Breaking News

मुंबई – नवी मुंबई

..तर तुम्ही मुख्यमंत्रिपदाची मागणी करूच कशी शकता?

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल मुंबई : प्रतिनिधी गेल्या तीन वर्षांत राज्यात दोन वेळा सत्तापालट झाले. या दोन्ही वेळी प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या व यातून सत्तेची समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर 2019च्या सत्तानाट्यावरून टीकास्त्र सोडले …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चौथी मार्गिका विचाराधीन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या मार्गिकेचा विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 22) विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केल्या गेलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक खूप वाढली …

Read More »

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राऊत हे पत्राचाळ घोटाळाप्रकरणी सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक …

Read More »

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज

खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी व सागरी सुरक्षा दल यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सव साजरा करताना मंडप आणि बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह देखावे, फलक व चित्रफिती करू नये, जबरदस्तीने वर्गणी गोळा …

Read More »

नवी मुंबई मनपा मेडिकल कॉलेजसाठी गतिमान

आरोग्य सेवेला मिळणार बळकटी; कामांना आला वेग नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेतर्फे प्रथमच स्वतःच्या मालकीचे पदव्युत्तर पदवी मेडिकल कॉलेज सुरू केले जाणार आहे. त्याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मे 2023पर्यंत मुदत प्रशासनाला दिली आहे. या मेडिकल कॉलेजमुळे येत्या तीन वर्षांत महापालिकेच्या वाशी आणि तेरणा या दोन …

Read More »

भाकरीचे गाव म्हणून होतेय घणसोलीची ओळख

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त भाकरी ही नवी मुंबईतील घणसोली गावाची वेगळी ओळख म्हणून उभी राहिली आहे. एकट्या घणसोली गावातून दररोज सुमारे 10 हजार भाकरींची विक्री होते. तांदळाच्या भाकरी बनवूनच या गावातील प्रत्येक महिला आज सक्षम बनली आहे. स्वातंत्र्यलढ्यात घणसोली गावचे फार मोठे योगदान आहे. गावचा चेहरामोहरा नवी मुंबई महापालिका, …

Read More »

नवी मुंबईत विसर्जनासाठी 135 कृत्रिम तलाव

महापालिकेचे नियोजन; नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना यंदा परवानगी दिल्याने या वर्षी या मूर्त्यांची संख्या 50 टक्केपर्यंत असणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर नियोजन केले असून शहरात 135 असे तलावांचे नियोजन केले जाणार आहे. मागील दोन वर्षांत …

Read More »

‘अभिनंदन’ने फोडली सोन्याची हंडी

नवी मुंबई : प्रतिनिधी सानपाडा सेक्टर 8मधील हुतात्मा बाबू गेनू मैदानावर भाजप युवा नेते पांडुरंग आमले यांनी मानाची सोन्याची दहीहंडी आयोजित केली होती. ही ‘सोन्याची हंडी’ मुंबईतील फेरबंदर येथील अभिनंदन गोविंदा पथकाने आठ थर लावून फोडली. भाजप नवी मुंबई महामंत्री निलेश म्हात्रे यांच्या हस्ते सव्वातीन लाख रुपये किमतीच्या मानाची हंडीचे …

Read More »

नवी मुंबईत गणेशमूर्ती विसर्जनासाठी नियोजन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना यंदा परवानगी दिल्याने या वर्षी या मूर्त्यांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत असणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर नियोजन केले असून शहरात 135 असे तलावांचे नियोजन केले जाणार आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे शहरात गणेशोत्सव साधेपणाने निर्बंध घालून …

Read More »

नवी मुंबई स्वाईन फ्ल्यू टेस्टींगला सुरूवात

कोव्हीड आरटी-पीसीआर लॅबमध्ये सुविधा नवी मुंबई : बातमीदार कोविड प्रभावित काळामध्ये आयसीएमआर शासकीय परवानगीसह केवळ 11 दिवसांच्या कालावधीत सुरू केलेल्या नवी मुंबई महपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरूळ येथील आरटी-पीसीआर लॅबमुळे जलद रिपोर्ट प्राप्त होऊन कोविडचा प्रभाव रोखण्यासाठी अतिशय मोलाची मदत झाली. प्रतिदिन 5000 टेस्ट्स क्षमतेच्या या लॅबमध्ये 4 ऑगस्ट …

Read More »