Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पुण्यातील घटना

पुणे : प्रतिनिधी पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सतत दोन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध पोक्सो, अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक केली गेली आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबरला …

Read More »

ऊस उत्पादकांना मोदी सरकारचा दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि आर्थिक सुधारणा समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी दोन निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचे आहेत. सर्वात मोठा दिलासा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिला आहे. इथेनॉलच्या किंमतीत 5 ते 8 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर …

Read More »

प्रत्येक भारतीयाला मिळणार कोरोना लस : पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी संकट पूर्णपणे टळले नाही. जेव्हा कोरोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिले आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी हा …

Read More »

शरद पवारांकडे सरकार चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट; चंद्रकांत पाटील यांची टीका

सांगली ः प्रतिनिधी राज्यातील विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग? सध्या शरद पवार हेच राज्य चालवतात. त्यामुळे त्यांनाच भेटले पाहिजे. शिवाय मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपाल व शरद पवार हेच भेटीसाठी जास्त उपलब्ध असतात, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि. 29) सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केली. …

Read More »

राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

दरभंगा : वृत्तसंस्था बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला बुधवारी (दि. 28) सुरुवात झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची दरभंगा येथे रॅली झाली. या वेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. ‘आज सर्वांची नजर अयोध्येवर आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आता राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये कोणालाही आता जमीन खरेदी करता येणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील कोणतीही व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करून तेथे स्थायिक होऊ शकते, मात्र शेतजमिनीवरील बंदी अद्याप कायम असणार आहे. या संदर्भात गृह मंत्रालयाने मंगळवारी (दि. 27) अधिसूचना जारी केली आहे. याबाबत उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरचे उद्योग …

Read More »

मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली; सरकारी वकिलांच्या अनुपस्थितीमुळे संताप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणी सुरू झाली त्या वेळी सरकारी वकील अनुपस्थित होते. त्यामुळे राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची टीका होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मंगळवारी (दि. 27) पहिल्यांदाच ही सुनावणी झाली. या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागले …

Read More »

खडसेंच्या सत्कारप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित

जळगाव ः प्रतिनिधी – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते रविवारी (दि. 25) पहिल्यांदाच जळगाव शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात आले होते. या वेळी राष्ट्रवादी महानगरकडून त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले, मात्र या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते दिसून न आल्याने हा कार्यक्रम  चर्चेचा विषय …

Read More »

‘शिवतीर्थावर गर्दीचे विक्रम मोडणारा दसरा मेळावा घेणार’

बीड : भाजपच्या राष्ट्रीय नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त सावरगाव घाट येथे भगवानगडावर जोशपूर्ण भाषण केले. मी आता राष्ट्रीय मंत्री असल्याचे सांगत पक्षवाढीसाठी आपली जबाबदारी वाढल्याचेही पंकजा यांनी म्हटले. कोरोनामुळे दसर्‍या मेळाव्याला गर्दी नाही, पण गर्दीचे विक्रम मोडणार दसरा मेळावा आपण घेऊ. एक दिवस शिवाजी पार्क …

Read More »

संरक्षणमंत्र्यांनी केली शस्त्रपूजा

दार्जिलिंग ः वृत्तसंस्था – विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (दि. 25) पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथे शस्त्रपूजा केली. या वेळी भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावावर त्यांनी भाष्य केले. लडाख सीमारेषेवर शांतता असावी आणि तणाव संपुष्टात यावा, अशी इच्छा राजनाथ सिंह यांनी या वेळी व्यक्त केली. भारताचे …

Read More »