मुंबई ः प्रतिनिधी जपानमध्ये होणार्या 50व्या जागतिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या सिनिअर गटासाठी व ढाका येथे होणार्या सेंट्रल साउथ आशिया जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरिता ज्युनिअर व सिनिअर गटासाठी भारतीय संघाची नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर निवड करण्यात आली. यात आशियाई स्पर्धेत मुंबईतील विलेपार्लेच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडासंकुलचा निशांत करंदीकर याची निवड झाली. निशांतने विशाल …
Read More »मँचेस्टर युनायटेड संघ आयपीएल खेळणार
मँचेस्टर ः वृत्तसंस्था आयपीएल 2022 स्पर्धेत दोन नव्या संघांचा समावेश केला जाणार आहे. यासाठी फुटबॉलमध्ये प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मॅनचेस्टर युनायटेडने रूची दाखवली आहे. मॅनचेस्टर युनायटेडचे मालक ग्लेजर कुटुंबीयांनी नवी फ्रेंचाइसी विकत घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. ग्लेजर कुटुंबीयांनी एका खासगी इक्विटी कंपनीच्या माध्यमातून आयपीएल संघ बनवण्याचे दस्ताऐवज विकत …
Read More »ऑस्ट्रेलियाची द. आफ्रिकेवर मात
आबुधाबी ः वृत्तसंस्था ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील पहिल्याच सामन्यात चाहत्यांना थरार अनुभवायला मिळाला. जोश हेझलवूडची (2/19) प्रभावी गोलंदाजी आणि मार्कस स्टोयनिसच्या (16 चेंडूंत नाबाद 24 धावा) निर्णायक फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून सरशी साधली. आफ्रिकेने दिलेले 119 …
Read More »इंग्लंडकडून विंडीजचा धुव्वा
दुबई ः वृत्तसंस्था इंग्लंडच्या आदिल रशीद (4/2) आणि मोईन अली (2/17) या फिरकीपटूंच्या जोडीपुढे गतविजेत्या वेस्ट इंडिजच्या नामांकित फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे ट्वेन्टी-20 विश्वचषकातील सुपर 12 फेरीच्या सामन्यात इंग्लंडने विंडीजचा सहा गडी आणि 70 चेंडू राखून फडशा पाडला. वेस्ट इंडिजने दिलेल्या 56 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचीसुद्धा एकवेळ 4 बाद 39 …
Read More »अमली पदार्थांचा विळखा
भारतातील हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलीवूड या ना त्या कारणासाठी चर्चेत असते. सध्या बॉलीवूड स्टारकीड्सचा कारनामा चर्चेत आहे. हाय-प्रोफाइल क्रूझ ड्रग्ज पार्टीबाबत एनसीबी अर्थात अमली पदार्थविरोधी विभागाकडून दररोज नवनवीन खुलासे होत असून ड्रग्जचा विळखा मुलांनादेखील पडल्याचे विदारक चित्र समोर आलेले आहे. बॉलीवूड आणि गॉसिप हे समीकरण जुनेच आहे. या चंदेरी दुनियेत …
Read More »औरंगाबाद की संभाजीनगर?; राज्य सरकारच्या जीआरवरून पुन्हा वाद
औरंगाबाद ः प्रतिनिधी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्य सरकारच्या एका जीआरमध्ये संभाजीनगर असा उल्लेख केल्याने हा वाद उफाळून आला आहे. जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत सरकारकडून औरंगाबादच्या राम भोगले यांची निवड करण्यात आली. यात काढण्यात आलेल्या जीआरवर त्यांच्या नावासमोर संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला …
Read More »मनोरंजन अनलॉक 2.0ला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हातर्फे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये रंगलेल्या संगीत, नृत्य व नाटकांच्या मेजवानीने परिपूर्ण अशा मनोरंजन अनलॉक-2.0 कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रंगभूमी अनलॉक झाल्याने नागरिकांनी कार्यक्रमाचे स्वागत, तसेच …
Read More »कर्जतमध्ये भाजपचा मेळावा; आगामी निवडणुकांची पूर्वतयारी; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
कर्जत ः बातमीदार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्जत मंडल बूथ अध्यक्ष आणि शक्तीकेंद्र प्रमुख यांच्या मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी (दि. 22) किरवली येथील साईकृपा शेळके मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी माजी पालकमंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन …
Read More »टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारत-पाकिस्तान आमनेसामने; उत्सुकता शिगेला
दुबई ः वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी (दि. 24) भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर पारंपरिक संघांमध्ये लढत रंगणार आहे. या हाय होल्टेज थराराकडे उभय देशांसह जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघाचा सुपर 12मधील हा पहिला सामना आहे. त्यामुळे सलामीचा सामना जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न …
Read More »दहशतवाद्यांविरोधात एकत्रपणे काम करा -अमित शाह
श्रीनगर ः जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशवादी कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे अशांतता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौर्यावर आहेत. उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केल्याचे सूत्रांनी सांगितले. ऑगस्ट 2019मध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper