Breaking News

मुंबई – नवी मुंबई

‘तो’ मेसेज म्हणजे अफवा!

मुंबई : प्रतिनिधीसोशल मीडियावर सध्या 140 या अंकाने सुरुवात होणार्‍या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसीव्ह केल्यास आपल्या खात्यातील सर्व रक्कम काढली जाते, असा मेसेज व्हायरल होत आहे, मात्र या व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. जोपर्यंत बँक अकाऊंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड …

Read More »

आता अभिनेत्री केतकी चितळेकडून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख

मुंबई : प्रतिनिधीस्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने शोदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असतानाच आता मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर एक पोस्ट लिहून महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे ती ट्रोल होत आहे.जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. हा व्हिडीओ सोशल …

Read More »

गणेशमूर्तीला उंचीचे बंधन

राज्य सरकारकडून भाविकांसाठी नियमावली मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने 12 मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीच्या उंचीला चार फुटांचे, तर घरगुती मूर्तीला दोन फुटांचे बंधन घालण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी राज्यातील गणेशोत्सव मंडळांसोबत बैठका घेतल्या होत्या. त्यात झालेल्या चर्चेनुसार राज्य …

Read More »

नवी मुंबईत लॉकडाऊनमध्ये सात दिवसांची वाढ

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने लॉकडाऊनमध्ये सात दिवसांची वाढ केली आहे. त्यानुसार 13 तारखेच्या माध्यरात्रीपासून 19 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवेत मोडणारे एपीएमसी मार्केट व एमआयडीसी सुरू राहणार आहे. गेले तीन दिवस पालिका क्षेत्रातील रुग्णस संख्येत वाढ झालेली पाहायला …

Read More »

‘दहावी, बारावी परीक्षेचा निकाल याच महिन्यात’

हिंगोली : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. 10) माहिती दिली. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलैदरम्यान, तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचे गायकवाड यांनी हिंगोली येथे बोलताना सांगितले. लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने …

Read More »

नवी मुंबईतील मृत्यूदरात वाढ; कोरोनामुळे महिनाभरात 182 बळी

पनवेल : बातमीदार पहिली टाळेबंदी उठवल्यानंतर 9 जुलैपर्यंत महिनाभरात कोरोनाबाधितांची संख्या पाच हजार 455ने वाढली असून मृतांची संख्या 96 वरुन 278 झाली आहे. त्यामुळे शहरातील मृत्यूदर हा 3.13 वरून 3.26 पर्यंत वाढला आहे. 9 जूनला नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 3063 होती तर कोरोनामुळे 96 मृत्यूमुखी पडले होते. राज्यशासनाने 8 जूननंतर …

Read More »

राजगृह तोडफोडप्रकरणी आरोपींना अटक करा

देवेंद्र फडणवीस यांची मागणी मुंबई : प्रतिनिधीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी (दि. 7) संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला असून, आरोपींना तत्काळ अटक केली जावी, अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट …

Read More »

नवी मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग; एक लाख 60 हजार चाचण्यांचे लक्ष्य

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी येत्या काळात एक लाख 60 हजार नागरिकांच्या चाचण्या घेण्यास पालिका प्रयत्नशील असल्याची माहिती पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली. नवी मुंबईत बाधितांची संख्या 8072 झाली आहे, तर आजवर 260 जण मृत्युमुखी पडले आहेत. मुंबईप्रमाणेच चाचण्यांची गती वाढवून रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा …

Read More »

राज्य सरकारने महावितरणला निधी द्यावा

आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदारकोरोना महामारीने नागरिकांच्या हाताला काम उरलेले नाही. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या असून, कित्येक जणांच्या पगारात कपात केली गेली आहे. अशा वेळी राज्य सरकारने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित असताना उलट शासनाचे प्राधीकरण असलेल्या महावितरणकडून नागरिकांची लूट सुरू आहे. ती थांबावी यासाठी सरकारने महावितरणला …

Read More »

नवी मुंबई महापालिका प्लाझ्मा थेरपीसाठी प्रयत्नशील

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महापालिका परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे बरे होणार्‍यांचे प्रमाणदेखील अधिक आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 50 टक्के असताना नवी मुंबईचा रिकव्हरी रेट 57 ते 58 टक्के आहे. त्यात सध्या देशात बरे होणार्‍या कोरोना रुग्णांचा वापर करीत प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली असून ती …

Read More »