Breaking News

मुंबई – नवी मुंबई

विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप

खारघर : प्रतिनिधी कठीण परिस्थितीत व्यवसाय करून आपल्या पाल्यांना उच्च शिक्षित बनविण्याचे स्वप्न पाहणार्‍या रिक्षा चालकांच्या मुलांचा दहावी, बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. खारघर शहरातील एकता रिक्षा संघटनेच्या वतीने दि.7 रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. स्थायी समिती समितीचे माजी सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर व माजी नगरसेवक …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीतही राज्यात भाजपच नंबर वन!

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात झालेल्या 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद पहिला क्रमांक मिळविला असून निवडणुकांमध्ये नंबर वन राहण्याची परंपरा पक्षाने कायम राखली आहे. या यशाबद्दल मी भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कार्यशाळा

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे बुधवारी (दि. 3) मशिन लर्निंग विथ पायथॉन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व समजवण्यासाठी व त्यांचा उपयोग करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील …

Read More »

भाजप राष्ट्रीय विचारधारा मानणारा पक्ष -चंद्रकांत पाटील

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रहीत विचारात घेऊन राजकारण करतो. मात्र विरोधी पक्ष विनाकारण भाजपला विरोध करतांना पक्षाची चुकीची प्रतिमा मांडतात.भाजप मुस्लिम विरोधी नसून राष्ट्रीय विचारधारा मानणारा पक्ष आहे, हे पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला सांगण्याची गरज आहे असे प्रतिपादन भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. …

Read More »

खारघरमध्ये आजारांची मालिका

स्वाईन फ्ल्यू, हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांत वाढ खारघर : रामप्रहर वृत्त शहरात स्वाईन फ्ल्यू, हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच शहरात सध्या विविध ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे नवे संकट उभे ठाकले आहे. खारघरमधील घरकुल तसेच सेक्टर 12 मधील विसावा, शिवाजी, सामुद्रिका, जागृत, …

Read More »

नवी मुंबईत शैक्षणिक साहित्याचे वाटप

आरीन फाउंडेशन व अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्थेचा उपक्रम नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आरीन फाउंडेशन आणि अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था दिवा महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने  आर्थिक दृष्टया गरीब, गरजू,दीन, दुबळे,  अपंग, विधवा, निराधार यांच्या उत्कर्षा साठी सामाजिक उपक्रम राबविले जातात. या सामाजिक उपक्रमाचा एक रविवार शिव मंदिर, कांदा …

Read More »

कचरा वेळेवर उचलावा; भाजपची मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी घणसोली नोड मध्ये गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यावर कचरा पडून आहे, तो लवकरात लवकर उचलावा, अशी मागणी भाजप नवी मुंबई महामंत्री कृष्णा पाटील यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून घणसोली नोड मध्ये घंटागाडी वेळेवर येत नसल्यामुळे  येथील रहिवासी कचरा रस्त्यावर टाकत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत …

Read More »

नवी मुंबईमध्ये असुरक्षित विद्यार्थी वाहतूक

आरटीओकडून 60 वाहनांवर कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शालेय बस आणि व्हॅनमधून होणारी विद्यार्थ्यांची वाहतूक नवी मुंबईमध्ये सुरक्षित नसल्याचे ‘आरटीओ’ने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. 26 जुलैपासून विशेष मोहीम घेऊन 60 वाहनांवर कारवाई करून 89 हजार दंड वसूल केला आहे.  यात वेगमर्यादेच्या उल्लंघनासह क्षमतेपेक्षा अधिकची वाहतूक तसेच वाहनात अग्निशमन …

Read More »

पनवेल-उरणमध्ये मनसेला खिंडार

अनेक पदाधिकार्‍यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश मुंबई ः प्रतिनिधी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना मोठा धक्का बसला असून नेते आणि पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. आता पनवेल, उरणमधील मनसैनिकांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर …

Read More »

मनसे कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यामधील अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर शिवसेनेमधील अनेक नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये प्रवेश केला आहे. नवी मुंबईतील पनवेल, उरण आणि खारघरमधील मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केलाय. …

Read More »