Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

वन डे मालिकेत भारत हरला, पण राहुल-श्रेयसने मने जिंकली!

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका 5-0ने जिंकल्यानंतर वन डे मालिका यजमानांनी 3-0ने जिंकत भारताच्या व्हाईटवॉशला त्याच पद्धतीने उत्तर दिले. असे असले तरी के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीने आपल्या सर्वांगसुंदर खेळीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताच्या के. एल. राहुलने …

Read More »

हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी जनभावना तीव्र

आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा वर्धा : प्रतिनिधीहिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळलेल्या पीडित प्राध्यापक तरुणीचा सोमवारी (10 फेब्रुवारी) मृत्यू झाला. त्यानंतर जनभावना तीव्र बनल्या आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात 302 या कलमाची वाढ केली आहे. आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरुवातीला …

Read More »

झारखंड विकास मोर्चाचे भाजपत विलीनीकरण

भाजपची ताकद वाढणार रांची : वृत्तसंस्थाझारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी 14 वर्षांनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी 17 फेब्रुवारीला रांचीत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी झारखंड विकास मोर्चाचे भाजपत विलीनीकरण करण्यात येईल. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर उपस्थित राहणार …

Read More »

‘कोरोना’ : भारताचा चीनला मदतीचा हात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अशा वेळी भारताने या शेजारच्या देशाला मदतीचा हात देऊ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग यांना पत्र लिहून मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रात चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत पावलेल्या नागरिकांबाबत शोक …

Read More »

…तर देश बदलला नसता!

पंतप्रधान मोदींचे विरोधकांवर शरसंधान नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. देशातील जनतेने फक्त सरकार बदलले नाही, नव्या विचाराने काम करण्याची संंधी आम्हाला दिली. आम्हीही काँग्रेसच्या वाटेने गेलो असतो, तर देश बदलला नसता, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर शरसंधान साधले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा …

Read More »

मराठा आरक्षणाला स्थगितीस ‘सर्वोच्च’ नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थामराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थिगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने बुधवारी (दि. 5) सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता 17 मार्चला सुरू होणार आहे.राज्य सरकारने शिक्षण आणि …

Read More »

अयोध्येत राम मंदिर निर्मितीसाठी केंद्राकडून ट्रस्टची स्थापना

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभेत माहिती नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअयोध्येत राम मंदिराची निर्मितीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्यास उत्तर प्रदेश सरकारने सहमती दिल्याचेही त्यांनी सांगितले.राम मंदिर …

Read More »

वाढवण येथील बंदराला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात डहाणूजवळ वाढवण येथे प्रमुख बंदर उभारायला तत्वत: मंजुरी दिली आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च 65,544.54 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. वाढवण बंदर लँड लॉर्ड मॉडेलच्या धर्तीवर विकसित केले जाईल. प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) सह 50% …

Read More »

‘सीएए’विरोधातील आंदोलनांमागे कारस्थान

पंतप्रधानांची आप, काँग्रेसवर सडकून टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्था‘सीएए’विरोधात सीलमपूर, जामिया, शाहीन बागमध्ये आंदोलने सुरू आहेत. ही आंदोलने योगायोग नाही, तर तो एक प्रयोग आहे. यामागे राजकारणाचे असे डिझाईन आहे, जे राष्ट्राच्या सौहार्दाला बाधा आणत आहे. कायद्याला केवळ विरोध असता तर सरकारच्या आश्वासनानंतर तो संपला असता, पण आप आणि काँग्रेसची …

Read More »

‘शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली’

पुणे : प्रतिनिधी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) मोहिमेबाबत शिवसेनेची भूमिका अत्यंत कलुषित झाली आहे. बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणार्‍या ‘सीएए’-‘एनआरसी’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले पाहिजे, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे ते भूमिका घेत नाहीत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी …

Read More »