Breaking News

मुंबई – नवी मुंबई

एमआयडीसी क्षेत्रात उद्योग मित्र कार्यालय उभारण्याची मागणी

खारघर : प्रतिनिधी एमआयडीसी क्षेत्रात उद्योग मित्र कार्यालय उभारावी तरच नवे उद्योजक घडतील, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अभय भोर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. महाराष्ट्रात छोटे मोठ्या अंदाजे 295 एमआडीसी कार्यक्षेत्र आहेत. या भागातील उद्योजकांना जागे संदर्भात शासकीय योजना विजे संदर्भात आणि शासकीय परवानग्याची या …

Read More »

स्नेहलता साठे यांचे निधन

ठाणे ः प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायणराव सावरकर यांच्या कन्या स्नेहलता सदाशिव साठे यांचे ठाणे येथे कर्करोगाने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे, चित्रा मसलेकर या कन्या व मुलगा इंद्रजित साठे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चपला हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव. चपलाआत्या म्हणून …

Read More »

अवाजवी वीज बिल वाढीची मनसेने नवी मुंबईत फोडली हंडी

नवी मुंबई : बातमीदारलॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती बिकट असताना ग्राहकांना अवाजवी बील देणार्‍या महावितरणच्या नवी मुंबईतील कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 11) तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी सेक्टर 17 मधील कार्यालयात घुसून प्रवेशद्वारावर खळ्ळ् खट्याक केले. लॉकडाऊनच्या काळात महावितरणकडून नागरिकांना वाढीव बिले देण्यात आली आहेत. सर्व ग्राहकांना अंदाजे आणि …

Read More »

खासगी रुग्णालयांतील लूटमार रोखण्यात राज्य सरकार अपयशी

फडणवीस, दरेकर यांचा हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीराज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकडून वाट्टेल तशी बिलांची आकारणी होत असून, खुलेआम सुरू असलेली ही लूटमार रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावा विधिमंडळातील विरोधी पक्षाने केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, गेले जवळपास …

Read More »

सिरमकडून लसींची नोंदणी करावी; आमदार गणेश नाईक यांची मागणी

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई शहरातील नागरिकांना भेडसाविणार्‍या समस्या व त्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मंगळवारी (दि. 11) भेट घेतली. या वेळी सिरम इन्स्टिट्यूटमार्फत तयार करण्यात येत असलेल्या लसींची नोंदणी नवी मुंबई पालिकेने करून ठेवावी. त्यामुळे नवी मुंबईकरांना डोस उपलब्ध होऊन कोरोनाचा …

Read More »

बाप्पा पावला! ई-पासमधील विघ्न दूर; चाकरमान्यांना मिळाला दिलासा

मुंबई ः प्रतिनिधी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍या चाकरमान्यांना खूशखबर मिळाली आहे. आता चाकरमान्यांच्या ई-पासमधील अडथळा दूर झाला आहे. कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी पास दिलाच पाहिजे, असे आदेशच सर्व पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच पोलिसांच्या संकतेस्थळावरही गणेशोत्सावासाठी ई-पासचा स्वतंत्र पर्याय देण्यात आल्याने कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना तत्काळ ई-पास मिळणार असून त्यांचा कोकणात जाण्याचा प्रवास …

Read More »

पारसिक हिलवर उन्मळलेल्या झाडांना जीवदान

नवी मुंबई : बातमीदार रेसिडेंट असोसिएशनकडून निसर्ग वाढवण्यासाठी धडपडणार्‍या या संस्थेने निसर्ग वाचवण्यासाठी पारसिक हिलवर केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत असेच म्हणावे लागेल. त्यानुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात उन्मळून पडलेल्या वृक्षांचे क्रेनच्या साहाय्याने पुनररोपण करत नवी मुंबईसमोर आदर्श निर्माण केला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या धुवादार पावसात नवी मुंबईतील पारसिक …

Read More »

सिडकोकडून विलंब शुल्क माफ; भाजपच्या मागणीला यश

मुंबई : प्रतिनिधी सिडकोच्या 2018-19 मधील घर विजेत्यांना अखेर सिडकोने दिलासा दिला आहे. सिडकोने टाळेबंदीच्या कालावधीतील कर्जाच्या हफ्त्यांवरील विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली आहे. याबाबत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच …

Read More »

‘नेरूळमधील तानाजी मालुसरे क्रीडांगणात कृत्रिम तलाव बनवा’

नवी मुंबई : बातमीदार नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनविण्याची मागणी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी ‘ब’प्रभाग समिती सदस्य   मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे. सध्या कोरोना काळ सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाची आकडेवारी दररोज वाढत …

Read More »

नवी मुंबई पालिकेस वैद्यकीय सुरक्षा साधने प्रदान

नवी मुंबई : बातमीदार कोव्हीड 19 विरोधातील लढाईत विविध सामाजिक संस्था, उद्योगसमुह यांची स्वयंस्फुर्तीने मदत नवी मुंबई महानागरपालिकेस लाभत आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 8) टाटा इंटरनॅशनल लिमी. यांच्या सीआर निधीतून एक कोटी 77 लक्ष रक्कमेची वैद्यकीय सुरक्षा साधने देण्यात आली आहेत. यामध्ये 10 हजार 500 नग एन 95 मास्क, 10 …

Read More »