नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची प्रचंड वाढती संख्या पाहता कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल जलद प्राप्त व्हावा, याकरिता नवी मुंबईमध्येच कोरोना टेस्टिंग केंद्र व लॅब उभारणेकरिता आमदार मंदा म्हात्रे या गेले चार महिने सातत्याने प्रयत्न करत असून त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आले आहे. लवकरच नवी मुंबईमध्ये …
Read More »सुशांत सिंह राजपूतची हत्या झालीय -राणे
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे. सुशांतची माजी असिस्टंट मॅनेजर दिशा सालियनचीही बलात्कार करून हत्या केली गेलीय, असा दावा भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केला आहे. या प्रकरणात राज्य सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
Read More »महानगरपालिकेचे परिपत्रक इंग्रजीतूनही देण्याची मागणी
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई हे कॉस्मोपोलिटन शहर असल्याने विविध जातीधर्माचे व प्रांतातील नागरिक येथे राहत आहेत. त्यामुळे पालिकेने लॉकडाऊन, कोविड व नव्या नियमांच्या संदर्भातील परिपत्रक मराठीसोबतच इंग्रजीतही द्यावे. अनेक अमराठी नागरिकांना पालिकेच्या मराठीतील परिपत्रकाचा अर्थ कळत नाही. त्यामुळे अनेकदा माहिती पोहचत नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडतो.मुंबई महापालिकादेखील मराठी व …
Read More »‘राम मंदिर भूमिपूजन सोहळा सणासारखा साजरा करा’
नवी मुंबई ः बातमीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य राम मंदिराचा पायाभरणी समारंभ बुधवारी (दि. 5) होत आहे. नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसाठी हा आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असल्याने हा दिवस सर्व कार्यकर्त्यांनी घरी राहून दिवाळी-दसर्यासारखा उत्साहात साजरा करण्याचे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे. अयोध्येत …
Read More »मुंबईत उद्यापासून सर्व दुकाने उघडणार
सम-विषम फॉर्म्युला बंद मुंबई : प्रतिनिधीयेत्या 5 ऑगस्टपासून मुंबईतील सर्व दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दुकाने उघडण्याची वेळ ही याआधी कमी होती तसेच ऑड-इव्हन तत्त्वावर ही दुकाने सुरू होती, परंतु आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत 5 ऑगस्टपासून मुंबईतील सर्व दुकाने ही …
Read More »सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण
अधिकार्याला क्वारंटाइन केल्याने वाद मुंबई : प्रतिनिधीबॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात 35हून अधिक जणांची चौकशी केल्यानंतरही सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अशातच या प्रकरणाच्या तपासासाठी बिहारमधून आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी मुंबईत दाखल होताच महापालिकेने त्यांना …
Read More »विद्यार्थ्यांनी बांधल्या वृक्षांना राख्या
नवी मुंबई : प्रतिनिधी – वृक्ष ही सजीवांच्या जीवनासाठी अनमोल आहेत. परंतु सिमेंटची जंगले उभी राहत असताना वृक्ष संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. भावी पिढीकडून वृक्षाकडे दुर्लक्ष होऊ नये. न्यू बॉम्बे सिटी स्कूल, घणसोलीमधील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधल्या व वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. घणसोली सेक्टर 9 मधील न्यू बॉम्बे …
Read More »सर्व रुग्णांची माहिती देणे दवाखान्यांना बंधनकारक
मृत्यूदर कमी करण्यासाठी नवी मुंबई पालिकेची उपाययोजना नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत आजमितीस 431 मृत्यू झाले आहेत. तर एकूण 16 हजारांच्यावर रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. असे असले तरी नवी मुंबईचा मृत्युदर 2.67 असून तो कमी होताना दिसत नाही. पालिकेकडून आयसीयू, व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन बेड वाढवण्याचे काम वेगात सुरू …
Read More »लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची मागणी
मुंबई : प्रतिनिधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी विदर्भ खान्देश मातंग सेवा संघ या संस्थेने केली असून याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच दिले आहे. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दीवर्ष निमित्त त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याकरिता केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचे निवेदन देण्यात आले. …
Read More »‘त्या’ पाटर्या कुणाच्या आशीर्वादाने?
भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधीबॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून लॉकडाऊनमध्येही सेलिब्रिटी पाटर्या होत असल्याचे उघडकीस आले आहे. या पाटर्यांमागचा बोलविता धनी कोण आहे? यामागे मंत्री आहेत की अधिकारी? असे सवाल करून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे …
Read More »