नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी (8 नोव्हेंबर) पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 2020 आणि 2021 या दोन्ही वर्षांचे पुरस्कार यंदा वितरित करण्यात येत आहेत. एकूण सात खेळाडूंना या वर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक जिंकणारी भारताची …
Read More »खेळाडू देशापेक्षा आयपीएलला प्राधान्य देतात; कपिल देव यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ट्वेन्टी-20 विश्वचषकावर नाव कोरण्याचे भारतीय क्रिकेट संघाचे स्वप्न रविवारी उद्ध्वस्त झाले. न्यूझीलंडने सुपर-12 फेरीतील लढतीत अफगाणिस्तानला धूळ चारल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. वर्चस्वपूर्ण विजयासह न्यूझीलंडने अफगाणिस्तानलाही स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवताना दुसर्या गटातून पाकिस्तानसह उपांत्य फेरीतील स्थान सुनिश्चित केले. अन्य गटातून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. …
Read More »दुर्गदर्शन सोहळ्याची दीपोत्सवाने सांगता
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त राजे शिवराय प्रतिष्ठान, नवीन पनवेलच्या वतीने दिवाळीनिमित्त कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. रविवारी (दि. 7) दीपोत्सवाने सांगता करण्यात आली. जनमाणसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच गडकोटांप्रति आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने प्रतिष्ठान मागील 16वर्षे सातत्याने पुणे तसेच पनवेल येथे कार्य करीत आहे. पनवेल विभागाचे …
Read More »इराणचा कांदा बाजारात दाखल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मध्यंतरी वळवाचा पाऊस झाल्याने कांद्यासह सर्वच कृषीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी मुंबईच्या घाऊक बाजारात कांद्याचे दर 40 रुपये किलोपर्यंत पोहचले होते. एकंदरीत परिस्थिती पाहता कांद्याचे दर वाढणार हे गृहीत धरून बाजारातील आयातदार, व्यापार्यांनी इराणमधून कांदा मागवला होता. तो कांदा आता बंदरात पोहचला आहे आणि …
Read More »नवी मुंबईत रात्रीची स्वच्छता मोहीम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त निश्चय केला, नंबर पहिला हे ध्येय साध्य करण्यासाठी शहर स्वच्छतेबाबत जागरूक असणार्या नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार दिवाळीत रात्री वाजविल्या जाणार्या फटाक्यांच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या कचर्यामुळे सकाळी दैनंदिन स्वच्छतेवर वाढणारा ताण लक्षात घेत 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजनाच्या रात्रीपासून …
Read More »पनवेल आगारातही एसटी कर्मचार्यांचा बंद
पनवेल :प्रतिनिधी राज्यभर होणार्या एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाचे पडसाद पनवेलमध्येही पहायला मिळाले. सोमवारी (दि. 8) पनवेल एसटी आगारात एसटी कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन केले. सकाळच्या 40 फेर्यांपैकी एकही फेरी झाली नाही. एसटी कर्मचार्यांचे शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासाठी राज्यभर दिवाळीपूर्वी पासून आंदोलन सुरू होते. मुंबई विभागातील संघटनेचे पदाधिकारी उपोषण करीत असताना ही कर्मचारी …
Read More »अवेळी पडलेल्या पावसाने रसायनीत शेतीचे नुकसान
मोहोपाडा : प्रतिनिधी यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने भाताचे पीक खूपच चांगले आले होते. शेतकर्यांनी कापणीबरोबरच झोडणीला सुरुवात केली होती. मनुष्यबळाची कमतरता आणि दिवाळीचा सण यामुळे शेतकर्यांनी दोन दिवस कामे थांबवली होती. त्यातच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार गेले दोन दिवस पाऊस बरसला. या बरसलेल्या पावसाने रसायनीतही शेतीचे …
Read More »मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली ः केंद्र सरकारने अहमदाबादच्या जायडस कॅडिला या कंपनीच्या ‘जायकोव-डी’ या तीन डोसच्या लसीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच या महिन्यात होणार्या राष्ट्रीय करोनाविरोधी लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश करण्यात येणार आहे. अधिकृत सूत्रांनी रविवारी (दि. 7) ही माहिती दिली. जायकोव-डी ही 12 वर्षांची मुले …
Read More »वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा; मनसे नेते संदीप देशपांडेंचा शिवसेनेला टोला
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना या दोन्ही पक्षांकडून अधिकाधिक आक्रमकपणे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळी संपताच रविवारी सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या …
Read More »भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; रामदास गायकर आणि शशांक ठाकूर यांचा समर्थकांसह पक्षप्रवेश
पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन खारपाले (ता. पेण) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास गायकर आणि शशांक ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार रविशेठ पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षात आलेल्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल व या भागातील विकासकामांना प्राधान्य देण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper