Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

छत्रपती शिवरायांचा अपमान केलेला नाही

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्पष्टीकरण नवी दिल्ली : वृत्तसंथानवनिर्वाचीत राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. या वेळी खा. उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना ’जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली. छत्रपती …

Read More »

काँग्रेसला धक्का, तर पायलट यांना दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाराजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर आज गुरुवारी (दि. 23) सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष जोशी यांनी केलेली मागणी फेटाळून लावली. त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणीचा आणि निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी …

Read More »

कोवॅक्सीनच्या मानवी चाचणीला ‘एम्स’मध्ये सुरुवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात बनविण्यात येणारी कोरोना विषाणूवरील लस अर्थात कोवॅक्सीनची मानवी चाचणी घेण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालय सज्ज झाले आहे. मानवी चाचणीची मुख्य जबाबदारी सांभाळणारे डॉ. संजय राय यांनी ऑल इंडिया रेडिओला या संदर्भातील माहिती दिली. डॉ. राय म्हणाले की, कोवॅक्सिन या लसीची एम्स रुग्णालयात मानवी चाचणी करण्यासाठी स्वयंसेवकांची …

Read More »

शरद पवार यांचा प्रभू रामचंद्रांना विरोध; भाजप नेत्या उमा भारती कडाडल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शरद पवारांनी राम मंदिराबाबत केलेले वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील नाही, तर प्रभू रामचंद्रांविरोधातील आहे, अशी घणाघाती टीका भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती यांनी केली आहे. रामाचे मंदिर बांधून कोरोना निघून जाईल असे मोदी सरकारला वाटत आहे. त्यामुळे या मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख आणि इतर …

Read More »

राम मंदिर उभारणीचा मुहूर्त ठरला? पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला भूमिपूजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या शनिवारी झालेल्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राम मंदिर शुभारंभ सोहळ्याला 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून …

Read More »

देशात समूह संसर्ग; आयएमएचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव भारतातही दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या वर गेल्यानंतर समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती भयावह असल्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने दिला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार रविवारी (दि. 19) सकाळपर्यंत भारतात …

Read More »

देशात कोरोनाचा वाढता संसर्ग

24 तासांत तब्बल 34,884 नवे रुग्ण; 671 जणांचा मृत्यू नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 18) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 34 हजार 884 नव्या रुणांची नोंद झाली असून, 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 22 हजार 942 रुग्ण बरे झाले. …

Read More »

कोरोनापासून बचावासाठी काळी मिरी, रम आणि अंडी!

मंगळुरू : वृत्तसंस्था जगभरात कोरोना व्हायरसने कहर माजवला आहे. विविध देशांतील वैज्ञानिक कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत असून, कोरोनावरील लस येण्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच कर्नाटकातील उल्लाल नगर परिषदेतील काँग्रेस नगरसेवकाने कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी रम, काळीमिरी आणि अंड्यांचे सेवन करण्याचा अजब उपाय सुचविला आहे. हा …

Read More »

…तर जशास तसे उत्तर देऊ : राजनाथ सिंह

लडाख : वृत्तसंस्थाभारताच्या एक इंचही जमिनीला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही किंवा त्यावर कब्जा करूही शकणार नाही. आम्हाला शांतता हवी आहे. भारताने कोणत्याही देशाच्या स्वाभिमानावर कधी हल्ला केला नाही, मात्र भारताच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न जर झाला, तर ते सहन केले जाणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देण्यात …

Read More »

आपापसात मारामार्‍या करा, पण लोकांचा विचार करा!

देवेंद्र फडणवीस  यांचा महाविकास आघाडीला टोला नवी दिल्ली : वृत्तसंस्थामहा जॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसने शिवसेना-राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली होती. हा धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आपापसात मारामार्‍या करा, पण लोकांचा विचार करा, असा टोला महाविकास आघाडीला लगावला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर …

Read More »