Breaking News

मुंबई – नवी मुंबई

राज ठाकरेही मंदिर प्रवेशावरून आक्रमक

मुंबई ः प्रतिनिधी  भाजप, वंचित बहुजन आघाडी व एमआयएमपाठोपाठ आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही मंदिर प्रवेशावरून राज्यातील आघाडी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. सरकारला मंदिरे उघडण्याबाबत इतका आकस का आहे, असा सवाल करतानाच सर्वांत शेवटी मंदिरे उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नका. मंदिरे उघडण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतला नाही, तर …

Read More »

आगामी नवरात्रोत्सवासाठी मूर्तिकारांना दिलासा द्यावा

भाजपची मागणी मुंबई ः प्रतिनिधीगणेशोत्सव काळात उत्सवाची नियमावली, चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय व अन्य मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला धारेवर धरणार्‍या भाजपने आता सरकारला नवरात्रोत्सवाची आठवण करून दिली आहे. या वेळी मूर्तिकारांना दिलासा देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र …

Read More »

नवी मुुंबई पालिका अधिकार्यांच्या चौकशीची मागणी

आमदार गणेश नाईकांचा पालकमंत्र्यांना इशारा नवी मुंबई : बातमीदार – आरोग्य विभागात ठाणेकरांच्या आशीर्वादाने कोणताही अनुभव नसताना व उपवैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या अधिकार्‍यांची व त्यांनी केलेल्या कामांची व दिलेल्या कंत्राटांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचा इशारा …

Read More »

राज्यात कोरोनाचा कहर

देशातील प्रत्येक चौथा रुग्ण महाराष्ट्रातील मुंबई : प्रतिनिधीदेशातील एकूण रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच देशात आढळून आलेल्या चार रुग्णांपैकी एक महाराष्ट्रातील आहे. काळजी वाढवणारी गोष्ट देशात आतापर्यंत 66 हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून, यातील 25 हजारांच्या जवळपास रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. देशात बुधवारी …

Read More »

राज्यात ई-पासची अट रद्द

मुंबई : राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या निर्बंधांबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. अखेर राज्य शासनाने ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक-4संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधने शिथील झाली आहेत.

Read More »

‘अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार’

मुंबई : प्रतिनिधीअंतिम वर्षाच्या परीक्षांसंबधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राज्य शासन नमले असून, परीक्षा घेण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील. परीक्षा शक्यतो ऑनलाईन घेण्याचा विचार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि. 31) येथे पत्रकार परिषदेत दिली.मुख्यमंत्र्यांशी …

Read More »

आरटीई अंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया अपूर्ण

प्रतीक्षा यादीतील पालक चिंतेत; शैक्षणिक नुकसानीची भीती नवी मुंबई : आरटीईच्या अंतर्गत प्रवेशाची ऑनलाइन सोडत मार्च महिन्यात जाहीर करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे, निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश प्रकिया सुरू होण्यास विलंब झाला आहे. शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू झाले असून, निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. …

Read More »

नवी मुंबईतील 850 पोलीस कोरोनामुक्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनावर मात करण्यात नवी मुंबई पोलिसांनी यश मिळविले आहे. त्याकरिता पोलिसांच्या वेलनेस टिमचे नियोजन महत्वाचे ठरत आहे. या दरम्यान अनेक पोलिसांच्या कुटुंबांना जीवदान देण्याचे काम या टीमच्या नियोजनातून शक्य झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या नियोजनाचे इतरत्र कौतुक होत आहे. राज्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला …

Read More »

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना प्रकृतीच्या समस्या

उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अडचण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीच्या इतर समस्या जाणवत आहेत. त्यामध्ये दीर्घकाळ अशक्तपणा, मानसिक तणाव यासह उच्च रक्तदाबाच्या समस्या समोर येत आहेत, परंतु अशा समस्यांवर उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अनेकांपुढे अडचणी निर्माण होत आहेत. कोरोनाची लक्षणे समोर येताच खासगी …

Read More »

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर; ग्रामीण भागातही होतोय वेगाने प्रसार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या गेला आठवडाभर सातत्याने वाढत असून, रविवारी (दि. 30) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये राज्यात 17 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या दृष्टीने चिंताजनक गोष्ट म्हणजे याआधी शहरी भागापुरता मर्यादित असलेला कोरोना आता ग्रामीण भागातही झपाट्याने पसरू लागला आहे. कोरोनाच्या रुग्णांचा विचार करता मुंबई, …

Read More »