नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त वडाळे तलावाशेजारी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेच्या प्रभारी नगरसचिव यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी निवेदनात म्हटले की, पनवेल महापालिकेची स्थापना नव्याने झालेली आहे. श्री स्वामी विवेकानंद …
Read More »नवी मुंबईत दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सानपाडा नोडमधील प्रभाग 76 मधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून तसेच साईभक्त महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष शारदा पांडुरंग आमले यांच्या सहकार्याने ‘एक दिवा राम मंदिरासाठी’, ‘एक दिवा श्री रामासाठी’ अशी संकल्पना पुढे घेवून येत साईभक्त महिला फाउंडेशन व प्रभाग 76 भाजपच्या वतीने सानपाड्यात रविवारी …
Read More »तलवारीने वार करणारे त्रिकुट गजाआड
पनवेल : वार्ताहर पाळीव डुक्कर चोरण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला हटकरणार्या पितापुत्रावर तिघा चोरट्यांनी तलवारीने वार केल्याची घटना रबाळे एमआयडीसीमध्ये घडली. राजेंद्रसिंह शिखलकरी (वय 60), जगदीश शिखलकरी (वय 40) व त्याचा 16 वर्षीय मुलगा अशी या त्रिकुटांची नावे असून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. या घटनेतील जखमी झालेल्यांमध्ये बाबासाहेब …
Read More »नवी मुंबई पालिकेतील लिपीक लाच स्विकारताना जाळ्यात
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई महापालिकेच्या संगणकिय प्रणालीत कंपनीच्या करावर लावण्यात आलेल्या दंडाची व व्याजाची रक्कम निरंक दाखविण्यासाठी कंपनी मालकाकडे तीन लाख रुपये लाचेची मागणी करणार्या व त्यातील एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता स्विकारणार्या नवी मुंबई महापालिकेच्या सेस-एलबीटी स्थानिक संस्था कर विभागातील लिपिक (कंत्राटी कामगार) विनायक पाटील याला नवी मुंबई …
Read More »वृद्धाच्या डोक्यात बाटली फोडणारे दोघे अटकेत
पनवेल : वार्ताहर नेरूळ येथील गावदेवी मंदिराच्या आवारात दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणांना हटकणार्या 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यावर दोघा तरुणांनी दारुची बाटली फोडून पलायन केल्याची घटना उघडकिस आली आहे. या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर नेरूळ …
Read More »ड्रेनेज परिसरातील खड्डा बुजविला; नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता
पनवेल : वार्ताहर प्रभाग 18 मधील ड्रेनेज परिसरातील धोकादायक असलेला खड्डा तत्परतेने नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पालिका कर्मचार्यांकडून बुजवून घेतला. स्वामी नित्यानंद मार्ग ते टिळक रोड या रस्त्यावरील असलेल्या ड्रेनेजवरील काँक्रीट स्लॅब तुटून खड्डा पडला होता. काही जागरूक नागरिकांनी या खड्डयांमुळे कोणती ही दुर्घटना होऊ नये म्हणून खड्याच्या बाजूला मोठी …
Read More »उरणमध्ये डीपी उघडे; अपघाताची शक्यता; वीजवितरणचे दुर्लक्ष
उरण : वार्ताहर उरण शहरातील कामठा येथील पंचवटी बिल्डिंगसमोरील व श्रीगणेश कृपा बिल्डिंगजवळील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण मंडळाचे डीपी सताड उघडे असून त्याकडे वीज मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे विजेचा शॉक लागून मोठा धोका होऊ शकतो. त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी …
Read More »दिवाळीनंतरही कोरोना लसीकरणाला वेग
नवी मुंबईकरांसाठी महापालिकेचे दुसर्या डोससंदर्भात नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळी उत्सवाच्या कालावधीतही नागरिकांची लसीकरणाविषयी अडचण होऊ नये याकरिता महानगरपालिकेच्या चारही रूग्णालयांतील लसीकरण केंद्रे दिवाळीच्या दिवसात सुरू ठेवण्यात आली होती. कोविड लसीकरणात पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करून घेऊन आता दुसर्या डोसच्या 57 टक्के झालेल्या लसीकरणाला अधिक वेग देण्याच्या …
Read More »राज्य आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया सुरू; श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघाचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 21 वी राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या या दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेश …
Read More »पंढरपुरात पालखी मार्गाचे भूमिपूजन; पंतप्रधान मोदींची ऑनलाइन उपस्थिती
पंढरपूर : प्रतिनिधीपंढरपूरला जोडणार्या सुमारे 225 किलोमीटर लांबीच्या पालखी मार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह वारकर्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वरूपात उपस्थिती लावली. या वेळी पंतप्रधान मोदींनी ‘माझे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper