अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या सहापैकी सहा महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली.अहमदाबादमध्ये 192 पैकी हाती आलेल्या कलांमध्ये भाजपने 116 जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. काँग्रेसला केवळ 21 जागांवर आघाडी मिळाली, तर …

Read More »

देशाच्या आरोग्यव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची चतु:सूत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्थायंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रात केलेल्या भरीव तरतूदीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबिनारमध्ये आपली भूमिका मांडली, तसेच देशाच्या आरोग्यव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने नियोजन केलेली चतु:सूत्रीदेखील सांगितली.भारताचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी आम्ही चार मुख्य गोष्टींवर काम करीत आहोत. यामध्ये रोगप्रतिबंध आणि आरोग्याचा प्रसार, सर्वांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे, आरोग्य …

Read More »

काँग्रेसला धक्का : आणखी एका राज्यातील सरकार कोसळले

पुद्दुचेरीत मुख्यमंत्री नारायणसामी यांचा राजीनामा पुद्दुचेरी : वृत्तसंस्थाकेंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, काँग्रेस आघाडीचे सरकार कोसळले आहे. विधानसभेत या सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारूढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर …

Read More »

आता प. बंगालमध्येही परिवर्तन होणार -मोदी

हुगळी : पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (दि. 22) हुगळी येथील एका सभेत बोलताना तुमचा उत्साह आणि ऊर्जा कोलकाताहून दिल्लीपर्यंत एक मोठा संदेश देत आहे. आता पश्चिम बंगालने परिवर्तनासाठी मन बनवले आहे, तसेच कमळ पश्चिम बंगालमध्ये अस्सल परिवर्तन आणणार असल्याचे प्रतिपादन …

Read More »

अमरावतीमध्ये लॉकडाऊन; लग्न, सामाजिक-राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध

अमरावती : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अमरावती जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात वाढल्याने रविवारी (दि. 21) एका दिवसाचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. अशातच अमरावती व अचलपूरमध्ये पुढील आठवडाभरासाठी लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. सोमवारी (दि. 22) रात्री 8 …

Read More »

काँग्रेसच्या जनआक्रोश रॅलीच्या मंचावर डान्सरने लगावले ठुमके; व्हिडीओ व्हायरल

रांची : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे काँग्रेसकडून समर्थन करण्यात आले आहे, मात्र झारखंडमधील सरायकेला-खरसावो जिल्ह्यात काँग्रेसतर्फे शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आयोजित जनआक्रोश रॅलीत चक्क एका डान्सरचे ठुमके पाहावयास मिळाले. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्याद्वारे ही रॅली …

Read More »

आर्थिक विकासासाठी खासगी क्षेत्रांचा सन्मान आवश्यक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र व राज्य सरकारांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे. आर्थिक प्रगतीसाठी सरकारने खासगी क्षेत्रांचा सन्मान करून त्यांना योग्य प्रतिनिधित्वही द्यायला हवे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 20) व्यक्त केले. आर्थिक वाढ मजबुतीसाठी केंद्र व राज्य सरकारांची एकी आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. …

Read More »

काँग्रेसला सतावतेय आर्थिक चणचण

फंड उभारण्याचे नेते, पदाधिकार्‍यांना आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला आर्थिक चणचण भासत असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यासाठी एक बैठकही घेण्यात आली. काँग्रेसची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असून, या बैठकीत निधी उभारण्यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते.मिळालेल्या माहितीनुसार 2014मध्ये देशात …

Read More »

कोविशिल्ड लशीच्या जगभर वापरास ‘डब्ल्यूएचओ’ची मंजुरी

नवी दिल्ली : भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करीत असलेली कोरोना लस कोविशिल्डचा वापर आता जगभरात होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनका यांनी तयार केलेल्या दोन लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या लशीशिवाय दक्षिण कोरियाच्या एस्ट्राझेनका एसकेबायो या लशीचा समावेश आहे. डब्ल्यूएचओने सांगितले …

Read More »

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पोलीस दबावात असल्याने कारवाई होत नाहीए!, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी ज्या प्रकारे ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या आहेत ते पाहता कारवाई होणे आवश्यक आहे, मात्र या प्रकरणात पोलीस कोणत्या ना कोणत्या दबावात काम करीत असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे या प्रकरणी कोणतीही कारवाई होत नाहीए, असा आरोप विधानसभेतील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पत्रकारांशी …

Read More »