Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मृत्यूनंतरही सात जणांना दिले जीवदान

नवी मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्रातील बीड येथील 17 वर्षीय तरुणाच्या पालकांनी अतिशय धाडसी निर्णय घेत आपल्या मृत मुलाचे यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे, त्वचा आणि डोळे हे अवयव दान केले आहेत. त्यांच्या या उदात्त कृतीमुळे सात जणांना अवयवदानाचा फायदा होऊन त्यांची आयुष्ये वाचली. 2019 सालातील हे मुंबईतील 28वे, तर नवी मुंबईतील पाचवे …

Read More »

जागरूक तरुणामुळे वाचले; एमएसईबीचे ट्रान्समिशन कार्यालय

नवी मुंबई : बातमीदार नेरूळ येथील सोमनाथ म्हात्रे या कर्तव्यदक्ष तरुणामुळे मोठ्या आगीची हानी टळली आहे. जिमखान्यासमोर असलेल्या एमएसईबीच्या ट्रान्समिशन कार्यालयाशेजारी असलेल्या सुक्या पालापाचोळ्याला अज्ञात इसमाने आग लावली. ही आग पसरत जाऊन आजूबाजूला पसरली. या भागाला खेटूनच   एमएसईबीच्या कार्यालय असल्याने मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता, परंतु म्हात्रे यांनी तातडीने अग्निशमन …

Read More »

नागपुरात नितीन गडकरींचे शक्तिप्रदर्शन

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी विविध जागांवर जवळपास सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे उमेदवारही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याच्या सोमवारच्या (दि. 25) शेवटच्या दिवशी दिग्गज उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री …

Read More »

सातार्याचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपमध्ये

मुंबई : प्रतिनिधी सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 25) भाजपमध्ये प्रवेश केला. ’बारामतीशी आमचा थेट संघर्ष झाला,’ असे म्हणत रणजितसिंह यांनी भाजप प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. माढा लोकसभा मतदारसंघातील युतीची उमेदवारी भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना देण्यात येण्याची शक्यता व्यक्त …

Read More »

ऐरोली येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान

ऐरोली येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, साठे नगर, ठाणे बेलापूर रोड, दिघा, ऐरोली, नवी मुंबई येथे रविवार, दिनांक 24 मार्च, 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 86 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. रक्त संकलनाचे कार्य …

Read More »

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे धाडसत्र; 75 लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

तुर्भे : रामप्रहर वृत्त तुर्भे एमआयडीसी येथून गुन्हे शाखा पोलिसांनी 73 लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तेथील गोदामावर अवैधरीत्या साठवण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, गोदाम मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. शहरात गस्त वाढविण्यात आली असून याआधीही कोपरखैरणे, पनवेल …

Read More »

नवी मुंबईतील मच्छीमारांना नुकसानभरपाई आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रयत्न यशस्वी, एमएमआरडीए अधिकार्यांसह बैठक

नवी मुंबई : बातमीदार एमएमआरडीए  न्हावा-शिवडी सी लिंक क्वारीडोअर रस्त्याचे काम हे समुद्रातून होत असल्यामुळे नवी मुंबईतील कोळीबांधवांच्या होत असलेल्या नुकसान भरपाई पुनर्विकास पॅकेज संदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचीएम.एमएमआरडीए  सह संबंधिक अधिकार्‍यांसमवेत बांद्रा येथील कार्यालयात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता दत्तात्रेय ठुबे, अधीक्षक अभियंता  …

Read More »

मागील लोकसभा निवडणुकीत ’नोटा’ला 60 लाख मते; मतदारांची उद्विग्नता

मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध पक्ष आणि पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. मतदानापूर्वी सर्वच पक्ष विविध प्रकारे मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पक्षाचे जाहीरनामे वाचून दाखवतात. असे असतानादेखील अनेक ठिकाणी ‘नोटा’ अर्थात ’नन ऑफ अबाऊ’ या पर्यायाचा मतदानात अधिक वापर झाल्याचे 2014च्या निवडणुकीत दिसून …

Read More »

तोरंगणा घाट दरीत बस कोसळली चौघे ठार; 45 जण जखमी

ठाणे : प्रतिनिधी मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगणा घाटात बस दरीत कोसळल्याने चार प्रवासी ठार झाले असून, 45 जण जखमी झाले आहेत. शिर्डी दर्शन करून डहाणूकडे जाताना रविवारी (दि. 24) दुपारी हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुजरातमधील भाविक खाजगी बसमधून शिर्डीहून डहाणूतील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत होते. त्यांची बस …

Read More »

ईटीपीबीएस मतपत्रिकांची सुविधा

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाकडून विशेष प्रयत्न मुंबई ः प्रतिनिधी :  लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस व्होटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) उपलब्ध करून दिली आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख …

Read More »