Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मुंबई-पुणे महामार्गावर लवकरच ‘इंटिलिजेंट मॅनेजमेंट ट्राफिक सिस्टीम’

‘एमएसआरडीसी’कडून कार्यादेश जारी; वाहनचालकांवर राहणार करडी नजर मुंबई : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) लवकरच बसविण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने यासंबंधीचे कार्यादेश संबंधित कंपनीला दिले आहेत. दरम्यान, महामार्गावर नऊ महिन्यांमध्ये यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यानंतर महिन्याभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. एकूणच वर्षभरात …

Read More »

आगामी सर्व निवडणुका भाजपा-शिवसेना युतीने लढविणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे येथे कार्यक्रमात प्रतिपादन ठाणे : प्रतिनिधी ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील दीडशेहून अधिक संस्थांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृहात शनिवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत झाली. या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. 14) जाहीर केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय …

Read More »

भाजपची नवी मुंबईत तिरंगा रॅली

नवी मुंबई : बातमीदार भाजप नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत व बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांनी तुर्भे येथे हरघर तिरंगा अभियानाच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन केले होते. तसेच प्रभाग क्रमांक 25मधील एसएससी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. हरघर तिरंगा मोहीम घराघरात पोहोचली आहे. देशाला 13 ते 15 …

Read More »

राज्यातील 608 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

18 सप्टेंबरला मतदान; सरपंचपदाची थेट जनतेतून होणार निवड मुंबई : राज्यात पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी तत्काळ आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. …

Read More »

नवी मुंबईत ठिकठिकाणी नारळीपौर्णिमेचा जल्लोष

नवी मुंबई : बातमीदार नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. त्यामुळे किनारी भागातील संस्कृतीच्या महत्त्वाच्या अशा या सणाला नवी मुंबईतील सर्वच खाडीकिनार्‍यांसह, कोळीवाड्यांत गुरुवारी (दि. 11) मोठा उत्साह पाहायला मिळाला. सरसोळे जेट्टी दिवाळे, ऐरोली, दिवा कोळीवाडा, वाशी खाडीकिनारा, घणसोली कोळीवाडा, बेलापूर गावासह समस्त …

Read More »

नेरूळ विभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागांतर्गत सेक्टर 23 जुईनगर येथील जागृती को. ऑप. हौ. सोसायटी, याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. या बांधकामावर मनपातर्फे निष्कसनाची कारवाई करण्यात आली. या अनधिकृत बांधकामास बी विभाग कार्यालय, नेरूळ यांचेमार्फत नोटीस बजावण्यात आलेली होती, परंतु …

Read More »

ऐरोलीत सायकल रॅलीद्वारे घरोघरी तिरंगा उपक्रमाचा प्रचार

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका ऐरोली विभाग कार्यालयाच्या वतीने निर्धार फाउंडेशन यांच्या सहयोगाने भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सेक्टर 19 ऐरोली येथील नेवा गार्डनपासून सेक्टर 15 ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत ही सायकल रॅली अतिशय उत्साहात झाली. यामध्ये 200हून अधिक …

Read More »

नवी मुंबईचा विकास आराखडा जाहीर

नागरिकांच्या हरकती, सूचनांसाठी मनपाकडून खुला नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई पालिकेची 1992साली स्थापना झाली, मात्र आजतागयात नवी मुंबईचा विकास आराखडा तयार केला गेला नव्हता. आता 2018 साली महासभेत सर्वानुमते मंजूर होऊन शासनाला पाठवलेला व राजकारणात अडकलेल्या विकास आराखड्याला शासनकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेने हरकती व सूचना मागवण्यासाठी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्षपदी ; मुंबईची धुरा आशिष शेलारांकडे

मुंबई :  प्रतिनिधी भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे त्यांच्या जागी बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आमदार आशिष शेलार यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यमान भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचीही मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने महापालिका …

Read More »