मुरूड : प्रतिनिधी विश्व हिंदू परिषदेतर्फे मुरूडनजीकच्या तेलवडे आदिवासीवाडीमध्ये गुरुवारी (दि. 4) फराळ वाटपाच्या निमित्ताने तेथील आदिवासी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विहिंपचे तालुका अध्यक्ष दिलीप दांडेकर, दिलीप जोशी, अशोक दिवेकर, दतात्रय गायकवाड, ॠषीकांत दांडेकर, वावडुंगीचे माजी सरपंच अजित कासार, मेघराज जाधव यांनी श्री भोगेश्वर मंदिरात फराळाचे संकलन करून तेलवडे …
Read More »खारघरमध्ये रंगली दिवाळी पहाट
खारघर : रामप्रहर वृत्त दिवाळी आणि दिवाळी पहाट हे एक स्वतंत्र समीकरण आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. 4) ‘दिवाळी पहाट’ या सुरेल गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख …
Read More »कितीही संकटे आली, तरी दिवाळी अंकांची परंपरा खंडित होणार नाही -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त कितीही संकटे आली तरी दिवाळी अंकांची परंपरा खंडित झालेली नाही आणि होणार नाही, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 3) दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशनाच्या वेळी व्यक्त केला. ज्येष्ठ पत्रकार संजय कदम संपादित 18व्या ‘श्री. स्वामी समर्थ’, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी संपादित ‘पनवेल टाइम्स’, …
Read More »पनवेलमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 3) विकासकामांच्या भूमिपूजनाच्या वेळी केले. पनवेल महापालिकेच्या वतीने नागरिकांना दिवाळी भेट म्हणून अनेक विकासकामांच्या शुभारंभ करण्यात आला आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग समिती अ आणि ब मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार …
Read More »कर्जतमध्ये रंगली दिवाळी पहाट
नवोदित कलाकारांच्या गीतांवर श्रोते मंत्रमुग्ध कर्जत : प्रतिनिधी कोरोना काळात खंडित झालेला प्रत्यक्ष संगीत मैफिल ऐकण्याचा आनंद पुन्हा अनुभवण्यासाठी अनाहत या संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि. 4) ’निरामयदीप’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नवोदित गायकांनी सादर केलेल्या गीतांनी कर्जतकर संगीतप्रेमी मंत्रमुग्ध झाले. कर्जतमधील महिला मंडळ सभागृहात …
Read More »सरसगडावर क्लायंबिंगचा नवीन मार्ग
प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांचा शोध पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द येथील प्रस्तरारोहक (रॉकर) मॅकमोहन हुले यांनी पालीतील सरसगड किल्ल्यावर नुकताच नवीन प्रस्तरारोहण मार्गाचा (स्पोर्ट्स क्लायंबिंग रूट) शोध लावला आहे. त्यांनी या मार्गाने दोन वेळा प्रस्तरारोहण मोहीम फत्ते केली आहे. प्रस्तररोहण या खेळाला 2019 मध्ये ऑलम्पिकमध्ये स्थान मिळाले आहे. …
Read More »भाजप तर्फे नेरळमध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा
सर्वेश निरगुडा याने पटकावला प्रथम क्रमांक कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्ष आणि युवा मोर्चा नेरळ शहर मंडलाच्या वतीने आयोजित केलेल्या किल्ले बनविण्याची स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी अंबामाता मंदिराच्या प्रांगणात उभारलेले 11 किल्ले पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नेरळ भाजप आणि युवा मोर्चाच्या वतीने प्रज्ञेश खेडकर यांनी पुढाकार घेऊन …
Read More »‘मुंबई-गोवा महामार्ग दीड वर्षात पूर्ण करणार’
रत्नागिरी : प्रतिनिधीऐन दिवाळीत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणवासीयांना आनंदाची बातमी दिली आहे. गेली 15 वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग दीड वर्षात पूर्ण करणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात बोलताना केली. गडकरी यांच्या या घोषणेमुळे कोकणी चाकरमान्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दक्षिण गोव्यातील वेर्णा येथे …
Read More »दिवाळीनिमित्त पंतप्रधानांनी साधला जवानांशी संवाद
नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत गुरूवारी (दि. 4) जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे तैनात असलेल्या जवानांची भेट घेतली. या वेळी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत संवाद साधला. या वेळी संरक्षण क्षेत्र अधिक सक्षम होईल, असे सांगताना मोदींनी आत्मनिर्भर …
Read More »उरणमध्ये रिक्षाचालकांना मिठाईसह आर्थिक मदत
उरण : वार्ताहर उरण शहरातील वीर सावरकर मैदानाजवळ असलेल्या उरण तालुका द्रोणागिरी रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे दिवाळीनमित्त संघटनेच्या सदस्यांना बुधवारी (दि. 3) मिठाई व एक हजार रुपये रक्कम देण्यात आली. कोरोना काळात रिक्षा चालकास संघटनेकडून आर्थिक मदत म्हणून दोन हजार रुपयाची मदत देण्यात आली. तसेच संघटनेचा सभासद मयत झाला तर त्याच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper