Breaking News

मुंबई – नवी मुंबई

देशपातळीवरील ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील राहण्यायोग्य शहरांची स्पर्धा (ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स) आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये देशातील 264 स्मार्ट सिटी प्रकल्पातील शहरे तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’मध्ये देशातील तृतीय क्रमांक मिळविणारे नवी मुंबई शहरही …

Read More »

नवी मुंबईत गोवरचे घरोघरी सर्वेक्षण

शहरात 160 संशयित, तर सहा पॉझिटिव्ह रुग्ण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई सह ठाणे शहरात गोवर बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत रुग्णसंख्या 156 वर पोहचली आहे . त्याचबरोबर नवी मुंबईतही गोवरचे 160 संशयित रुग्ण असून 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने सतर्क बाळगण्यासाठी प्रतिबंधात्मक …

Read More »

एकसंघ शक्तीने प्रश्न सोडविता येतात

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचे प्रतिपादन नवी मुंबई : बातमीदार कष्टकरी माथाडी कामगारांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व्यापार आणि काम वाढले पाहिजे.त्यासाठी व्यापारी, बाजार समिती, कामगार व अन्य घटकांनी एकसंघ रहाणे गरजेचे आहे. आपल्या एकसंघ शक्तीने शासनाकडून आपले प्रश्न सोडविता येतील, असे उद्गार महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार …

Read More »

बालदिनानिमित्त नवी मुंबईत विविध उपक्रमांना प्रतिसाद

नवी मुंबई : बातमीदार सदैव मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारे  टाइनि एन शायनि (किड्स हेअरकट सलून) शेट्येज् कॉन्सिअस पॅरेंटिंग आणि दुर्गेश्वरी महिला मंडळ ह्या तीन संस्था एकत्र आल्या. बेलापूरच्या सेक्टर 8मधील आंगणवाडीतील लहान मुलांना त्याच्या बालपणीच्या रमणीय, आनंददायी दिवसामधील  बालदिन हा संस्मरणीय व्हावा आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्वाकडे त्यांची वाटचाल अधिक दृढतेने …

Read More »

वैद्यकीय महाविद्यालय भूखंड खरेदीत चालढकल -आमदार मंदा म्हात्रे

व्यवहार पूर्ण करा, अन्यथा आंदोलन करू; नवी मुंबई पालिकेला दिला इशारा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी सिडकोकडून भूखंड प्राप्त झाला आहे. सहज शक्य असूनही त्याची रक्कम अदा करून भूखंड घेतला जात नसल्याने अखेर आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिकेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. …

Read More »

शिवरायांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून परत आणणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही ब्रिटनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचं सांगत ही तलवार 2024पर्यंत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले. जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत यावी यासाठी …

Read More »

राज्यात तब्बल 7750 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विविध जिल्ह्यांतील तब्बल सात हजार 750 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी बुधवारी (दि. 9) केली. राज्य निवडणूक आयुक्त युपीएस …

Read More »

“भारत जोडो यात्रेत भ्रष्टाचारातील पैशांचा वापर”

खर्चाच्या चौकशीची भाजपची मागणी मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर आरोप केला आहे. मागील अडीच वर्षांतील सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराचा पैसा या यात्रेसाठी वापरण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे तसेच या यात्रेवर …

Read More »

केबीपी कॉलेजमध्ये भष्ट्राचार निर्मूलनासाठी जनजागृती

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमधील (केबीपी) राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी भष्ट्राचार प्रतिबंधात्मक सप्ताहाच्या निमिताने  31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत पथनाट्यातून जनजागृती केली. भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक सप्ताह दरम्यान स्वयंसेवकांनी संपूर्ण नवी मुंबई परिसरातील विविध ठिकाणी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती …

Read More »

पावसामुळे टोमॅटोच्या दरात घसरण तर डाळिंबाचे दर भिडले गगनाला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात विविध ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे एपीएमसीत टोमॅटो 40 रुपये किलो, तर किरकोळाला 50 ते 55 रुपये किलोपर्यंत दरवाढ झाली होती. मात्र, दिवाळीनंतर हे दर किलोमागे 25 रुपयांनी घसरले असून किरकोळ बाजारात 30 रुपये किलोने टोमॅटोची …

Read More »