Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मोरबे धरणातील पाणीसाठा असमाधानकारक

1800 मिमी पावसाची आवश्यकता नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण आतापर्यंत 72.65 टक्के भरले आहे. उपलब्ध पाणीसाठा नवी मुंबईकरांची तहान 7 एप्रिलपर्यंत पुरेल इतकाच असून धरण भरण्यासाठी 1800 मिमी पावसाची आवश्यकता आहे. पुढील काळात पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस न झाल्यास शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे. …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताह; राष्ट्रगीत समूह गायनाने प्रारंभ

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि. 9) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताहाला राष्ट्रगीताचे सामुहिकरित्या गायन करून सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, सर्व प्राध्यापकवृंद, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व डी.एलएलई आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व …

Read More »

खारघरमध्ये पे पार्किंग करण्याची मागणी

भाजप नेते प्रभाकर घरत यांचे पमपा प्रशासनाला निवेदन खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 4मधील रस्त्यावर पे पार्किंग करण्याची मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. घरत यांनी निवेदनात म्हटले आहे की, बेलपाडा खारघर सेक्टर 3 बेलपाडा गाव शेजारी असलेल्या गॅरेजच्या दुकानांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या …

Read More »

ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

मुंबई : प्रतिनधी मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे मंगळवारी (दि. 9) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेे. ते 64 वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. प्रदीप पटर्वधन यांनी अनेक मराठी नाटके, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. गिरगावात राहणार्‍या पटवर्धन …

Read More »

शिंदे फडणवीस सरकारच्या 18 जणांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी (दि. 9) विस्तार करण्यात आला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त कॅबिनेट मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी आठ जणांचा समावेश आहे. यापुढे होणार्‍या विस्तारात राज्यमंत्र्यांची घोषणा होणार आहे. शपथविधी समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री …

Read More »

राख्या घेण्यासाठी लगबग वाढली

नवी मुंबई : बातमीदार बहीण-भावाचे नाते अधिक दृढ करणार्‍या रक्षाबंधन सणाची सर्वांना उत्सुकता असते. येत्या 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने विविध बाजारपेठेत राखी खरेदीला सुरुवात झाली आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदा रक्षाबंधन मोठ्या उत्साहात होणार आहे. तर राखी विक्रेत्यांनाही त्यांचा व्यवसाय अधिक काळ करता येणार असल्याने विक्रेत्यांमध्ये आनंद दिसून …

Read More »

ग्रामस्थ घरांत पोहचवणार तिरंगा

नवी मुंबई : बातमीदार देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन सर्वांना मोठ्या अभिमानाने साजरा करता यावा. यासाठी वाशीगाव, वाशी सेक्टर-30, सानपाडा- सोनखारमधील सर्व सेक्टर्स तसेच जुईनगर सेक्टर 22, 22 मधील प्रत्येक घरोघरी अश्या एकूण 15 हजार घरांमध्ये 13 तारखेपासून राष्ट्रध्वज फडकला जाणार आहे. या 15 हजार घरांमध्ये तिरंगा पोहोचवला जाणार आहे. माजी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार

मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (दि. 9) होणार आहे. सकाळी 11 वाजता राजभवनमध्ये शपथविधी सोहळा होईल. याबाबत जनसंपर्क कार्यालयाने पत्रक जारी केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींशी चर्चा केली आहे. त्यानुसार काही मंत्री पहिल्या टप्प्यात शपथ घेतील. यात भाजपमधून चंद्रकांत …

Read More »

पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : प्रतिनिधी पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने (सक्तवसुली संचालनालय) राऊत यांना अटक केली आहे. दरम्यान, आता राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. अटकेनंतर संजय राऊत मागील काही दिवसांपासून ईडी कोठडीत होते. त्यांना सोमवारी …

Read More »

गणेशोत्सवात यंदाही कोकण रेल्वेमार्गावर धावणार मोदी एक्स्प्रेस

मुंबई ः प्रतिनिधी गणेशोत्सव जवळ आल्याने मुंबईत राहणार्‍या कोकणवासियांना गावाकडचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍यांची संख्या जास्त असल्यामुळे एक्स्प्रेसचे तिकीट मिळणे अनेकांसाठी अवघड होते. तिकीट मिळत नसल्याने अनेकजण अतिरिक्त पैसे मोजून बसने जाणे पसंत करतात. यामुळेच गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी यावर्षीही मोदी एक्स्प्रेस घावणार आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ही …

Read More »