मुंबई : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या देशभरात जो लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे, त्या काळात प्रत्येक गरजू आणि गरिबाला तीन महिन्यांचे धान्य एकत्रित आणि मोफत मिळावे, यासंदर्भात स्पष्ट आदेश केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या आदेशातील त्रुटी त्वरित दूर करून प्रत्येक गरजूला धान्य मिळेल हे सुनिश्चित करावे, अशी …
Read More »अझिम प्रेमजींकडून 1125 कोटींचा निधी
मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातीले उद्योगपती पुढे येत आहेत. टाटा, अंबानी यांच्यानंतर आता विप्रो कंपनीचे अझिम प्रेमजी यांच्याकडून कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 1125 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. विप्रो लिमिटेडने 100 कोटी, विप्रो इंटरप्रायझेसने 25 कोटी, तर अझिम प्रेमजी फाऊंडेशनने 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली …
Read More »कोरोना रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित
विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांची माहिती नवी मुंबई : विमाका निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या कोकण विभागातील 200 जण आढळून आले आहेत. त्यांचा शोध झाला असून उर्वरित लोकांची माहिती घेण्यात येत आहे, असे कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी सांगितले. शिवाजी दौंड म्हणाले की, निजामुद्दीन …
Read More »‘मुंबई वेस्ट मॅनेजमेंट’कडून तळोजा पोलिसांना आर्थिक मदत
पनवेल : वार्ताहर चीनमधून आलेल्या कोविड 19 अर्थात कोरोना या विषाणूने जगभरात थैमान घातल्यानंतर त्याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तसेच यापासून संरक्षण करण्याकरिता केंद्र तसेच राज्य सरकारने देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केले असताना या विषाणूला रोखण्यासाठी त्यासंदर्भात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना …
Read More »नवी मुंबईत आणखी दोन रुग्ण
पनवेल : बातमीदार नवी मुंबई शहरात मंगळवारी (दि. 31) कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 11वर गेली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाशी येथे मंगळवारी कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला. हा रुग्ण वाशीतील मशिदीमध्ये फिलिपिन्स नागरिकांच्या संपर्कात …
Read More »‘कोरोना चाचणीचे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे असावे’
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचणी करण्यासाठी मान्यताप्राप्त लॅबकडून चाचणी करून दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिका चार हजार पाचशे रुपये शुल्क आकारणार आहे. खासगी रुग्णालयांकडून कमी दर आकारणी होत असल्याने पालिकेच्या या शुल्क आकारणीस विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईत कोरोनासाठी सध्या एकही सरकारी संस्था …
Read More »कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध
विद्यार्थ्यांच्या खात्यात होणार थेट रक्कम जमा मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळा आणि वसतिगृहातून घरी पाठवण्यात आले असले तरी उपस्थितीचा निकष न लावता सरसकट शासन निकषाचे पालन करुन डीबीटीव्दारे आश्रमशाळेतील दुसरा हप्ता व शासकीय वसतिगृह तसेच स्वंयम योजनेचा चौथा हप्ता (माहे मार्च ते मे) रक्कम वर्ग …
Read More »गृहनिर्माण संस्थांनी सूचनांचे पालन करावेे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोचे आवाहन नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि संसर्गजन्य आजार प्रतिबंध अधिनियम 1897 अंतर्गत कार्यवाही करत 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. तसेच कलम 144 अंतर्गत संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. अनावश्यक गर्दी टाळून कोरोना …
Read More »मास्कचा काळाबाजार करणार्यांना मोक्का लावा -आशिष शेलार
मुंबई : प्रतिनिधी वांद्रे येथे मास्कचा काळाबाजार करणार्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी मास्कचा साठा करून काळाबाजार करणार्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे, मात्र …
Read More »राज्यात कोरोनाचा चौथा बळी
65 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू मुंबई : प्रतिनिधी जगभरात थैमान घालणार्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच असून राज्यात मंगळवारी (दि. 24) कोरोनामुळे 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. या मृत्यूमुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे. मंगळवारी मृत्यू झालेला इसम 15 मार्च रोजी …
Read More »