Breaking News

मुंबई – नवी मुंबई

प्ले-ऑफच्या चार टीम ठरल्या

मुंबई : प्रतिनिधी कोलकात्याविरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईचा विजय झाला. या विजयाबरोबरच मुंबई यंदाच्या मोसमात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तसेच मुंबईच्या विजयामुळे कोलकात्याचे प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद या चार टीम प्ले-ऑफसाठी क्वालिफाय झाल्या आहेत. आयपीएलच्या ग्रुप स्टेजच्या शेवटच्या मॅचमध्ये प्ले-ऑफच्या टीम ठरल्या आहेत. आयपीएल …

Read More »

मुंबईचा 9 गडी राखून दणदणीत विजय ; कोलकाता नाईट रायडर्स प्ले-ऑफमधून बाहेर

मुंबई : प्रतिनिधी मुंबईने शेवटच्या साखळी सामन्यात कोलकात्यावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी 134 धावांचे आव्हान सहज पार केले. कर्णधार रोहित शर्माने 48 चेंडूत 55 धावांची खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 27 चेंडूंत 46 धावांची नाबाद …

Read More »

यंदा आंबा शौकिनांची निराशा

मुंबई ः प्रतिनिधी यंदा लहरी हवामानामुळे आणि आंब्यावर आलेल्या रोगामुळे सर्वच ठिकाणांच्या आंब्याचे पीक 50 टक्के घटले आहे. त्यामुळे यंदा बाजारात आंबा कमी आला. त्यात यावर्षीचा हंगामही लवकरच संपणार असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आंबा खवय्यांनी आताच आंब्याचा आस्वाद घ्यावा, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. हापूस आंब्याचा हंगाम हा व्यापार्‍यांसाठी मोठा आणि …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल ः प्रतिनिधी कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. 7) उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सकाळी 9.30 वाजता पुण्यतिथी कार्यक्रम व त्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने होणार्‍या या कार्यक्रमास समारंभ अध्यक्ष …

Read More »

नेरूळमध्ये उद्घाटन होण्याआधीच उद्यानाचा वापर सुरू

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत तयार केलेल्या नेरूळ येथील उद्यानात जोडप्यांचा वावर सुरू झाला आहे. या उद्यानाचे काम सुरू असताना कामगारांसमोरच अश्लील चाळे करण्यात येत आहेत. त्यात भरीस भर म्हणून या उद्यानातील फुलवलेल्या हिरवळीवर नागरिक खुशाल डुलकी काढत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून उद्यानाचे …

Read More »

सत्याग्रह महाविद्यालयात करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या 16 ते 20 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यासाठी, शांताबाई रामराव सभागृह सत्याग्रह महाविद्यालय, खारघर, नवी मुंबई येथे रविवार दि. 5 मे 2019 रोजी सकाळी 10.30 ते 04.30 वेळात करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन संस्थेच्यावतीने केले आहे. संस्थेच्या माजी अध्यक्षा दिवंगत शांताबाई …

Read More »

आंब्यांना विदेशात मागणी वाढली ; नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या हापूसवर ग्राहकांच्या उड्या

नवी मुंबई : बातमीदार सध्या केमिकलयुक्त भाज्या, धान्य व फळे पिकवण्याची चढाओढ लागलेली सर्वत्र पाहायला मिळते. कमी पैशात घातक रसायने वापरून पिकवलेली फळे सर्रास बाजारात मिळतात. अस्सल खवय्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आंब्याची देखील त्यातून सुटका झालेली नाही. अशा घातक रासायनांनी पिकवण्यात येणार्‍या फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे, मात्र सध्या …

Read More »

नवी मुंबईकर ओलांडणार उच्च मतदानाचा टप्पा?

नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी (दि. 29) पार पडत आहे. त्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे. यात ठाणे, मीरा-भाईंदरसोबत नवी मुंबईतदेखील मतदान होणार आहे. कडक उन्हाळ्यात महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांत घटलेल्या मतदानाच्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना चिंतेत टाकले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील जागरूक मतदार मतदानाचा टक्का …

Read More »

कट्टर शिवसैनिक विरुद्ध गद्दार अशी लढत -विजय नाहटा

नवी मुंबई : बातमीदार ठाणे लोकसभा मतदारसंघात होणारी लढत ही कट्टर शिवसैनिक विरुद्ध गद्दार अशी असून, राजन विचारे हे चार लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केला, तर गद्दार आनंद परांजपे यांना जनताच धडा शिकवेल, अशी टीकाही त्यांनी केली. ते  वाशी येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात …

Read More »

नवी मुंबईत निवडणूक यंत्रणा झाली मतदानासाठी सज्ज

नवी मुंबई : बातमीदार : शनिवारी प्रचार थंडावल्यावर निवडणूक यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे. अनेक दिवस मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या निवडणूक यंत्रणेसमोर आता निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान आहे. त्यानुसार 28 एप्रिल रोजी सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी व मतपेट्या पोहचल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्राजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात …

Read More »