Breaking News

मुंबई – नवी मुंबई

अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याक डून मनी लाँडरिंगचा आरोप मुंबई : प्रतिनिधी अनिल परबांच्या दापोलीतील रिसॉटवर हातोडा पडणार असल्याचे पुढे येत आहे. त्यांनी बांधलेले रिसॉर्ट हे बेकायदेशीर असल्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठविला आहे. या प्रकरणी सोमय्या हे नुकतेच दापोलीत दाखल झाले आहेत. दरम्यान जर हे रिसॉर्ट पाडले …

Read More »

रयत शिक्षण संस्था माझी मातृसंस्था – लोकनेते रामशेठ ठाकूर

वाशीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्था ही माझी मातृसंस्था आहे, असे प्रतिपादन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये आयोजित विद्यार्थी शिष्यवृत्ती समारंभात ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये विद्यार्थी …

Read More »

कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना शनिवारपासून टोलमाफीची सवलत

पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. 27)पासून करण्यात येत आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत 11 सप्टेंबरपर्यंत असणार …

Read More »

मराठा आरक्षण निवडसूचीतील 1064 उमेदवारांना तत्काळ नियुक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या एक हजार 64 उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 26) येथे जाहीर केले. मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या संदर्भात आयोजित बैठकीत ते …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात डीएलएलई प्रशिक्षण कार्यक्रम

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 26) लाईफ लाँग लर्निंग अ‍ॅण्ड एक्सटेशन मुंबई विद्यापीठ विभागातर्फे डीएलएलईचा प्रथम सत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी डीएलएलई मुंबई विद्यापीठचे अध्यक्ष डॉ.कुणाल जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच …

Read More »

शाळेच्या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालावी

भाजप अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष विकास सोरटे यांची मागणी नवी मुंबई ः बातमीदार वाशी विभागातील सेक्टर 9 व 10 येथे होऊ घातलेल्या इमारत पुनर्विकास प्रकल्पांतर्गत होणार्‍या कामामुळे विभागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हे काम सुरू असलेल्या विभागात नवी मुंबईतील शाळा, कॉलेज व हॉस्पिटलही आहे, मात्र ऐन शाळेच्या वेळी या …

Read More »

गणपती बाप्पांचा नैवेद्यही महागणार!

भाज्यांचे दर चढेच; सामान्यांच्या खिशाला कात्री नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त श्रावण महिना सुरू होण्याआधीपासूनच वाढलेले भाज्यांचे दर उतरण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यात आता गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी भाज्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे भाज्यांचे दर आणखी चढे राहणार असल्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. घाऊक बाजारातच भाज्या महागल्याने …

Read More »

विधिमंडळात नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटीलांच्या नावाचा ठराव मंजूर!

भूमिपुत्रांचा सन्मान केल्याची सर्वपक्षीय कृती समितीची भावना मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धारशिव तर नवी मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील या नावांना गुरुवारी (दि. 25) विधासभेत मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Read More »

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी तीन हजार एसटी गाड्या आरक्षित

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सोडण्यात येणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तीन हजार गाड्या आरक्षित झाल्या आहेत, तर आणखी काही गाड्यांचे आरक्षण सुरू आहे. कोकणासाठी गुरुवारपासून (दि. 25) 27 गाड्या तर रविवारी (दि. 28) एक हजार 241 गाड्या मुंबई, ठाणे, पालघरमधून निघणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने …

Read More »

भाजप कोकण विकास आघाडीतील तालुकानिहाय नेमणुका जाहीर

मुंबई, नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते मुंबई उपनगर, वसई, विरार, नालासोपारा, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबईमध्ये मागील 15 ते 20 वर्षे कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. या सर्वांना भाजप कोकण विकास आघाडी, मुंबईच्या माध्यमातूनश्री कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली  तालुका निहाय जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारी (दि. …

Read More »