Breaking News

मुंबई – नवी मुंबई

बारावीचा आज निकाल

बारावीचा आज निकाल मुंबई : प्रतिनिधी राज्य शिक्षण बोर्डाच्या वतीने फेबुवारी-मार्च २०२० रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.१६) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. बोर्डाने बुधवारी ही घोषणा केली. परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळवलेले गुण बोर्डाच्या वेबसाईटवरुन पाहता येणार आहेत तसेच त्याची प्रिंट आउटही घेता येणार …

Read More »

मराठा आरक्षणावर तुर्तास अंतरिम आदेश नाही

27 जुलैपासून नियमित सुनावणी मुंबई : प्रतिनिधीमराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास कोणताही अंतरिम आदेश अथवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली नाही. आता या संदर्भात 27 जुलैपासून नियमित सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेच्या निर्णयावर बुधवारी (दि. 15) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. सर्वोच्च …

Read More »

लॉकडाऊनमध्ये खेळाडूंना सरावाकरिता परवानगी द्यावी; राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक शिवाजी ढवळे यांची मागणी

नवी मुंबई ः बातमीदार संपूर्ण देशासह नवी मुंबईतही कोरोनाने थैमान घातले आहे. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांना कोरोनाने ग्रासले. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांसह देशाचे भवितव्य असणार्‍या खेळाडूंनाही बसला आहे. लॉकडाऊनमुळे  घराबाहेर पडणे कठीण झाल्याने खेळाडूंना सराव करता येत नाही. परिणामी खेळाडूंतील सरावाची वृत्ती व प्रतिकारशक्ती कमी होत …

Read More »

तोडक कारवाईच्या नोटिसा मागे न घेतल्यास आंदोलन! आमदार मंदा म्हात्रे यांचा सिडकोला इशारा

नवी मुंबई ः प्रतिनिधी सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग अस्वस्थ असताना सिडको प्रशासनाकडून नवी मुंबईमधील गावठाण क्षेत्रातील घरांना तोडक कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी तोडक कारवाईही सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाईच्या नोटिसा तत्काळ मागे घेण्यात याव्यात याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव …

Read More »

नमुंपाचे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर लागले कामाला; कोरोनाचा भस्मासूर रोखण्याचे आव्हान

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली होऊन नवे आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेचा कार्यभार स्वीकारला. नवी मुंबईत कोरोनाने आपला डंख बाहेर काढला असताना राजकीय घडामोडींना वेग आल्याचे बांगर यांच्या नियुक्तीवरून दिसून आले आहे. मुख्य म्हणजे चार्ज घेतल्यावर नवनियुक्त आयुक्त बांगर यांनी तातडीने अधिकार्‍यांची बैठक …

Read More »

‘माझा मोरया’ गरजवंतांना देणार अवघ्या 101 रुपयांत गणेशमूर्ती

नवी मुंबई : बातमीदार पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सीवूडमधील पंकज सातपुते व रोहन पाटील यांनी गेल्या अनेकवर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विक्रीस ठेवल्या आहेत. कालानुरूप आता या व्यवसायाला ऑनलाइन स्वरूप आणताना उभा दोन तरुणांनी माझा मोरया अ‍ॅप विकसित केले असून त्याद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती तयार करताना कोरोनाच्या …

Read More »

लॉकडाऊनमध्ये नवी मुंबईकरांना 15 दिवसांची इलेक्ट्रिक बाइक राइड

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या युलू सायकलला लॉकडाऊनमुळे खीळ बसली आहे. लॉकडाऊनआधी नवी मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेली इलेक्ट्रिकची  बाइक कल्पना पुन्हा नागरिकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार नवी मुंबईकरांना 999 रुपये भरून 15 दिवस इलेक्ट्रिक बाइक आपल्या घरी ठेवून वापरता येणार आहे.  नवी मुंबईकरांना कोरोना काळात …

Read More »

कोरोना : राजभवनाचे सॅनिटायझेशन

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विशेषतः मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. येथील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना राजभवनातील जवळपास 18 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर राजभवन व आसपासच्या परिसरात सॅनिटायझेशन (निर्जंतुकीकरण) करण्यात आले आहे. राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी …

Read More »

कबड्डी दिन कार्यक्रम रद्द

मुंबई : प्रतिनिधी कबड्डीमहर्षि कै. शंकरराव (बुवा) साळवी यांचा 15 जुलै हा जन्मदिवस. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे हा दिवस कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनामुळे  यंदा हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय राज्य संघटनेने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेल्या जिल्ह्यांमध्ये गेली 20 वर्षे  कबड्डी दिन साजरा केला …

Read More »

ऐश्वर्या, आराध्याह कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ‘बिग बी’ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात अभिषेकचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यापाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्या या …

Read More »