Breaking News

मुंबई – नवी मुंबई

‘दिबां’साठी अधिवेशनात आवाज

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह भाजप आमदारांनी विधानसभेच्या पायर्‍यांवर बसून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. त्याचप्रमाणे घोटाळेबाज आणि दहशतवाद्यांशी संबंधित मंत्र्याला पाठीशी घालणार्‍या राज्य सरकारचा निषेध केला.

Read More »

आश्वासने जाऊदे, पण भाषण ऐकल्याचा आनंद

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या गुरुवारी (दि. 24) मविआ सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, मविआ सरकारने केलेल्या आश्वासनांचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला असेल. पण आज अखेर त्यांचे भाषण ऐकून आनंद …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील  लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो पुन्हा होणार सुरू

मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तयार केलेला स्वातंत्र्यवीर हा लाईट अँड साऊंड शो शनिवारी (दि. 26) पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दादरच्या शिवाजी उद्यानासमोरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात दर शनिवार आणि रविवारी रात्री 8 वाजता दाखवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात 66 फूट …

Read More »

कामावर उशिरा येणार्‍या तब्बल 191 कर्मचार्‍यांची वेतन कपात; नवी मुंबई मनपाची कारवाई

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कर्मचार्‍यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या धर्तीवर पाच दिवसांचा आठवडा 26 फेब्रुवारी 2020 रोजीच्या महापालिका प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये लागू करण्यात आलेला आहे तसेच कार्यालयीन वेळही निश्चित करून देण्यात आली आहे, मात्र ही वेळ न पाळल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने 191 कर्मचार्‍यांची वेतन कपात केली आहे. कार्यालयीन कामकाजाची …

Read More »

नैना प्रकल्पाबाबत नेमके नियोजन काय?; आमदार प्रसाद लाड यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई ः प्रतिनिधी नैना प्रकल्पात पनवेल, पेणसंदर्भात तेथील प्रकल्प व खासगी फॉरेस्टसंदर्भात कोणतीही स्पष्ट भूमिका नसल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. प्रकल्पाच्या शाश्वत व सुनियोजित विकासाबाबत राज्य सरकारचे नेमके नियोजन काय आहे, असा प्रश्न  अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी (दि. 23) सभागृहात उपस्थित केला. आमदार प्रसाद लाड म्हणाले की, नैनाच्या …

Read More »

महिलांमधील गुण पुढे येण्याची गरज -मधु मंगेश कर्णिक

नेरुळ ः वार्ताहर आज सर्वच क्षेत्रात महिलाही आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडीत असून यास साहित्य क्षेत्रही अपवाद नाही, परंतु त्यांची ही गुणवत्ता प्रभावीपणे पुढे येताना दिसत नसल्याची खंत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी वाशी येथे व्यक्त केली. योगसाधिका शकुंतला निंबाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त योग विद्या निकेतन वाशी येथे कोकण मराठी साहित्य …

Read More »

नवी मुंबईची सागरकन्या मंत्रा कुर्‍हेचा धरमतर ते गेटवे पोहण्याचा नवा विक्रम

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रहिवासी व वाशीच्या फादर आग्नेल हायस्कूलची इयत्ता सातवीत शिकणारी 12 वर्षीय विद्यार्थिनी मंत्रा मंगेश कुर्‍हे या सागरकन्येने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 38 किमीचे सागरी अंतर अवघ्या सात तास आणि 54 मिनिटांत पार करून पोहण्यातील एक नवा विक्रम केला आहे. याआधी …

Read More »

केबीपी कॉलेजतर्फे श्रमदान, बौद्धिक शिबिर

नवी मुंबई : बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी शिबिर 13 ते 19 मार्च रोजी सिध्दी करवले येथे आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान स्वच्छता अभियान, श्रमदान, बौद्धिक व्याख्याने, सर्वे, इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े. 13 मार्च रोजी नवी …

Read More »

शिवजयंतीनिमित्ताने अन्नदान सप्ताह

नवी मुंबई : बातमीदार कोपरखैरणे येथील सिद्धीविनायक प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून कोपरखैरणे सेक्टर 1 येथील बाल आश्रम, वृद्धाश्रम, झोपडपट्टीतील गरजूंना अन्नदान करण्यात आले. सप्ताहाचे आयोजन करून वेगवेगळ्या ठिकाणी सिद्धीविनायक प्रतिष्ठान सदस्यांकडून अन्नदान करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून करोनामध्ये अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्‍याची उपासमार, …

Read More »

मलिकांचा कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई : प्रतिनिधी दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे तसेच यापूर्वी न्यायालयाने मलिकांचा जामीन अर्जदेखील फेटाळला होता. आता परत कोठडीत वाढ झाल्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या 23 फेब्रुवारीला ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या …

Read More »