Breaking News

मुंबई – नवी मुंबई

राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार

मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (दि. 9) होणार आहे. सकाळी 11 वाजता राजभवनमध्ये शपथविधी सोहळा होईल. याबाबत जनसंपर्क कार्यालयाने पत्रक जारी केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींशी चर्चा केली आहे. त्यानुसार काही मंत्री पहिल्या टप्प्यात शपथ घेतील. यात भाजपमधून चंद्रकांत …

Read More »

पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : प्रतिनिधी पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने (सक्तवसुली संचालनालय) राऊत यांना अटक केली आहे. दरम्यान, आता राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. अटकेनंतर संजय राऊत मागील काही दिवसांपासून ईडी कोठडीत होते. त्यांना सोमवारी …

Read More »

गणेशोत्सवात यंदाही कोकण रेल्वेमार्गावर धावणार मोदी एक्स्प्रेस

मुंबई ः प्रतिनिधी गणेशोत्सव जवळ आल्याने मुंबईत राहणार्‍या कोकणवासियांना गावाकडचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍यांची संख्या जास्त असल्यामुळे एक्स्प्रेसचे तिकीट मिळणे अनेकांसाठी अवघड होते. तिकीट मिळत नसल्याने अनेकजण अतिरिक्त पैसे मोजून बसने जाणे पसंत करतात. यामुळेच गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी यावर्षीही मोदी एक्स्प्रेस घावणार आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ही …

Read More »

विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप

खारघर : प्रतिनिधी कठीण परिस्थितीत व्यवसाय करून आपल्या पाल्यांना उच्च शिक्षित बनविण्याचे स्वप्न पाहणार्‍या रिक्षा चालकांच्या मुलांचा दहावी, बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. खारघर शहरातील एकता रिक्षा संघटनेच्या वतीने दि.7 रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. स्थायी समिती समितीचे माजी सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर व माजी नगरसेवक …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीतही राज्यात भाजपच नंबर वन!

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात झालेल्या 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद पहिला क्रमांक मिळविला असून निवडणुकांमध्ये नंबर वन राहण्याची परंपरा पक्षाने कायम राखली आहे. या यशाबद्दल मी भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कार्यशाळा

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे बुधवारी (दि. 3) मशिन लर्निंग विथ पायथॉन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व समजवण्यासाठी व त्यांचा उपयोग करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील …

Read More »

भाजप राष्ट्रीय विचारधारा मानणारा पक्ष -चंद्रकांत पाटील

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रहीत विचारात घेऊन राजकारण करतो. मात्र विरोधी पक्ष विनाकारण भाजपला विरोध करतांना पक्षाची चुकीची प्रतिमा मांडतात.भाजप मुस्लिम विरोधी नसून राष्ट्रीय विचारधारा मानणारा पक्ष आहे, हे पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला सांगण्याची गरज आहे असे प्रतिपादन भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. …

Read More »

खारघरमध्ये आजारांची मालिका

स्वाईन फ्ल्यू, हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांत वाढ खारघर : रामप्रहर वृत्त शहरात स्वाईन फ्ल्यू, हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच शहरात सध्या विविध ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे नवे संकट उभे ठाकले आहे. खारघरमधील घरकुल तसेच सेक्टर 12 मधील विसावा, शिवाजी, सामुद्रिका, जागृत, …

Read More »

नवी मुंबईत शैक्षणिक साहित्याचे वाटप

आरीन फाउंडेशन व अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्थेचा उपक्रम नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आरीन फाउंडेशन आणि अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था दिवा महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने  आर्थिक दृष्टया गरीब, गरजू,दीन, दुबळे,  अपंग, विधवा, निराधार यांच्या उत्कर्षा साठी सामाजिक उपक्रम राबविले जातात. या सामाजिक उपक्रमाचा एक रविवार शिव मंदिर, कांदा …

Read More »

कचरा वेळेवर उचलावा; भाजपची मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी घणसोली नोड मध्ये गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यावर कचरा पडून आहे, तो लवकरात लवकर उचलावा, अशी मागणी भाजप नवी मुंबई महामंत्री कृष्णा पाटील यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून घणसोली नोड मध्ये घंटागाडी वेळेवर येत नसल्यामुळे  येथील रहिवासी कचरा रस्त्यावर टाकत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत …

Read More »